वर्षनिहाय कार्य अहवाल
सन २०२० (वय ४० वर्षे)
• दिनांक २८ जानेवारी :
स्वर्गीय आर. आर. भंडारे यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमास भरणे-खेड येथे
प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलो.
• दिनांक ३१ जानेवारी :
दैनिक सकाळच्या ‘वाटा समृद्धीच्या’ वर्धापनदिन विशेष पुरवणीत रत्नागिरी
जिल्ह्यातील शहरी पर्यटनाबाबत भूमिका मांडणारा ‘शहरी पर्यटन वातावरण अद्ययावत हवे !’ लेख लिहिला.
• दिनांक ११ फेब्रुवारी :
चिपळूण तालुक्यातील अलोरे शाळेतील ‘अटल टिंकरिंग लॅब’च्या उद्घाटन कार्यक्रमाचे
माजी विद्यार्थी म्हणून सूत्रसंचालन केले.
• दिनांक २४ फेब्रुवारी : रत्नागिरीत
संपन्न झालेल्या ‘कोकण टुरिझम कॉन्क्लेव्ह’करिता देशभरातील नवी दिल्ली, गुजरात,
मध्यप्रदेश, चंडीगड, गोवासह महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई
येथून आलेल्या टूर ऑपरेटर्सनी दुपारी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेच्या निमंत्रणाला
मान देत ‘डेस्टिनेशन चिपळूण’ला भेट देऊन ‘क्रोकोडाईल टुरिझम आणि बोट सफारी’चा आनंद
घेतला. यावेळी देशभरातून आलेल्या ५५ टूर ऑपरेटर्सकरिता गोवळकोट धक्का येथे आयोजित
कार्यक्रमात पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी ‘डेस्टिनेशन चिपळूण’बाबत माहिती
दिली.
• फेब्रुवारी महिन्यात
रामलिंग पळसंबे, श्रीक्षेत्र माचणूर, कोकणातील आंबोली, चौकुळ, दोडामार्ग भागातील
जंगलात अभ्यास दौरा केला.
• जानेवारी पासून मासिक शिवमार्गमध्ये ‘भ्रमंती
कोकणाची’ ही लेखमाला सुरु !
• दिनांक ३ जानेवारीच्या सकाळ ने कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा
आवृत्तीत वाशिष्ठी बॅकवाॅटर पर्यटन संदर्भातील आमची भूमिका प्रसिद्ध केली.
• दिनांक २० जानेवारी चिपळूणचे वैभवशाली
वस्तूसंग्रहालय हा लेख लिहून दैनिक सागर, कृषीवल, मासिक मृदंगी, प्रहार, कोकण मिडिया
मध्ये प्रसिद्ध केला. या लेखाला फेसबुकवर १६६ जणांनी शेअर केला.
• दिनांक ३० जानेवारी रोजी रत्नागिरीत अल्पबचत
सभागृह, कलेक्टर ऑफिस येथे रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था
आयोजित जिल्हास्तरीय शाश्वत पर्यटन परिषद कार्यक्रमात सहभागी होऊन कोकण पर्यटन
संदर्भात काही मुद्दे सर्वांसमोर मांडले.
• १९ फेब्रुवारी रोजी अण्णा शिरगावकर यांच्या ६०
वर्षांच्या दाभोळ मधील कारकीर्दीचा लेखाजोखा असलेला ‘वाटचाल’ हा संपादित विशेषांक
प्रकाशित केला.
• दिनांक १० आणि ११ मार्च रोजी कोल्हापूर,
सातारा, सांगली येथे जाऊन पर्यटन वाढीसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ संदर्भात पत्रकार
परिषदा आणि टूर ऑपरेटर यांच्या भेटी घेतल्या.
• चिमण्यांच्या निवासावर गदा ! हा निसर्गाची
स्थिती दाखवणारा फोटो सकाळने २० मार्च ला प्रसिद्ध केला.
• २१ मार्च रोजी, जागतिक वनदिनी, चिपळूणच्या निसर्गरम्य
जुवाड बेटावर अॅक्टीव्ह ग्रुप, ग्लोबल चिपळूण टुरिझम, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महेंद्रगिरी निसर्ग मित्र, निसर्गसेवक आऊटडोअर्स, श्री परशुराम सानिद्ध्य
निसर्ग पर्यटन केंद्र, चिपळूण सायकल क्लब, सह्यसागर, विकास सहयोग आणि वन विभाग चिपळूण या पर्यावरणात
काम करणाऱ्या संस्थांच्या वतीने आयोजित आमराईतील आम्रवृक्षाच्या छायेत संपन्न झालेल्या
कार्यक्रमात सहभाग आणि भूमिका मांडली.
• २१ मार्च रोजी, जागतिक वनदिनाच्या निमित्ताने
‘पालावलेल्या जंगलातील दोन तास’ हा लेख ब्लॉगवर प्रसिद्ध केला.
• २६ मार्चच्या दैनिक लोकमत, लोकमंच पुरवणीत (रत्नागिरी
आणि सिंधुदुर्ग) ‘आठवणीतले भडकावू भाषण’ हा लेख प्रसिद्ध झाला.
• दिनांक १६ एप्रिल २०१९ पासून दैनिक तरुण भारत
रत्नागिरी आवृत्तीच्या संवाद पुरवणीत आमची ‘पर्यावरण व स्त्रिया’ ही १३ भागांची साप्ताहिक
लेखमाला सुरु झाली.
• ३० एप्रिल रोजी निराली प्रकाशनाच्या वार्षिक
सर्वसाधारण सभेत ‘डिजिटल अॅन्ड सोशल मार्केटिंग’ या विषयावर माहिती दिली.
• महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य
मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात ‘वाशिष्ठीतील जलसफर’ हा लेख प्रसिद्ध झाला.
• दिनांक ४ मे च्या महाराष्ट्र टाईम्स मुंबई
टाईम्स पुरवणीत 'रिचार्ज' सदरात आमचा ‘मगरींच्या सान्निध्यात’ हा लेख प्रसिद्ध झाला.
• दिनांक १५ मे रोजी दैनिक सकाळच्या वर्धापन दिन
विशेष पुरवणीत 'नातं मातीशी' लेख प्रसिद्ध झाला.
• दिनांक ३१ मे रोजी शेणगाव-भुदरगडच्या जंगलातील
‘मचाणानुभूती’बाबत व्हिडीओद्वारे सोशल मिडीयावरून माहिती प्रसारित केली.
• दिनांक ६ जून रोजी कल्याण येथील मेरिडियन स्कूल, मुरबाड रोड येथे सुरू
असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रदेश अभ्यासवर्गात दुपारच्या
समांतर सत्रात ‘कोकणातील आर्थिक विकासाच्या संधी’ या विषयावर व्याख्यान दिले.
• दिनांक १९ जून आणि ३० जुलै रोजी मुंबईत, ८ व्या
लोकसभेचे सदस्य, माजी राज्यसभा खासदार, महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री, भारत सेवक
समाज महाराष्ट्रचे माजी चेअरमन, ९६ वर्षे वयाच्या आदरणीय हुसेन एम दलवाई ( सिनियर)
यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी ग्रंथलेखन अनुषंगाने चर्चा केली.
• गेली ३ वर्षे चिपळूणात कार्यरत योगशिक्षिका
मनिषा दामले यांच्या निरामय योग केंद्रात दिनांक २१ जून रोजी आयोजित योगादिनाच्या
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून संस्थेच्या कामाला शुभेच्छा
दिल्या.
• चिपळूण नजीकच्या लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीच्या
ग्रीन झोनमध्ये ११ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन
मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा येथे कृषिदिनाच्या निमित्ताने (१ जुलै) वृक्षारोपण केले.
उंबर, चाफा, बहावा, पिंपळ जातीची १५ रोपे उपलब्ध करून दिली.
• तिवरे धरण दुर्घटना (२ जुलै); ग्लोबल चिपळूण
पर्यटन संस्थेच्या सदस्यांसोबत तातडीच्या मदतीसाठी नम्र प्रयत्न !
• दिनांक २१ जुलै : चिपळूण येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा
लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथालय चळवळीत सक्रीय
असलेल्या आणि समाजात ग्रंथप्रेम वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला दिला
जाणारा प्रतिष्ठेचा 'द.
पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार
मान्यवरांच्या उपस्थितीत मी स्वीकारला. धीरज वाटेकर यांच्यासारख्या ग्रंथमित्राचा
पुरस्काराने सन्मान होतोय ही वाचनालयासाठी गौरवाची संधी असल्याची भावना
ग्रंथालयाचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले यांनी व्यक्त केली.
• अंजनवेल (ता. गुहागर) :
येथील दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर
कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स येथे दिनांक २३
जुलै रोजी ‘कोकणातील आर्थिक विकासाच्या संधी’ या विषयावर व्याख्यान दिले. याच दिवशी किल्ले गोपाळगडची पाहणी केली. ‘राज्य
संरक्षित गोपाळगडला आजही टाळे’ या नावाने राज्यभरातील वृत्तपत्रांत लेखन केले.
• दिनांक २५ जुलै : साक्षात
धन्वंतरी डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. तात्यासाहेब
नातू स्मृति प्रतिष्ठान चे वसंत जयराम भागवत विद्यामंदिर व वसंतराव आणि शांताताई
पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य बोरगाव, ता. चिपळूण आणि श्रीसिध्दिविनायक
विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर या दोन
शाळांच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलो. विद्यार्थ्यांशी
‘डॉ. तात्यासाहेब नातू व्यक्ती आणि कार्य’ या विषयावर संवाद साधला.
• दिनांक २७-२८ जुलै २०१९ :
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुणे येथे आयोजित ‘डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा’
कार्यक्रमात सहभाग घेतला. युट्युबवर आपले स्वतःचे व्हिडिओ, आपले स्वतःचे चॅनल
असावे यासाठी ही कार्यशाळा उत्तम मार्गदर्शक ठरली.
• दिनांक १ ऑगस्ट : चिपळूण शहरातील नामांकित
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून
उपस्थित राहिलो. विद्यार्थ्यांशी विषयानुरूप संवाद साधला.
• दिनांक १९ ऑगस्ट २०१९ : चिपळूण नजीकच्या
गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा गोवळकोट (भोई) च्या
विद्यार्थ्यांसोबत वाशिष्ठी नदीचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगड परिसरात
जांभूळ, बहावा आदि जातीच्या १० वृक्षांचे रोपण केले.
• दिनांक १९ ऑगस्ट २०१९ : सन्मित्र संजय रघुनाथ
सुर्वे याच्या ५१ व्या अभिष्टचिंतन सोहोळ्यासाठी विशेष पुस्तिका संपादित केली.
कार्यक्रमाचे निवेदन केले.
• दिनांक २० सप्टेंबर : 'अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले' या इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच
जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते 'पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल'मध्ये झाले.
पुण्याच्या विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे प्रकाशित पुस्तकाला रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. आर. एच.
कांबळे आणि चिपळूणचे पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
• दिनांक २७ सप्टेंबर : नेचर हार्मनी रिसॉर्ट रामपूर
(चिपळूण) येथे संपन्न झालेल्या जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात डेस्टिनेशन चिपळूण’बाबत माहिती दिली.
• दिनांक २४ सप्टेंबर : चिपळूण तालुक्यातील माध्यमिक महिला विद्यालय
पाग, न्यू इंग्लिश
स्कुल पाग, इंग्लिश मिडियम स्कुल पाग, महादेवराव शिर्के
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कापरे
(देऊळवाडा) या शाळांमध्ये पर्यावरण उपक्रमांतर्गत ‘चंदन बीज वाटप आणि पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन’ कार्यक्रमात हरित मित्र
परिवार पुणेचे संस्थापक-अध्यक्ष ‘वनश्री’ डॉ. महेंद्र घागरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण
मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना सुमारे
चंदन २ लाख चंदन बीज, ८० हजार खैर बीज आणि ४ हजार रक्तचंदन बीज वाटप केले.
मनुष्याच्या आजूबाजूचा निसर्ग हे शाश्वत, संतुलित आणि चिरंतन सत्य आहे. परिणामांचा
अभ्यास न करता, पर्यायी व्यवस्था न देता गेल्या काही शतकांपासून होत असलेली
निसर्गाची लयलूट आज मानवाच्या मूळावर उठली आहे. निसर्गात ‘ढवळाढवळ’ केल्यामुळे आपण आज
नैसर्गिक आपत्ती युगाचा सामना करीत आहोत, असे धीरज वाटेकर यावेळी म्हणाले.
• दिनांक २८-२९ सप्टेंबर : रोजी कोल्हापूर
जिल्ह्यातील गारगोटी-पाटगाव जवळच्या शिवडाव / नाईकवाडी येथील स्वर्गीय अनुभूती
देणाऱ्या 'वाघवरंडा' ठिकाणाला भेट दिली. विविध माध्यमांद्वारे या ठिकाणाबाबत लिहिले. शेणगावच्या
जंगलात आढळून येणाऱ्या दुर्मीळ वाघाचोरा आर्किड बाबतही या दौऱ्यात अभ्यास करता आला.
• दिनांक १२ ऑक्टोबर : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन
मंदिर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा
चिपळूण यांच्या वतीने वाचनालयाच्या उषाताई साठे सभागृहात ‘नमनेश्वर साहित्य दर्शन’
हा टेरव-चिपळूणचे प्रथितयश कवी,
लेखक अॅड. यशवंत बाबुराव कदम यांच्या साहित्याचा परिचय करून देणारा साहित्यिक-सांगितिक
कार्यक्रम संपन्न झाला. अशा प्रकारच्या वेगळ्या कार्यक्रमाचे जीवनात पहिल्यांदा
संपूर्ण सूत्रसंचालन केले.
• ऑक्टोबर २०१९ : यावर्षीच्या दीपावली विशेषांक
उत्सवात मासिक जडणघडण पुणे, वार्षिक दुर्गांच्या देशातून पुणे, चिंतन आदेश पुणे,
पुढारी नवी मुंबई, शब्ददीप सांगली, झेप महाड, लोकनिर्माण, पनवेल आदि अंकांत लेखन
सहभाग घेतला.
• दिनांक १ ते ३ नोव्हेंबर २०१९ : निसर्ग व
सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे
यांच्या मार्गदर्शनाखाली चौथे पर्यावरण संमेलन कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या
चिपळूण शहरात आम्ही यशस्वी केले. कोकणातील जैवविविधता समजून घेणे, प्रत्यक्ष भेटीतून
कोकणातील निसर्ग समजून घेणे, कोकणात निसर्ग आणि पर्यावरणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे
अनुभव समजून घेणे, महाराष्ट्र राज्यातील ग्लोबल वॉर्मिंग / सह्याद्रीतील जंगलतोड
या संदर्भात ठोस भूमिका घेणे या उद्दिष्टांनुरूप संमेलन यशस्वी झाले.
• दिनांक २८, २९ डिसेंबर : चिपळूण येथे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, महाराष्ट्र
साहित्य परिषद, चिपळूण शाखा आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण साहाय्यक संघ,
वीरेश्वर मंदिर परिसरात नानासाहेब जोशी नगरात संपन्न झालेल्या दुसऱ्या लेखक प्रकाशक
संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादन केले. संमेलनातील ‘प्रवास पुस्तक निर्मितीचा’ या
पुण्याचे प्रदीप चंपानेरकर, सुजित पटवर्धन, प्रसन्न परांजपे, मधुर बर्वे, योगेश
नांदूरकर, मंगळवेढ्याचे सिद्धेश्वर घुले, साताऱ्याचे राजेंद्र माने यांचा सहभाग
असलेल्या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
• दिनांक ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२० : ९०
वर्षे वयाचे ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांच्यासोबत सप्तेश्वर
(संगमेश्वर), पावस (रत्नागिरी) असा प्रवास केला.
सन २०१८ (वय ३८ वर्षे)
• दिनांक ७ जानेवारी रोजी ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न
पुरस्कार २०१८’ ने सन्मानित.
• दिनांक २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र साहित्य
परिषद आणि साहित्य सेतू आयोजित पुणे येथील ‘लेखक – तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया’ कार्यशाळेत
सहभाग.
• चिपळूण नजीकच्या आय.एस.ओ. मानांकित जिल्हा
परिषद शाळा धामणदिवी नंबर १ येथे दिनांक २२ जानेवारी रोजी ‘रोपवाटिका लागवड’ उपक्रमांतर्गत
अर्जुनासादडा, चंदन, बहावा जातीच्या बीजांची
पेरणी आणि उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ‘वृक्ष लागवड’ विषयावर मार्गदर्शन.
• दिनांक २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान चिपळूण
पर्यटनाच्या इतिहासात प्रथमच संपन्न झालेल्या,
‘ग्लोबल चिपळूण
पर्यटन’ संस्था आयोजित, देशभरातील
पर्यटकांना पर्यटन सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन कंपन्या, टूर ऑपेरेटर आदि ३५ प्रतिनिधींच्या ‘चिपळूण दर्शन’ दौऱ्यात प्रत्यक्ष सहभाग
घेऊन उपस्थितांना ‘डेस्टिनेशन चिपळूण’चे स्वप्न सत्यात
उतरण्यासाठी माहिती दिली.
• आम्ही लिहिलेल्या पहिल्या ‘चिपळूण तालुका पर्यटन’
या पुस्तकाच्या
निर्मितीला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुढीपाडवा, दिनांक १८ मार्च
रोजी शहरात ‘चिपळूण पर्यटन’ या विषयावर
चर्चासत्राचे आयोजन.
• दिनांक २८ मार्च रोजी संपन्न झालेल्या, चिपळूण तालुकास्तरीय ‘शिक्षणाची वारी’ कार्यक्रमात ‘निसर्ग व सामाजिक
पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ’ तर्फे उभारण्यात आलेला ‘आयुर्वेदिक स्टॉल’ अत्यंत प्रभावी ठरला.
अनेक मान्यवरांनी या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.
• आमचे स्वतःचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या, चिपळूण तालुक्यातील अलोरे हायस्कूल अलोरे या शाळेच्या
दिनांक १३ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या संस्मरणीय नामकरण सोहोळ्याचे सूत्रसंचालन
आणि या निमित्ताने काढण्यात आलेल्या संग्राह्य मूल्य असलेल्या ‘श्रद्धा सुमन’ या स्मरणिकेचे संपादन
केले.
• चिपळूण पर्यटन विकासात महत्वाचा दुवा ठरणाऱ्या ‘रिक्षा व्यावसायिक’ यांना पर्यटन वाढीसाठी
दिनांक ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ५० जणांना मार्गदर्शन
केले.
• दिनांक २४ एप्रिल रोजी संगमेश्वर तालुक्यातील
श्री कुलदेवता मंडळ परचुरी (चंदरकरवाडी) यांच्या वार्षिक श्रीसत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने, हरित मित्र परिवार, पुणे, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण
प्रदूषण निवारण मंडळ
महाराष्ट्र’ आणि शिल्पकार वाचनालय, परचुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकरी मेळावा-चंदन बीज वाटप’ कार्यक्रमात
उपस्थित पंचक्रोशीतील महिला-ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना चंदनाच्या बियाणाचे वाटप, मार्गदर्शन, पर्यावरण रक्षणाबाबत
मार्गदर्शन केले.
• दिनांक १ मे चे औचित्य साधून चिपळूण
तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा सावर्डे- भुवडवाडी येथे ८०० रोपांच्या रोपवाटिका
उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थी,
शिक्षक, पालकांना पर्यावरण मार्गदर्शन आणि जंगली बियाणांचे मोफत
वाटप केले.
• दिनांक ४ ते ८ मे दरम्यान ‘ग्लोबल चिपळूण’ संस्थेतर्फे आयोजित
करण्यात आलेल्या ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी’च्या उद्घाटनप्रसंगी,
पुण्यातील
प्रसिद्ध ऑफबीट डेस्टीनेशन्स आणि विशाल सोनी यांच्या विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी
आयोजित केलेल्या ‘चला साहित्यिकांच्या गावाला’ या विशेष सहलींतर्गत कोकणाचा आगळा-वेगळा अनुभव घेण्यासाठी
मुंबई-पुण्याहून नामवंत कवी अशोक नायगावकर,
अरुण म्हात्रे, लेखिका आश्लेषा महाजन यांच्यासह आलेल्या ३५ पर्यटकांना आणि
त्यानंतर सलग ४ दिवस बोटींगला आलेल्या पर्यटकांना, पर्यटन अभ्यासक
धीरज वाटेकर यांनी चिपळूणच्या पर्यटनाची श्रीमंती सांगितली. वाशिष्ठीच्या दोनही
तीरावर वसलेल्या संस्कृतीची माहितीही त्यांनी दिली.
• दिनांक १७ मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे तीन दिवसीय निवासी ‘कल्पग्राम’ शिबिरात पालशेत (ता.
गुहागर) येथे विद्यार्थ्यांना ‘कोकण पर्यटन आणि रोजगार
संधी’ या विषयावर व्याख्यानाच्या निमित्ताने धीरज
वाटेकर यांनी १ तास मार्गदर्शन केले.
• वरील व्याख्यानाच्या निमित्ताने, पालशेतला जाणे झाले असताना, एकविसाव्या
शतकाच्या अगदी सुरुवातीला सन २००१ साली पुण्याच्या प्रसिद्ध डेक्कन पोस्ट
ग्रज्युएट रिसर्च इंस्टीट्यूटचे प्रा. डॉ.
अशोक मराठे यांनी शोधलेली सुसरोंडी-पालशेतची किमान ९० हजार वर्षे जुनी भारताच्या
साडे सात हजार कि.मी. लांब समुद्र किनाऱ्यावरील पहिली ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ परिसराला भेट दिली. तेव्हा हा परिसर अक्षम्य
दुर्लक्षाची शिकार ठरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. राज्यभरातील विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून याबाबत लेखन करून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न
केला.
• भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान
(कराची) अनुभवलेले, महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
चिपळूण येथील ८७ वर्षे वयाचे सेवानिवृत्त अपग्रेड़ मुख्याध्यापक, मोरेश्वर महादेव परांजपे
गुरुजी यांचा चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत संकुलातील सुकाई सभागृहात, ८७ वा अभीष्टचिंतन गौरव
आणि त्यांच्या पत्रकार धीरज वाटेकर लिखित 'प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या चरित्रावरील ‘निवडक अभिप्राय' या धीरज वाटेकर-विलास
महाडिक संपादित पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ दिनांक २७ जून २०१८ रोजी नामवंत
चित्रकार श्री. रविंद्र धुरी, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन सतिश खेडेकर, जि. प. सदस्या दिशा
दाभोळकर, चिपळूण पंचायत समिती सदस्य नितिन ठसाळे, निसर्ग प्रकाशनचे
सल्लागार विलास महाडिक, कार्यक्रमाचे संकल्पक आणि सूत्रसंचालक धीरज वाटेकर, स्वत:
परांजपे गुरुजी आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
• संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण
कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे
पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉ. विनीता आपटे यांनी
स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून
दिनांक २९ जून २०१८ रोजी 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आले.
• या वर्षीच्या शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेत
आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे या हेतूने दिनांक ७ जुलै रोजी चिपळूण तालुक्यातील
परशुराम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेढे बौद्धवाडी येथील स्मशानभूमी परिसरात
महेन्द्रगिरी निसर्ग मित्र संस्थेच्या सहकार्याने बहावा, नीव, उंबर जातीच्या वृक्षांचे, पेढे ग्रामपंचायतीचे
सरपंच प्रविण पाकळे, ग्रामपंचायत सदस्या चित्रा गमरे, कालुस्ते गावचे
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार काजारे, पेढे गावचे तंटामुक्ती
समितीचे अध्यक्ष तुषार गमरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष डी. एस. मोहिते, पेढे ग्रामस्थ अमित गमरे, सुरज गमरे, साहिल तांबे, चिपळूण वनविभागाचे
वनरक्षक दत्ताराम सुर्वे, रामदास खोत, महेंद्रगिरी निसर्ग मित्र संस्थेचे सल्लागार
धीरज वाटेकर, विलास महाडिक, अध्यक्ष अनिकेत चोपडे, सदस्य अवधूत पाणकर, मनोज माने, अविनाश बुरटे आदिंच्या
उपस्थितीत रोपण करण्यात आले.
• या चिपळूण शहरानजीकच्या पेठमाप
येथे जुन्या मराठी शाळेजवळ आणि नवीन स्मशानभूमी परिसरात चिपळूणचे वनरक्षक दत्ताराम
सुर्वे, रामदास खोत, स्थानिक ग्रामस्थ मयूर शिरगावकर, सतिश सावंत, जगन्नाथ रेडीज, अल्ताफ चिकटे, धीरज वाटेकर, विलास महाडीक, अनिकेत चोपडे यांच्या
उपस्थितीत बहावा जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. गतवर्षी याच परिसरात
लावण्यात आलेल्या व जगविलेल्या पिंपळ, उंबर जातीच्या झाडांची पाहाणी सर्वांनी केली आणि झाडांच्या वाढीबद्दल समाधान
व्यक्त केले. तसेच • चिपळूण
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आकले नंबर १, जि. प. शाळा सती आदिंना जुलै महिन्यात वृक्षारोपण आणि सीडबॉल
उपक्रम कार्यक्रमाकरिता पुण्यातील हरित मित्र
परिवाराचे संस्थापक महेंद्र घागरे यांच्यामार्फत, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र’ संस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी जंगली बियाणे उपलब्ध करून दिले.
• जुलै महिन्यात, दाभोळच्या हमद बीन जासिम शिक्षण
संस्थेचे ब्रौशर डिझाईन तयर केले.
• दैनिक प्रहारच्या दिनांक १६ जुलै रोजी प्रसिद्ध
झालेल्या ‘चिपळूण तालुका विशेषांक’मध्ये ‘डेस्टिनेशन चिपळूण : स्वप्न नव्हे सत्य’
हा लेख प्रसिद्ध झाला.
• आमच्या प्रकाशित आठव्या, ‘कृतार्थीनी’ या
पुस्तकाचे परीक्षण दिनांक २२ जुलै रोजीच्या दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत
प्रसिद्ध झाले.
• पाक्षिक चिंतन आदेश, मासिक शिवमार्ग, पुणे,
दैनिक जनशक्ती (पुणे, मुंबई, धुळे) मध्ये दिनांक १९ ऑगस्ट रोजी ‘भारतीय
राजकारणातील भीष्म पितामह’ हा लेख प्रसिद्ध झाला.
• आमची निर्मिती असलेले ‘गेट वे ऑफ दाभोळ’ या
पुस्तकाचे परीक्षण दिनांक २० ऑगस्टच्या दैनिक किल्ले रायगड मध्ये प्रसिद्ध झाले.
• ऑगस्ट महिन्यात ‘चंदन लागवड अभियान’ अंतर्गत
पाभरे (ता. गुहागर), नायशी (ता. संगमेश्वर), जि.प. शाळा कोंडमळा नंबर १, जि. प. शाळा
मांडवखरी, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ओझरवाडी, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा खेंड
मुलांची व कन्या, जि. प. शाळा दळवटणे बाग, जि. प. शाळा दळवटणे नंबर १, जि. प. शाळा
उक्ताड, जि. प. शाळा मुरादपूर, जि. प. शाळा पेठमाप, जि. प. शाळा गोवळकोट भोईवाडी, जि.
प. शाळा लोटेमाळ, जि. प. शाळा कोतवली नंबर १ जि. प. शाळा वाळंजगाव, कळंबणी नंबर १
येथे मुलांना चंदनाच्या रोपांचे वाटप केले.
• दैनिक सागर, जनशक्ती आणि आपला महाराष्ट्र
(पुणे, मुंबई, धुळे) मध्ये दिनांक २७ ऑगस्ट रोजी ‘दृष्टी परिवर्तनाचे रक्षाबंधन
घडावे !’ हा लेख प्रसिद्ध झाला.
• साप्ताहिक लोकप्रभाच्या दिनांक ३१ ऑगस्टच्या
अंकात ‘पर्यटन श्रीमंत चिपळूण’ हा लेख प्रसिद्ध झाला.
• सप्टेंबर महिन्यात अहमदनगरच्या ‘मेरे देश मैं
मेरा अपना घर आंदोलन’ या संस्थेच्या वतीने धीरज वाटेकर यांना ‘ग्लोबल लॉरीस्टर’ हा
बहुमान जाहीर करण्यात येऊन संस्थेच्या कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली.
• २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिनी, दैनिक
सकाळच्या माध्यमातून ‘पुरातन वास्तू लुभावू शकतात’ ही भूमिका मांडली. लेख प्रसिद्ध
केले. ग्लोबल चिपळूण टुरिझम च्या कार्यक्रमात या विषयावर भूमिका मांडली.
• दिनांक १६ ऑक्टोबर रोजी ‘परदेशी पाहुणे सीगल कोकणात
दाखल !’ ही फोटोस्टोरी लोकसत्ता, सकाळ, लोकमतने प्रसिद्ध केली.
• दिनांक २१ ऑक्टोंबर २०१८ रोजी तिवरे ते मालदेव
या नेचर ट्रेकचे आयोजनात सहभाग घेतला. तिवरे-मालदेव नेचर ट्रेकच्या माध्यमातून
लोकांना निसर्गाजवळ जाण्याची संधी ग्लोबल चिपळूण टुरिझम मार्फत मिळाली. या
विषयावर झी दिशा या मराठी साप्ताहिकात, दैनिक सागर, दैनिक उद्याचा मराठवाडा, दैनिक मुंबई तरुण भारत,
मध्ये लिहून पर्यावरण पूरक असलेला हा उपक्रम यशस्वी केला.
• ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अहमदनगर
आणि नाशिक येथे जाऊन पर्यटन वाढीसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ संदर्भात पत्रकार परिषदा
आणि टूर ऑपरेटर यांच्या भेटी घेतल्या.
• यावर्षी चिंतन आदेश, लोकसंवाद, शब्ददीप, कोकण
मिडिया, शिवतेज यांसारख्या सुमारे १० दिवाळी अंकात लिहिले. इंद्रधनू या दिवाळी
अंकाने आमची पर्यटन अभ्यासक म्हणून घेतलेली मुलाखतही प्रसिद्ध केली.
• दिनांक २ नोव्हेंबर रोजी दैनिक तरुण भारतने
चिपळूण कार्यालय वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या पर्यटन @ चिपळूण या विशेष
पुरवणीत आम्ही लिहिलेले दोन लेख प्रसिद्ध झाले.
• वाशिष्ठी नदीच्या उगमाचा शोध सन २०१५ साली, नामवंत इतिहास संशोधक
अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून घेण्याची
संधी आम्हाला (धीरज वाटेकर) सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास
महाडिक यांच्या साथीने प्राप्त झाली. दिनांक ९ डिसेंबर रोजी, राज्याच्या शैक्षणिक
इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरू पाहणारा ‘वाशिष्ठी सफर : उगम ते संगम’ हा कार्यक्रम संपन्न
झाला. नदीच्या उगमाचा शोध घेतल्यानंतर पासून असं काहीतरी करण्याचे मनात होते. आता
हा उपक्रम ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ने पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे मनावर घेतले
आहे. या उपक्रमांतर्गत मिरजोळी-चिपळूणातील ६६ विद्यार्थ्यांसह जवळपास ८० जणांना
नेऊन आणल्यानंतरचा आनंद काही औरच होता.
• नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही
१३ दिवसांचा भूतान देशाचा ‘पर्यावरण अभ्यास दौरा’ केला. या दरम्यान भूतानमधील अनेक
पर्यावरण समृद्ध शहरांना, ठिकाणांना भेटी दिल्या. भूतानचे भारतातील राजदूत मा.
जयदीप सरकार यांचीही भेट घेतली. तिथली टाइगर नेस्ट माॅनेस्ट्री पाहिली.
• दिनांक ११ डिसेंबर, आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे
निमित्त साधून नुकत्याच भेट दिलेल्या भूतानच्या टायगर नेस्ट मॉनेस्ट्री वर लेख
लिहून तो दैनिक प्रभात, पुणे, दैनिक लोकमत येथे प्रसिद्ध केला.
• दिनांक २३ ते २५ डिसेंबर दरम्यान वाशिष्ठी बॅकवॉटर
आणि क्रोकोडाईल सफारी महोत्सवा दरम्यान डेस्टिनेशन चिपळूण पाहण्याकरिता आलेल्या
पर्यटकांशी संवाद साधला.
• दिनांक ३० डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे
निवासी जिल्हाधिकारी मा. श्री. दत्ता भडकवाड हे वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल
सफारीचा आनंद घेण्यासाठी आले असता त्यांच्याशी संवाद साधला.
सन २०१७ (वय ३७ वर्षे)
• दिनांक १३ ते १५ जानेवारी रोजी झालेल्या
जलसाहित्य संमेलनात सक्रीय सहभाग, ‘कोकणातील पाणी आणि पर्यटन
विकास’ सत्राचे सूत्रसंचालन, विशेष लेखन.
• दिनांक १९ जानेवारी रोजी, चिपळूण तालुक्यातील तळसर मुंढे शिक्षण संस्थेच्या न्यू
इंग्लिश स्कूल तळसर येथे आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित राहून, घड़ू पाहणार् या उद्याच्या
पिढीशी-विद्यार्थ्यांशी सुमारे ५० मिनिटे संवाद साधला.
• दिनांक २२ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या ‘मठगाव-पाटगाव’ जंगलात ट्रेकिंग अनुभूती.
• वर्षभर साप्ताहिक गोयंकार (पणजी) आणि साप्ताहिक
प्रगती टाईम्स (गुहागर) यांत ‘गावकुसाबाहेर आणि विचार
वंचितांचा’ स्तंभलेखन.
• वर्षभर साप्ताहिक कोकण मिडिया (रत्नागिरी)
करिता सातत्याने ‘मुखपृष्ठ कथा’ म्हणून विशेष
लेखन.
• फेब्रुवारी झालेल्या अपरान्त साहित्य संमेलनात
सक्रीय सहभाग, ‘कोकणातील बोलीभाषा’ या विषयावरील सत्र सूत्रसंचालन, स्थानिक वर्तमानपत्रात पूर्ण पान विशेष लेखन.
• फेब्रुवारी महिन्यात, श्रीरामदास नवमीचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील मोरवणे
येथील ‘तळहातावर सहज मावेल एवढी छोटी मारुतीची मूर्ती’ या विषयावर माध्यमांच्या सहकार्याने प्रकाश टाकण्याचा
प्रयत्न.
• २८ फेब्रुवारी ला राष्ट्रीय विज्ञान दिन आणि
भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो यांच्या ऐतिहासिक कामगिरीबाबत दोन वृत्तपत्रात विशेष
लेखन.
• दुर्दैवी वणवे सुरु झाल्यावर ‘कोकणातील वणवा’ या विषयावर लेखनाच्या
माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न.
• दिनांक ९ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या नामवंत
इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर लिखित, संशोधित ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’
ग्रंथाची
निर्मिती, ३ प्रकरणांचे लेखन आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन
कार्यक्रमाचे संयोजन.
• दिनांक १७ एप्रिल रोजी कुटरे (ता. चिपळूण) येथे
संपन्न झालेल्या राजेशिर्के परिवाराच्या स्नेहमेळाव्यात, कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आपला इतिहास दाखविता यावा
म्हणून ठोस प्रयत्न करण्याबाबत आणि वाडा संस्कृतीचे जतन करण्याबाबत पर्यटन अभ्यासक
म्हणून आवाहन-भाषण.
• जून महिन्यात पेढे येथील डोंगरात ‘डॅशिंग स्क्वाड’ यांच्या सहकार्याने जंगल
पेरणी अभियान.
• जून महिन्यात, देशातील पहिले
पुस्तकांचे गाव ‘भिलार’
(महाबळेश्वर) ला
स्वलिखित ग्रंथांची भेट.
• जून महिन्यात महेंद्रगिरी निसर्गमित्र
संस्थेतर्फे सवतसडा धबधबा (चिपळूण) परिसरात वृक्षारोपण.
• जुलै महिन्यात किल्ले गोविन्दगड येथे राजे
प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ८ फूट उंचीच्या वृक्षाचे रोपण.
• उक्ताड जि.प. शाळेला रोपवाटिकेसाठी दिलेल्या, जंगली बियाणातून तयार झालेल्या रोप वाटिकेतून ‘राजे प्रतिष्ठान’ला रोपे भेट.
• जुलै महिन्यात निसर्ग व सामाजिक पर्यावरण
प्रदूषण निवारण मंडळातर्फे गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांना ‘चिंच आणि काशिद’ जातीच्या ५०० रोपांचे
वाटप.
• ४० वर्षे जुने साप्ताहिक किसानसाद
रत्नागिरीच्या ‘स्वातंत्र्याची सप्तपदी’ विशेषांकासाठी ‘कोकणातील पर्यटनाची नवी
दालने’ या विषयावर विशेष लेखन.
• १६ आणि १७ सप्टेंबर रोजी, पर्यावरणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेत त्यावर काही ठोस
रचनात्मक निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण विषयात काम करणा-या
व्यक्ती, संस्थांनी,
शासनाच्या मागे
सामुहिक रेटा लावावा, आपली सांघिक शक्ती
वाढवावी, ‘जैवविविधता जपणूक आणि प्लास्टिकचा भस्मासूर
रोखणे व पर्यावरण संवर्धनातील सर्व घटकांवर अभ्यास’ या अनुषंगाने
सांघिकपणे शासनासमोर वसुंधरेच्या रक्षणार्थ कृती अहवाल सादर करणे, असे उद्दिष्ट असलेली,
राज्यातील २८
संस्थांनी सहभाग नोंदविलेली, निवेदिता प्रतिष्ठान, टेलस ऑर्गनायझेशन आणि ए.ई.आर.एफ. पुणे आयोजित, राज्यस्तरीय ‘पर्यावरण विषयी कार्यशाळा’ जालगाव-दापोलीत संपन्न झाली. या पर्यावरण कार्यशाळेत सक्रीय
सहभाग, लेखन आणि चंदन रोपांची मान्यवरांना भेट.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांची भेट आणि
संवाद.
• दिनांक २४ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू आयोजित पुणे
येथील ‘कॉपीराईट,
आय.एस.बी.एन., रॉयल्टी व प्रकाशक करार’
कार्यशाळेत
सहभाग.
• गांधी जयंती, दिनांक २ ऑक्टोबर
रोजी सुप्रसिद्ध ‘मेडिकल सोशल वर्कर’ कमल श्रीकांत भावे यांची जीवनकथा असलेल्या स्वलिखित ८ वे
पुस्तक-चरित्र लेखनकृती ‘कृतार्थीनी’चे प्रकाशन, विश्वविख्यात टाटा
इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सचे डायरेक्टर एस. परसुरामन, राष्ट्रपतींवर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे विख्यात डॉ. वि.
ना. श्रीखंडे आदि अनेक नामवंतांकडून लेखनाचा गौरव. दैनिक प्रभात (पुणे), दैनिक तरुणभारत (बेळगाव), दैनिक कृषीवल
(रायगड), दैनिक सामना (मुंबई) यांच्याकडून रविवार
पुरवणीत दखल.
• पेढे-परशुराम ग्रामपंचायतीस गांधी जयंतीदिनी
स्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपे उपलब्ध.
• वांद्री,
परचुरी, मुरुड आदि जि.प. शाळांत चंदन रोपांचे वाटप.
• दुसऱ्या राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलनाच्या
पार्श्वभूमीवर पेठमाप-चिपळूण येथे चंदन रोप वाटप अभियान.
• लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आयोजित वाचन
प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित.
• दिनांक २७ व २८ ऑक्टोबर रोजी राळेगणसिद्धी येथे
अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘पर्यावरण संमेलन’ उद्घाटनप्रसंगी आयोजक
संस्था ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ
महाराष्ट्र’च्या २५ वर्षांच्या पर्यावरण कामाचा आढावा
मांडणारे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक-भाषण.
• पर्यावरण संमेलन निमित्त प्रकाशित ‘वनश्री’ विशेषांकात संस्था अहवाल
लेखन आणि अस्वस्थ वने, नद्या, जंगल आणि पर्यावरण ह्रास या विषयावर शोधनिबंध लेखन.
• राळेगणसिद्धी ‘पर्यावरण संमेलन’ नंतर उपेक्षितांचा आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
विश्वप्रसिद्ध ‘स्नेहालय’
संस्थेस
अभ्यासपूर्ण भेट आणि संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी आणि विश्वस्त रमाकांत तांबोळी
यांच्याशी चर्चा.
• दिनांक ९ डिसेंबर रोजी, पूर्ण क्षमतेने बारमाही वाहणाऱ्या, कोकणातील चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम
मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या पर्यटन विषयात कार्यरत
असलेल्या संस्थेच्या आगामी ‘चिपळूण बॅकवॉटर
फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी’ महोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर, ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणा-या महाराष्ट्रातील एकमेव
उपक्रमाची माहिती आणि कोकण पर्यटनातील आवश्यकता याबाबत पुणे येथील पत्रकार भवन
येथे पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
• विविध वृत्तपत्रातून ‘कोकण पर्यटन’ विषयक फोटोस्टोरीज.
• दिनांक २२ ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजित चिपळूण
बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल फेस्टीव्हलची माहिती ‘न्यूज १८ लोकमत’ आणि 'जय महाराष्ट्र' या वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचविण्यात
यशस्वी.
• दिनांक २७ ते २९ डिसेंबर ला रत्नागिरी येथे
आयोजित अ.भा.वि.प.च्या कोकण प्रदेश अधिवेशनात सहभाग आणि दैनिक महाराष्ट्र दिनमान
(मुंबई), दैनिक सागर,
साप्ताहिक कोकण
मिडिया मधून लेखन.
• दिनांक ३१ डिसेंबर रोजी नामवंत इतिहास संशोधक
अण्णा शिरगावकर लिखित आम्ही निर्मित-संपादित ‘शेवचिवडा आणि व्रतस्थ’ पुस्तकांचे प्रकाशन. याच कार्यक्रमात नववर्षाच्या
पूर्वसंध्येला वैविध्यपूर्ण ‘वाटेकर संग्रहालय’ निर्माण करण्याचा सोडला
संकल्प !
सन २०१६ (वय ३६ वर्षे)
• दिनांक १७ जानेवारी रोजी, दैनिक प्रहार मध्ये ‘निसर्गरम्य जुवाड बेट’ या विषयावर फोटोस्टोरी प्रसिद्ध.
• दिनांक १७ जानेवारी रोजी, हिंदवी स्वराज्याचे नौसेनापती सरखेल (आरमार प्रमुख)
कान्होजीराजे आंग्रे (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९) यांचे नववे वंशज श्रीमान
रघुजीराजे आंग्रे यांचेसह शिवजयंती उत्सवपूर्व,
आपले मूळ हर्णे
गावी (तालुका दापोली) भेट देऊन येथील जय भवानी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या
उपक्रमांत सक्रीय सहभाग आणि छायाचित्रण.
• दिनांक ३१ जानेवारी रोजी, संत गाड़गेबाबा परिट समाज सेवा संघाचे रत्नागिरी
जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताराम ऊर्फ आबा महाड़ीक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती
आनंदसोहळा प्रसंगी त्यांचे जीवनावर आम्ही लिहिलेले आमचे ७ वे पुस्तक
"ग्रामसेवक ते समाजसेवक" प्रकाशित झाले.
• १९ मार्च रोजी दैनिक लोकसत्ता मध्ये ‘कोकणातील वास्तुविकास’
हा अभ्यासपूर्ण
लेख प्रकाशित.
• दिनांक ८ मे रोजी, नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी असंख्य
पुरावे उपलब्ध करून नव्याने लेखनबद्ध केलेल्या आणि आमची निर्मिती असलेल्या कदीम
बाबूल हिंद (हिंदचा प्राचीन दरवाजा) अर्थात ‘गेट वे ओफ दाभोळ’ या ऐतिहासिक दस्ताऐवज ठरू पाहणार्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे
प्रकाशन एम. आइ. बी. गर्ल्स हायस्कूल आणि जूनियर कॉलेज खेड येथे कतार येथील जागतिक
कीर्तीचे उद्योजक, शिक्षणप्रेमी हसनभाई चौगुले यांचे हस्ते झाले.
• ७, ८, ९ मे रोजी चिपळूण येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र
शासनाच्या ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सव’ करिता ‘रत्नागिरी जिल्हा पर्यटन’ माहिती पत्रकाची निर्मिती, संकलन, लेखन, छायाचित्रण आणि संपादन.
• रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ निमित्ताने
येथील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील पर्यटन
विषयक पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा सावित्रीताई होमकळस आणि
आमच्या (धीरज वाटेकर) हस्ते झाले. याच ठिकाणी सन २००८ साली गुढीपाडव्याच्या
शुभमुहूर्तावर आमच्या "चिपळूण तालुका पर्यटन" या पहिल्या पुस्तकाचे
प्रकाशन झाले होते. आज ६ पुस्तके लिहून पूर्ण झाल्यानंतर, चिपळूण पुस्तक निर्मितीच्या काही आठवणी आम्ही उपस्थितांना
सांगितल्या. यावेळी वाचन मंदिरचे अध्यक्ष अप्पा जाधव, आमचे मार्गदर्शक व कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, बापूसाहेब काणे, विलास महाडीक उपस्थित
होते.
• मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हृषीकेश, मसुरी, नैनिताल पर्यटन भ्रमण.
• जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाशिष्ठी
नदीच्या उगमाचा शोध.
• रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा
म्हणून दिनांक १२ जून रोजी घेतलेल्या राज्यस्तरीय ‘चंदन लागवड
कार्यशाळा’ या उपक्रमाची दखल सह्याद्री वाहिनीने घेतली.
• जून महिन्यात राज्यस्तरीय ‘चंदन लागवड कार्यशाळा’
दरम्यान आलेल्या
धक्कादायक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, विशेष लेखाद्वारे ‘तरुणांना गंजण्यापेक्षा झिजणे श्रेयस्कर’ मानण्याचा दिला सल्ला.
• दिनांक २२ जून पासून स्वतंत्र ब्लॉग लेखन (ddheerajwatekar.blogspot.in) सुरु.
• महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, रत्नागिरी जिल्हा आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण
निवारण मंडळ महाराष्ट्र आयोजित, जिल्ह्यातील प्राथमिक
शाळाच्या मुलांच्या माध्यमातून "७५ लाख बीज पेरणी - वृक्ष लागवड़ अभियान"
कार्यक्रम दिनांक २७ ते ३० जून २०१६ या दरम्यान राबविण्यात आला. पुण्यातील हरित
मित्र परिवाराकडून याकरिता उपलब्ध झालेल्या आपटा, आवळा, बहावा, शमी, अश्वगंधा, खाया, निलगिरी, गिरीपूष्प, बिब्बा, बदाम, हरडा या जातीच्या वृक्षांच्या बीया वापरून वृक्षजतन आणि
संवर्धन यातील अडचणींचा अभ्यास करून प्राथमिक शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या
चिमुकल्या हातांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर हे अभियान
राबविले गेले.
• ऑगस्ट महिन्यात चिपळूण तालुक्यातील कात्रोळी
देवराई परिसरात महेंद्रगिरी संस्थेच्यावतीने वृक्षलागवड.
• दिनांक ५ ऑगस्ट रोजी चिपळूणात चंदन लागवड आणि ४
हजार रोप वाटप कार्यशाळा.
• दिनांक १५ ऑगस्ट रोजी, महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
चिपळूण येथील ८५ वर्षे वयाचे सेवानिवृत्त अपग्रेड़ मुख्याध्यापक, मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजी यांनी पहिल्या
स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानातील कराची शहर अनुभवलेल्या दिवसांसहचा कोकणच्या
प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील ४१ वर्षांच्या सेवाकाळाचा जीवनप्रवास शब्दबद्ध
असलेल्या ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या पत्रकार धीरज वाटेकर लिखित चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी पेढे - चिपळूण येथील आर. सी. काळे जुनिअर कॉलेज
सभागृहात प्रा. राजेन्द्रप्रसाद मसुरकर, परशुराम एज्युकेशन
सोसायटी आणि डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानचे आणि या सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. विनय
नातू यांच्या हस्ते झाले.
• दिनांक १७ ऑगस्ट रोजी, पारंपारीक महाराष्ट्रीय लोकगीतातील स्त्रीधन समजल्या
जाणाऱ्या उखाण्यात, "पंचमीचं पवतं, आलं गवरी भवतं, गवरीचं घेतें दोरं, आलं शिलंगान म्होरं" अशा शब्दांनी गौरविलेल्या पवतांना
चिपळूण तालुक्यातील पालवण - ढोक्रवलीतील श्रीबाजी वाघांबर देवस्थानात ग्रामदेवतेस
अर्पण करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण
मंडळाच्या वतीने देवस्थानच्या देवराई करिता देण्यात आलेल्या विविध हरडा, नीव, गुलमोहर, सोनचाफा, कांदाळावन आदि जातींच्या
सुमारे ६० वृक्षांची लागवड करण्यात आली.
• दिनांक २२ ऑगस्ट रोजी ‘NATIONAL YUVA CO. OP. SOCIETY LTD’ च्या नवी दिल्ली येथील १५
व्या राष्ट्रीय बैठकीस ‘रत्नागिरी जिल्हा
प्रतिनिधी’ म्हणून उपस्थित.
• दिनांक १५ सप्टेंबर, अभियंता दिनाचे औचित्य साधून, पिढ्यांपिढ्या
चालत आलेल्या ऐकीव उपलब्ध माहितीनुसार
मालदोलीतील “रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूचा नकाशा आणि संपूर्ण काम हे विश्वविख्यात
अभियंता भारतरत्न डॉ. विश्वेश्वररया यांनी आपले पुण्यातील मित्र पोलिस खात्यातील
वरीष्ठ अधिकारी रामचंद्र वासुदेव मराठे यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रिखातर
केले होते, असे आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऐकून होतो.
याबाबतचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नसल्याने याबाबत अधिकाराने कोणी बोलू शकत
नाही, हे नक्की. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या
खाडीकिनारी वसलेल्या या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू
उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरितही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला
मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे आणि डॉ.
विश्वेश्वरय्या हे मराठे यांचे पुण्यात असताना मित्र असल्याची माहिती विचारात घेता
यात तथ्य असावे. प्रत्यक्ष वास्तू पाहिल्यानंतर हे सामान्य बुद्धिमततेचे काम नाही, हे आपल्याला स्पष्ट जाणवते. या संपूर्ण वास्तूचा ‘भारतरत्नाने साकारलेले वास्तुरत्न’ या माध्यमातून माध्यमांच्या सहकार्याने प्रकाश टाकण्याचा
प्रयत्न.
• निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या
माध्यमातून आम्ही करीत असलेल्या पर्यावरण संवर्धन विषयक कामाची विशेष दाखल घेऊन
पुण्यातील माय अर्थ फौंडेशन संस्थेने कृषी संशोधक डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या
हस्ते पुण्यात ‘पर्यावरण भूषण २०१६’ देऊन गौरविले.
• दिनांक २७ सप्टेंबर रोजी, जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून, जगाला हेवा वाटावा असे निसर्ग सौंदर्य, अनेक प्राचीन वारसास्थाने लाभलेल्या कोकणची "जागतिक
पुरातत्वीय ठेवा" म्हणून सतत उपेक्षा होते आहे. वास्तविकत: जागतिक
वारसास्थानात कोकणाला स्थान मिळाल्यास कोकण पर्यटन जगाच्या नकाशावर सहज झळकेल.
याबाबत आम्ही दिनांक २३ फेब्रुवारी २०१२ रोजी दैनिक लोकसत्ता मध्ये मांडली होती.
आज पुन्हा एकदा "आंतरराष्ट्रीय पुरातत्त्वीय वारशात ‘कोकण’ हवा !" या
"केळशीतील वाळूची टेकडी" संदर्भात आम्ही मांडलेल्या भूमिकेला दैनिक
महाराष्ट्र टाईम्स सह जिल्ह्यातील विविध वृत्तपत्र माध्यमांनी सकारात्मक प्रतिसाद
दिला.
• दिनांक २ नोव्हेंबर रोजी, दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., चिपळूण बँकेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
वार्षिक सभेत, पुण्याच्या माय अर्थ फौंडेशनचा “पर्यावरण भूषण” पुरस्कार मिळाल्याबद्दल
मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार.
• नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र
मोदींच्या “पी.एम.”
ऑफिसची
कार्यतत्परता अनुभविलेल्या चिपळूणच्या डॉ. प्रकाश पाटणकर यांची वृत्त मुलाखत
घेतली.
• निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ
महाराष्ट्र आयोजित पर्यावरण संमेलन २०१६
संमेलनात प्रकाशित होणाऱ्या ‘वनश्री’ विशेषांकाकरिता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची
"पर्यावरण संवर्धन" या विषयावर विस्तृत मुलाखत घेताना, पर्यावरण विषयातील आमच्या प्रश्नांची उत्तरे अण्णांकड़ून
मिळवताना आम्हांला स्वतःला अद्ययावत करण्याची संधीचं मिळाली.
• मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या "लोकसंवाद
यथार्थ" या दिवाळी विषेशांकाच्या परिसंवादात "पर्यावरणीय ह्रास, हानी, संवर्धन आणि विकास ; स्त्रीयांचे योगदान" या विषयावर लिहिलेला प्रदीर्घ लेख
प्रसिद्ध.
• ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या
अध्यक्षतेखाली राळेगणसिद्धी येथे दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न
झालेल्या “निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ
महाराष्ट्र” या आमच्या संस्थेच्या राज्यस्तरीय पर्यावरण
संमेलनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग, विशेषांकाचे अतिथी संपादक, लेख लेखन आणि संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन.
• २५ डिसेंबर रोजी संशोधित-संपादित आणि
अभ्यासपूर्ण ‘कोकण नकाशा’च्या दुसऱ्या आवृत्तीचे
(७ हजार प्रती) दिवेआगर, ता. श्रीवर्धन येथे
प्रकाशन.
सन २०१५ (वय ३५ वर्षे)
• आम्ही लिहिलेल्या "ठोसेघर पर्यटन" या
संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ठोसेघर, जि. सातारा
प्रकाशित-संशोधित पर्यटन पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक “प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” दिनांक १२ जानेवारी रोजी प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक
ग्रंथालयाच्या ९ व्या वर्धापनदिनी कोल्हापूर उजळवाडी येथे समारंभपूर्वक प्रदान
करण्यात आला.
• दिनांक १४ जानेवारी रोजी अलोरे, ता. चिपळूण येथील हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या ‘व्यवसाय मार्गदर्शन दिन’
कार्यक्रमात ‘माजी विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे’ म्हणून मार्गदर्शन करताना स्वत: शाळेत शिकत असताना २३
वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘तंत्रशिक्षण प्रात्यक्षिक
हस्तलिखित फाईल’ उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडल्या, विद्यार्थ्यांना ‘आयुष्यात उत्कृष्टत्व
साधण्याचा प्रयत्न’ करण्याचा सल्ला दिला.
• दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ‘कौशल्य विकास’ या विषयावर सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठात संपन्न कार्यशाळेत सहभाग.
• दिनांक १७
फेब्रुवारी, महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराच्या अत्यंत
वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभाऱ्यात तीन रूपे
स्थापित असलेले दुर्मिळ शिवमंदिर चिपळूणपासून अंदाजे 20 कि. मी. अंतरावर कुडप गावी आहे. गावाच्या निसर्गरम्य
देवराईत, एकाच गाभार्यासत सोमेश्वर, रामेश्वर आणि
वैजनाथ या तीन रूपात, चार शिवलिंगांचे येथे
दर्शन होत असल्याने हे स्थान शिवभक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आगळेवेगळे ठरू शकते
या जाणीवेने या स्थानाची अभ्यासपूर्ण स्टोरी माध्यमांच्या सहकार्याने प्रकाशात
आणली.
• दिनांक २ मार्च रोजी, आमच्या "अमेझिन्ग ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स"ने
संयोजित केलेली चिपळूणातील बांदल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची "पर्यावरण
सहल" नुकतीच चिपळूण-शिरवलीच्या निसर्गरम्य
देवराईत संपन्न झाली.
• दिनांक ३ मार्च रोजी, चिपळूणच्या एस.पी.एम. इंग्लीश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याना
आम्ही (निशिकांत तांबे, समीर कोवळे, धीरज वाटेकर) हिमालय मोहीमेबाबत माहिती दिली.
• नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक
अण्णा शिरगावकर यांच्या ७० वर्षे समाजसेवेचा,
आम्ही संपादित
केलेला, वार्तापट-विशेषांक "सिंहावलोकन" या नावाने दिनांक २०
एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला.
• अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रत्नागिरीतर्फे
दिनांक २९ एप्रिल रोजी शिपोशी (तालुका लांजा) येथील आठल्ये जूनियर कॉलेज येथे
आम्ही करियर मार्गदर्शन व्याख्यान अंतर्गत "विचार विकसन पद्धती" या
विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
• दिनांक २५ एप्रिल रोजी, चिपळूण तालुक्यातील सुशिक्षितांचे नगर म्हणून ओळखले
जाणाऱ्या अलोरे येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या अलोरे हायस्कूल अलोरेच्या
आम्हा सन १९९५ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे द्विदशकपूर्ती निमित्त ‘माजी विद्यार्थी संमेलन आणि शिक्षक कृतज्ञता सोहळा’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वैशिष्ट्यपूर्ण आणि
ऐतिहासिक सोहोळ्याचे सूत्रसंचालन आणि स्व-संपादित-निर्मित विशेषांकाचे प्रकाशन
यावेळी करण्यात आले.
• दिनांक ३ मे रोजी, आम्ही कार्यरत असलेल्या,
निराली प्रकाशन
पुणेची ANNUAL CONFERENCE येथे संपन्न झाली. यावेळी
आम्ही "सृजनशीलता विकास" (INNOVATION
CREATION) या विषयावर, देशभरातून आलेल्या MARKETING
ASSOCIATE समोर संवाद
साधला.
• मे महिन्यात, जिल्हय़ाच्या
पूर्व सीमेवर, सहय़ाद्री पर्वताच्या उंच रांगांच्या पायथ्याशी
असलेल्या चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावातील देवराईच्या खोऱ्यातील श्रीदेव भैरी
मंदिर परिसरात, आम्ही कार्यकारी संचालक असलेल्या, ‘ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या विद्यार्थ्यांच्या ‘नेचर ट्रेल’ मध्ये विद्यार्थ्यांनी जंगलभ्रमण, आकाशदर्शनसह नजीकच्या वैतरणा नदीपात्रातील वरपीच्या डोहात
असलेल्या निसर्गनिर्मित भूगर्भशास्त्रीय आश्चर्य ठरलेल्या रांजणखळग्यांची माहिती
दिली.
• १४ ते २४ जुलै दरम्यान व्यावसायिक कामानिमित्त
घडलेल्या हैद्राबाद प्रवासात, पर्यटन अभ्यास आणि
छायाचित्रण.
• अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून
अंदमान येथे दिनांक ५-६ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ कार्यक्रमाचे
संयोजक ‘ऑफबीट डेस्टीनेशन्स’ यांच्यातर्फे ‘टूर मॅनेजर आणि
छायाचित्रकार’ म्हणून संमेलनात सहभाग.
• ऑक्टोबर महिन्यात सोलापूर येथे संपन्न झालेल्या
‘राज्यस्तरीय विवेकानंद साहित्य संमेलन’ सहभाग.
• नोव्हेंबर महिन्यात ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य’ या पर्यावरण विषयात काम
करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या ‘राज्य संघटक’ पदी निवड.
• दिनांक १६ नोव्हेंबर रोजी कोकणची सांस्कृतिक
राजधानी असलेल्या चिपळूणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आद्य पक्षीशात्रज्ञ आणि
पर्यावरणवादी डॉ. सलीम अली यांच्या १२० व्या जयंतीचे निमित्त साधून परिसरातील
पक्षीप्रेमींना एकत्र करून, आपल्या पक्षी विषयक आठवणी
शब्दबद्द करीत आगळा वेगळा पक्षीदिन पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन
केंद्रात साजरा केला.
• दिनांक २९ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्रातील दुसऱ्या आणि कोकणातील पहिल्या ‘बिगरमोसमी जंगल पेरणी अभियान’चे आयोजन, सह्याद्री वाहिनीने घेतली दखल.
• मोर नाचत असतांना त्याची पिसे सप्तरंगासारखी
दिसतात. साधारणत: आकाशात ढग गोळा झाले की मोर नाचतो. मोराच्या लांबलचक
पिसाऱ्याखाली राखाडी रंगाची पिसं असतात. सप्तरंगी पिसे गळल्यानंतर राखाडी रंगाची
पिसे असलेला मोर सहसा पिसारा फुलवताना, नाचताना, बागडताना दिसत नाही,
कारण त्यात काही
गंमत नाही आणि मुख्यत्वे त्या पिसाऱ्याने तो मादीला आकर्षित करू शकत नाही. हे जरी
निसर्गनियमित तत्व असले तरी तत्वाला अपवाद असतातच. असाच अपवादात्मक "राखाडी
रंगाचा पिसारा फुलवलेला मोर" आम्हाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, आम्ही कार्यकारी संचालक असलेल्या चिपळूणातील ओरायन
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या "विज्ञान अभ्यास दौरा" दरम्यान
चिंचोली-मोराची येथे पाहायला आणि सुदैवाने “क्लिक” करायला मिळाला.
• दिनांक २५ डिसेंबर रोजी अ.भा.वि.प. महाराष्ट्र
प्रदेश ‘पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरण’ मुंबई येथे सहभाग.
• ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह
सोसायटीच्या वतीने नववर्षपूर्व आनंदोत्सव ‘वाशिष्ठी बॅकवॉटर
फेस्टिव्हल अॅरण्ड क्रोकोडाईल सफारी'मधील निसर्गसौंदर्य, खाडीतील छोटी-मोठी बेटे,
गोविंडगड किल्ला
आदींची अर्धापान फोटोस्टोरी दैनिक प्रहारने दिनांक ३० डिसेंबरला प्रसिद्ध
केली.
सन २०१४ (वय ३४ वर्षे)
• दिनांक ८ ते १५ जानेवारी दरम्यान, पुणे येथील ‘भारत परिक्रमा’ संस्थेने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या
जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या नाशिकच्या ७५० विद्यार्थ्यांसहच्या ‘कन्याकुमारी आणि दक्षिण भारत युवा परिक्रमा’ अभ्यास सहलीत ‘टूर ऑपरेटर आणि
फोटोग्राफर’ म्हणून सहभाग.
• ‘व्हँलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर, कोकण पर्यटन विकासात या स्थानाला योग्य जागा मिळावी या
हेतूने, कोकणातील खरी-खुरी २५० वर्षे जुनी प्रेमकहाणी
निवसर (रत्नागिरी) येथे घडलेल्या ''जाकाय-राघो प्रेम स्मृति
मंदिर"चा इतिहास आम्ही नव्याने माध्यमांच्या सहकार्याने वाचकांसमोर मांडला.
• केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाट
संवेदनशील जाहीर करण्याबाबत अधिसूचना जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक वनदिनी
(२१ मार्च) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र संस्थेच्या कोकण प्रतिनिधींनी ज्येष्ठ
निसर्गशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन
संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त बनवण्यात आलेला वनश्री विशेषांक त्यांना भेट दिला
आणि ‘निसर्ग आणि विकास’ याबाबत चर्चा केली.
• ‘आय.आय.बी.एम. इंस्टीट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ मधून पत्रद्वारा ‘E.M.B.A.
(Marketing Management & Travel &
Tourism Management)’ ही पदवी उत्तीर्ण.
• स्पार्क,
मुंबई या
संस्थेकरिता ‘तळकोकणातील विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या आणि
मागण्या’ याबाबत महत्वपूर्ण लेखन.
• मे महिन्यात अभाविप आयोजित ‘पर्यावरणाच्या पाऊलखुणा’
श्रमानुभव
शिबीरात मरिनर दिलीप भाटकर यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.
• महाराष्ट्रात वृक्ष संवर्धन विषयात काम
करणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र संस्थेने आपल्या दशकपूर्ती निमित्त बनविलेल्या
आम्ही संपादित केलेल्या "वनश्री" विशेषांकाचे प्रकाशन जलसंधारण व रोजगार
हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते, मुंबईतील
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दिनांक १० जून रोजी करण्यात आले.
• दिनांक ६ ऑगस्ट रोजी भारतातील उंच ४ थ्या
धबधब्यावरील ‘ठोसेघर पर्यटन’ या आमच्या
पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन.
• ऑगस्ट महिन्यात दूधसागर धबधबा, जोग फॉल्स आदींना भेट आणि छायाचित्रण.
• दिनांक २२ सप्टेंबर रोजी ‘NATIONAL YUVA CO. OP. SOCIETY LTD’ च्या नवी दिल्ली येथील ‘कौशल्य विकास’ या विषयावरील राष्ट्रीय
कार्यशाळेस ‘रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून उपस्थित.
• २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान अकोला, अमरावती, धुळे पर्यटन अभ्यास आणि
छायाचित्रण.
• डिसेंबर २०१४ मध्ये अपरान्त संशोधन केंद्र ‘उद्घाटन’ निमित्त विशेष लेखन आणि
मूर्तीशास्त्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. गो.
ब. देगलूरकर (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली,
कसबा येथील
पुरातन कर्णेश्वर मंदिर अभ्यास भेट सहभाग. डॉ. गो. ब. देगलूरकर विविध लिखित
पुस्तकांची भेट.
• ग्लोबल चिपळूण टूरिझम लिमीटेड आयोजित ‘बॅकवॉटर फेस्टिवल आणि क्रोकोडाईल सफारी डिसेंबर २०१४ च्या
प्रचार-प्रसारासाठी, वाळू किनार्याकवर पहुडलेल्या मगरीचे आणि खाडीत
विहार करणार्याल बदकांच्या फोटोस्टोरीज.
सन २०१३ (वय ३३ वर्षे)
• ‘ऊर्ध्वाधर ग्रुप’च्या दुसऱ्या ऊर्ध्वाधर
दीपावली या संपादित संग्राह्य विशेषांकास पदार्पणाच्या दुसऱ्याच वर्षात नंदा
फौन्डेशन मुंबई (२४ मार्च) यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला.
• दिनांक ११ मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा माहिती
कार्यालयाद्वारे आयोजित ‘पत्रकार अभ्यास दौरा’ मध्ये सहभाग.
• दिनांक २४ मार्च रोजी शाहिर रामचंद्र गुंडू
महाजन यांच्या ७ व्या स्मृतिदीन सोहळ्यात आम्हाला
‘महाजन ट्रस्ट’ तर्फे
राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध टेक्निकल
बुक्स लेखक बी. आर. महाजन, राज्य भोई समाज अध्यक्ष
एकनाथ काटकर, शाहू शिक्षण संस्थाचे मदन बोडके, कोल्हापूर महानगारपालिकाचे उपायुक्त संजय हेरवाड़े, रविन्द्र गायकवाड, वीरधवल शिंदे उपस्थित
होते.
• सातत्याने ‘निराली प्रकाशन पुणे’ यांच्या वार्षिक मिटींग्जमध्ये ‘प्रकाशन व्यवसाय, मार्केटिंग, व्यक्तिमत्व विकास’ या विषयानुरूप
व्याख्याने.
• कुटुंब सल्ला केंद्र राबविणाऱ्या ‘स्वाधार’ मुंबई आयोजित ‘प्रेम विवाहाला विरोध का होतो ?’ या विषयावरील चर्चासत्रात सहभाग.
• दिनांक ३ एप्रिल रोजी शिरगाव-चिपळूण येथील रहाटवाडी डोंगरात
असलेल्या निसर्गनिर्मित गुहेची पाहाणी केली. या गुहेत ७ फुट आत जाता येते.
साळींदरने माती उकरल्याने, अजून आत जाण्यासाठी माती
बाहेर काढ़ने आवश्यक आहे. गुहेत साळींदराचे काटे, डूकराचे दात, कोल्हयाची (JACKLE) विष्टा आढळली. ही गुहा
प्राण्याच्या आधिवासाचे ठिकाण असावे, असा प्राथमिक अंदाज या
पाहणीद्वारे काढण्यात आला.
• कोकणातील तरुण शिल्पकार संदीप ताम्हणकर, रोहन पवार, किरण घाणेकर यांच्या
कलेचे प्रदर्शन मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत दिनांक २३ ते २९ एप्रिल पर्यंत
भरलेले असताना या तरुण कलाकारांची ‘दैनिक सागर’करिता विशेष मुलाखत (प्रकाशन २३) घेतली.
• दिनांक १ मे रोजी वैयक्तिक ‘परमचिंतन अभ्यासिका’
सुरु केली.
• दिनांक ११ ते २६ मे दरम्यान हिमाचल प्रदेशातील
मनाली नजीकच्या ‘पतालशू’
येथे ट्रेकींग
आणि पर्वतारोहणानुभती, ‘एम.एस.एल. ४२०० मी.’ उंची आयुष्यात प्रथमच गाठली.
• बदलापूर येथील साप्ताहिक उल्हास प्रभात आणि
आरोग्य होमिओ फार्मेसी आयोजित राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ दीपावली अंक स्पर्धा २०१२
चा दुसरा क्रमांक चिपळूण येथील उर्ध्वाधर या दीपावली अंकास मिळाला. हा सन्मान
दिनांक २ जून रोजी समारंभपूर्वक संपादक धीरज वाटेकर यांनी स्वीकाराला.
• नामवंत अण्णा शिरगावकर यांच्या पत्नी ‘नंदिनी काकी’ यांच्या दिनांक ७
सप्टेंबर २०१२ ला झालेल्या दु:खद निधनानंतर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग तीन
वर्षे काढलेल्या पुस्तिकांचे संपादन.
• युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद
यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त खेड़ (जि. रत्नागिरी) येथील आय. सी. एस. क.
महाविद्यालयात दिनांक ८ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या
"स्वामी विवेकानंद संदेश यात्रा" दरम्यान "स्वामी विवेकानंद"
यांच्या जीवन चरित्रावर आमचे व्याख्यान झाले. यावेळी प्रा. देशमुख, अ.भा.वि.प. विभाग संघटनमंत्री विलास बोरसे आणि सुमारे ३००
विद्यार्थी उपस्थित होते.
• दिनांक ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ऐन
दिवाळीत चौकुळ-आंबोली (सावंतवाडी) जंगलात कोळशिंदा (ढोल / Wield Dog) याच्या टोळीसमवेत ''किल्लिंग अॅक्टिविटी''चा थरार अनुभवत तीन रानवेड्यानी (वन्यजीव अभ्यासक अभय काळे, निशिकान्त उर्फ़ नन्दु ताम्बे, धीरज वाटेकर) पाच
दिवस साहसी पदभ्रमण आणि छायाचित्रण मोहीम यशस्वी केली.
• दिनांक ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे
आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद संमेलन’ यात सहभाग.
• महाराष्ट्र शासनाने "क वर्ग पर्यटन
केन्द्र" असा दर्जा दिल्यानंतर, आम्ही लिहिलेल्या मठ, ता. लांजा येथील काजळी नदी तीरावरील गरम पाण्याच्या
कुण्डाची पार्श्वभूमी लाभलेले पर्यटन केन्द्र "श्रीक्षेत्र अवधूतवन" या
पुस्तकाचे दिनांक १६ डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन
झाले.
सन २०१२ (वय ३२ वर्षे)
• स्वामी विवेकानंद जयंतीदिनी धामनंद (ता. खेड)
येथील यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात ‘स्वामी विवेकानंद
आणि जीवनमूल्ये’ या विषयावर व्याख्यान.
• ‘शिवजयंती’दिनी दिनांक १९
फेब्रुवारीला सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांच्या जागृतीसाठी ‘अष्टपैलू ऑल स्पोर्ट्स अॅन्ड रिसर्च अॅकॅडमी चिपळूण’ संस्थेची देवरुख येथे स्थापना आणि उपाध्यक्ष म्हणून
जबाबदारी.
• सन २००२ साली झरेबांबर, ता. दोडामार्ग येथे घडलेल्या ‘तिहेरी हत्याकांड’वर मे महिन्यात लेखनाच्या
माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न, राज्यातील नामांकित वकिलांशी
चर्चा.
• दिनांक १२ ते १६ एप्रिल दरम्यान मुंबईच्या
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात संशोधित-संपादित ‘कोकण नकाशा’चे प्रकाशन. ऊर्ध्वाधर ग्रुपच्या स्टॉलची उभारणी. दिनांक १३
एप्रिल रोजी ई टी.व्ही. मराठी वर मुलाखत प्रसारित.
• मे महिन्यात, प्रयत्नांति
फेब्रुवारी २००८ पासून सुरु केलेल्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर, विसापूर (ता. गुहागर) गावातील जांभ्या दगडातील ६५.५० मीटर
निसर्गनिर्मित गुहेचा शोध घेण्यात यशस्वी.
• जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘झेप क्षितिजापलिकडे’
संस्थेच्या वतीने
पेढे पर्यटन केंद्रात ‘कार्यकर्ता संमेलन’ कार्यक्रमाचे आयोजन.
• दिनांक २६ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण
कर्नाटक राज्यात व्यावसायिक कारणास्तव प्रवास;
विविध अनेक
पर्यटन स्थळांना भेट, अभ्यास आणि छायाचित्रण.
• दिनांक १० जुलै रोजी रघुवीर घाट दर्शन, फोटोग्राफी आणि ट्रेकींग.
• दिनांक २६ ऑगस्ट रोजी चिपळूण तालुक्यातील ‘वीर-देवपाट’ येथे वर्षासहल आयोजन.
• ‘ऊर्ध्वाधर ग्रुप’च्या दुसऱ्या ऊर्ध्वाधर
दीपावली या ‘संपादित’
संग्राह्य
विशेषांकात ‘स्त्रीभ्रुण हत्या’ विषयावर राज्यातील सुमारे १०० लेखकांच्या माध्यमातून प्रकाश
टाकण्याचा प्रयत्न. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांचे शुभहस्ते
विशेषांकाचे प्रकाशन.
• वर्षभर ‘साप्ताहिक कोकण
एक्स्प्रेस’मध्ये ‘तथ्यांश’ सदर लेखन.
• दिनांक २७ ऑक्टोबर ते १३ नोव्हेम्बर दरम्यान
व्यावसायिक कामानिमित्त केलेल्या कर्नाटक राज्य भ्रमंतीत ‘अभ्यासपूर्ण पर्यटन दर्शन आणि छायाचित्रण’ उपक्रम.
• दिनांक २३ नोव्हेंबर रोजी ‘माधवबाग चिपळूण’ येथे ‘स्वामी विवेकानंद’ यावर व्याख्यान.
• दिनांक २ डिसेंबर ला ‘ADVANTAGE KOKAN’ या मुंबईतील कार्यशाळेत सहभाग.
• दिनांक १७ डिसेंबर रोजी को. ए. सो. प्राथमिक
शाळा महाड यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण समारोहास ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित आणि ‘स्नेह जोपासना’ या विषयावर विद्यार्थी
मार्गदर्शन.
• दिनांक २४ फेब्रुवारी रोजी ‘आंतरराष्ट्रीय पुरातत्वीय वारश्यात कोकणाची उपेक्षा’ मांडणारे लेखन ‘दैनिक लोकसत्ता’त प्रसिद्ध.
• मुंबई येथे संपन्न झालेल्या ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात सक्रीय सहभाग, विविध पर्यटन माहिती पत्रकांची निर्मिती-संपादन.
• मार्च महिन्यात बेळगाव येथे संपन्न झालेल्या ‘फार्माकोगोनसी’ विषयावरील आंतरराष्ट्रीय
परिषदेच्या निमित्ताने आयोजक संस्था के.एल.ई. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रकांत
कोकाटे यांच्याशी संवाद साधण्याची संधी.
• मार्च महिन्यात मुंबईत भरलेल्या ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात विविध पर्यटन प्रचार
पत्रकांचे, नकाशाचे संपादन आणि छायाचित्र प्रदर्शनीत
सहभाग.
• विविध संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ‘ऊर्ध्वाधर ग्रुप’ची निर्मिती आणि पहिल्या
ऊर्ध्वाधर दीपावली विशेषांकांचे संपादन आणि संपूर्ण महाराष्ट्रात वितरण.
• दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रिगल कॉलेज चिपळूण
येथे व्यक्तिमत्व विकास अंतर्गत ‘वाक्य आयुष्य घडवितात’ या विषयावर व्याख्यान.
सन २०१० (वय ३० वर्षे)
• ‘क्रोकोडाईल टुरिझमसाठी मालदोली बॅकवॉटर सर्वोत्तम’ असल्याची भूमिका ‘झेप क्षितिजापलिकडे’ तर्फे दिनांक ९-१० जानेवारीला आयोजित कार्यक्रमाद्वारे, माध्यमांच्या सहकार्याने जनमानसात पोहोचविण्यात यशस्वी.
• दिनांक १९ फेबुवारीला, चिपळूण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना आयोजित
छत्रपती शिवाजी महाराजांची ३८१ वी जयंती कार्यक्रमाचे आयोजन सहभाग.
• किल्ले प्रतापगडावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
व्याख्यानासाठी आले असता पोलादपूरच्या ‘यंग ब्लड अॅडव्हेन्चर’ संस्थेच्या सदस्यांसह त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी.
• जुलै / ऑगस्ट / सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक
कामानिमित्त केलेल्या संपूर्ण कर्नाटक राज्य भ्रमंतीत ‘अभ्यासपूर्ण पर्यटन दर्शन आणि छायाचित्रण’ उपक्रम.
• दिनांक ‘३० जानेवारी ते ७
फेब्रुवारी’ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या १९ व्या ‘वर्ल्ड बुक फेअर’ मध्ये सहभाग; देशभरातील वाचन संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न.
• दिनांक १८ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, नरीमन पॉइंट, मुंबई येथे संपन्न झालेल्या
‘ADVANTAGE KOKAN’ परिषदेत मान्यवरांना आम्ही टिपलेल्या निवडक १००
कोकणी निसर्गाच्या छटांच्या फ्रेम्स भेट.
• वर्षभरात ‘दैनिक कोकण एक्सप्रेस’मध्ये अनेक लेख आणि ‘तथ्यांश’ स्तंभलेखन प्रसिद्ध.
• मे महिन्यात कोळकेवाडी ता. चिपळूण येथे ‘साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबीर’ आयोजनात सहभाग.
• दिनांक २२ मे रोजी, गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे अ.भा.वि.प. रत्नागिरी
जिल्हा आयोजित शिदोरी शिबिरात ‘वाक्य आयुष्य घडवितात’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान.
• दिनांक २३ मे रोजी चिपळूण येथे संपन्न झालेल्या
‘रत्नागिरी व्हिजन २०२० परिषद’ कार्यक्रमात
सक्रीय सहभाग.
• मुंबईतील ‘लोकसंवाद यथार्थ’, पुणे येथील ‘पा. चिंतन आदेश’, कोल्हापूर येथील ‘साप्ताहिक करवीर काशी’ आणि चिपळूणातील कोकण एक्सप्रेस, मानस, कोकण नगरी आदि दीपावली
विशेषांकात सातत्याने विषयानुरूप लेखन.
• दिनांक १२ डिसेंबर रोजी अ.भा.वि.प. महाराष्ट्र
आणि स्वामी विवेकानंद संस्कार संस्था लातूर आयोजित ‘विद्यार्थी परिषद
पूर्व कार्यकर्ता संमेलन’ सहभाग.
सन २००९ (वय २९ वर्षे)
• जानेवारी महिन्यापासून सलग चार वर्षे दैनिक
लोकसत्ता येथे ‘चिपळूण वार्ताहर’ म्हणून काम, कोकणातील अनेक प्रश्नांना स्पर्श करणारे अभ्यासपूर्ण लेखन.
• कोकणातील जिल्ह्यांच्या नकाशाचे संपादन आणि
निर्मिती असलेल्या ‘कोकण व्हिजन’ दिनदर्शिकेचे
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात ‘पालवी’ या कोकण कृषी महोत्सवात
प्रकाशन.
• एप्रिल महिन्यात झालेल्या ‘झेप क्षितिजापलिकडे’
संस्थेच्या
रत्नागिरी येथे झालेल्या सभेत पुन्हा एकदा ‘संस्था सचिव’ म्हणून जबाबदारी.
• ‘कोकण व्हिजन’ परिषद मुंबई येथे सक्रीय
सहभाग, ‘कोकण विकास प्रकाशन’चा मुख्य समन्वयक.
• २२ ते २५ मे दरम्यान ‘झेप क्षितिजापलिकडे’
तर्फे ‘दिशा २००९’ करिअर फेअरचे आयोजन
सहभाग.
• ‘अभिव्यक्ती समर्थन’ पत्रकार संघटनेच्या
रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत ‘खजिनदार’ म्हणून नियुक्ती.
• कोकण विकासाचा जाहीरनामा जनतेपर्यंत
पोहोचविण्यासाठी, दिनांक १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान केळवा ते
वेंगुर्ला निघालेल्या ‘कोकण विकास यात्रा’ उपक्रमात सहभाग.
• सप्टेंबर महिन्यात अनाथाश्रम आणि गोशाळा
चालविणाऱ्या पिंपळी (ता. चिपळूण) येथील जीवन मुक्तीधाम संस्थेला ‘अभिव्यक्ती समर्थन’ जिल्हा शाखा रत्नागिरी
तर्फे पुस्तके भेट.
• नोव्हेंबर महिन्यात दैनिक पुढारीतून ‘महाराष्ट्राचा लेखाजोखा’
ही विशेष लेखमाला
प्रसिद्ध.
• पेढे-चिपळूण येथील श्रीपरशुराम निसर्ग
सानिद्ध्य पर्यटन केंद्रात दिनांक ‘स्वागत नववर्षाचे’ कार्यक्रम आणि ‘ध्यास २०२०’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन.
• दिनांक ९ व १० फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या
शिवाजी विद्यापीठात, अभिव्यक्ती समर्थन आयोजित राज्यस्तरीय
अधिवेशनात सक्रीय सहभाग.
• गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित पहिले
पुस्तक ‘चिपळूण तालुका पर्यटन’च्या अभ्यासपूर्ण लेखनाचा नामवंत इतिहास संशोधक निनाद
बेडेकर, अण्णा शिरगावकर, नामवंत लेखक प्र.
के. घाणेकर, कोकणचे बुद्धिवैभव आणि दैनिक सागरचे संस्थापक
संपादक निशिकांत जोशी, ‘पडछाया’कार स्तंभलेखक अप्पा सलागरे यांच्याकडून गौरव.
• दिनांक १० ते १९ मे दरम्यान मुंबई येथे
झालेल्या कोकण व्हिजन महोत्सवात ‘श्रीपरशुराम तीर्थक्षेत्र
दर्शन’ या दुसऱ्या पुस्तिकेचे नामवंत कला दिग्दर्शक
नितीन देसाई, ना. सुनील तटकरे, लोकशाहीर विठ्ठल
उमप, शासनाचे निवृत्त मुख्य सचिव द. म. सुकथनकर
यांच्या हस्ते प्रकाशन.
• जुलै महिन्यात मुलुंड येथे संपन्न झालेल्या ७
व्या गिरीमित्र संमेलनात सहभाग.
• ‘मस्त भटकंती’ मासिकाकडून सप्टेंबर २००८
च्या अंकात ‘चिपळूण तालुका पर्यटन’ आणि ‘श्रीपरशुराम तीर्थ
क्षेत्र दर्शन’ पुस्तकांची दखल.
• दिनांक २० ते २३ सप्टेंबर दरम्यान
माउंटआबू-राजस्थान येथे ‘ब्रम्हकुमारीज’ परिवार आयोजित ‘NATIONAL
MEDIA CONFERENCE’ मध्ये सहभाग.
• वर्षभरात दैनिक पुढारीत, ‘जैवविविधतेच्या संवर्धनासाठी’, ‘कोकण : वेध
भविष्याचा’, आदि विशेष लेखमाला प्रसिद्ध.
• नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या समर्थन
वार्तापत्रात ‘ग्रामीण पत्रकाराची अनुभव लेखणी’ याअंतर्गत सहकार क्षेत्रातील नोकरभरतीतील भ्रष्टाचाराबाबत ‘सहकारातील स्वाहाकार’
हा विशेष लेख
प्रसिद्ध.
• जानेवारी महिन्यात मालगुंड येथे आयोजित
जलसाहित्य संमेलनात ‘कोयना अवजल : कोकणातील पाणी समस्येवरील एक उपाय’ या टेलिफिल्मचे प्रसारण.
• भुदरगड,
ता. कोल्हापूर
येथील मौनी गुरुकुल परिसरातील ‘तांब्याचीवाडी आणि भटवाडी’ जंगलात जानेवारी २००७ मध्ये अभ्यासपूर्ण भटकंती आणि
डॉक्युमेंटरी निर्मिती.
• गिरीमित्र प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून, खाजगी मालकीत अडकलेल्या ‘किल्ले गोपाळगड’च्या शासकीय नोंदीसाठी प्रयत्न सुरु असताना या विषयास खंबीर
पाठिंबा म्हणून वृत्तपत्रातून सातत्याने लेखन.
• फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेल्या ‘रत्नागिरी इन्फो डॉट कॉम’ ह्या वेबसाईटच्या
निर्मितीत सहभाग.
• केळशी ता. दापोली येथील सागरी महामार्ग
निर्मिती दरम्यान राज्य शासनाकडून कापल्या गेलेल्या ‘निश्चित कालमापन असलेली त्सुनामी निर्मित जगातील एकमेव
वाळूची टेकडी’च्या संरक्षणार्थ शासनाच्या विरोधात सातत्याने
लेखन.
• दिनांक १३ व १४ मे रोजी रोजी ‘अभिव्यक्ती समर्थन’ तर्फे महाबळेश्वर येथे
आयोजित राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेत सहभाग.
• जुलै महिन्यात मुलुंड येथे संपन्न झालेल्या ६
व्या गिरीमित्र संमेलनात सहभाग.
• ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या समर्थन
वार्तापत्रात ‘ग्रामीण पत्रकाराची अनुभव लेखणी’ याअंतर्गत ‘केळशीतील सागरी महामार्ग
निर्मितीचा प्रश्न’ हा विशेष लेख प्रसिद्ध
• नव्याने सुरु झालेल्या पेढे-चिपळूण येथील
श्रीपरशुराम निसर्ग सानिद्ध्य पर्यटन केंद्राच्या वाढीसाठी, सप्टेंबरपासून पर्यटक यावेत यासाठी सक्रीय सहकार्य सुरु.
• २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘अभिव्यक्ती समर्थन’ तर्फे उसगाव-डोंगरी, वसई येथे आयोजित राज्यस्तरीय ‘पोलीस यंत्रणेतील सुधारणा’ कार्यशाळेत
सहभाग.
• ‘आपले जग : ग्राहक विश्व’,
‘लोकसंवाद यथार्थ’, ‘चौफेर साक्षीदार’, मानस, आदि दीपावली अंकात लेखन.
• २७ व २८ नोव्हेंबर रोजी ‘अभिव्यक्ती समर्थन’ तर्फे नागपूर येथे
जनमित्र पोलीस अभियानांतर्गत आयोजित पत्रकारांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभाग
आणि हिवाळी अधिवेशनास भेट.
• दिनांक १४ व १५ डिसेंबर रोजी ‘अभिव्यक्ती समर्थन’ आयोजित अलिबाग येथील ‘नीती, नियोजन व अंमलबजावणी’ अभ्यास कार्यशाळेत सहभाग आणि दैनिक पुढारीत, ‘जिल्हा विकास : नीती,
नियोजन व
अंमलबजावणी’ ही विशेष लेखमाला प्रसिद्ध.
• २३ डिसेंबर रोजी ‘अभिव्यक्ती समर्थन’ तर्फे ‘जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा’ आयोजनात सहभाग.
सन २००६ (वय २६ वर्षे)
• ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र पेढे-चिपळूण’च्या स्थापनेत सक्रीय सहभाग.
• अर्थसंकल्पीय टिपण लेखनात नावाजलेल्या, समर्थन, मुंबई संस्थेकरिता ‘महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडून कोकणच्या अपेक्षा’ या विषयावर वर्ष २००६-०७ करिता लेखन.
• दिनांक १७ ऑक्टोबर रोजी मुंबई-माटुंगा येथील
यशवंत नाट्यमंदिरात संपन्न झालेल्या महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या
राज्यव्यापी अधिवेशनात सक्रीय सहभाग आणि लेखन.
• केळशी ता. दापोली येथील ‘निश्चित कालमापन असलेली त्सुनामी निर्मित जगातील एकमेव
वाळूची टेकडी’ची माहिती देणाऱ्या टेलिफिल्मची निर्मिती आणि
दिनांक १० डिसेंबर ला ब्राह्मण सहाय्यक संघ,
चिपळूण येथे
कार्यक्रमात प्रथम प्रसारण.
सन २००५ (वय २५ वर्षे)
• सह्याद्री कला क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने १५ व
१६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय
अॅथलेटिक्स स्पर्धेच्या आयोजनात सहभाग आणि स्पर्धा कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन.
• दिनांक १२ फेब्रुवारी रोजी चिपळूणच्या
गुरुदक्षिणा सभागृहात ‘कीज ऑफ सक्सेस लाईफ’ व्याख्यानाचे आयोजन.
• कोकण दर्शन पर्यटन सहकारी संस्था, चिपळूण मध्ये ‘मानद सचिव’ म्हणून नियुक्तीपत्र.
• मासिक शांतीदूत, चिपळूण येथे ‘कार्यकारी संपादक’ म्हणून कार्यरत.
• ‘ऐतिहासिकतेच्या शोधात...’ गुढे, ता. चिपळूण येथील गढीला भेट आणि अभ्यासपूर्ण लेखन.
• फेब्रुवारी महिन्यात चिपळूणात झालेल्या बॉम्बे
नॅचरल हिस्ट्री सोसायटी आयोजित ‘राज्यस्तरीय सागरी कासव
संरक्षण मोहीम’ कार्यशाळेत सक्रीय सहभाग.
• दिनांक २७ फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन
रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या ‘माजी विद्यार्थी मेळावा’ सक्रीय सहभाग, ‘कोयना अवजल : कोकणातील
पाणी समस्येवरील एक उपाय’ या ‘लिखित आणि दिग्दर्शित’
टेलिफिल्मचे
प्रसारण आणि मेळावा लेखन.
• महाराष्ट्र शासनाच्या ‘जलस्वराज्य’ प्रकल्पात जनजागृती
संस्थांतर्गत ‘अभियंता’
म्हणून सक्रीय
सहभाग, खेड, दापोली, मंडणगड, संगमेश्वर तालुक्यातील गावात
काम.
• दिनांक १४ एप्रिल रोजी दैनिक पुढारीने प्रसिद्ध
केलेल्या ‘पहिला भीम आम्ही...विशेष !’ पुरवणीत ‘चिपळूणातील राजगृह
जोपासतेय, डॉ. आंबेडकरांच्या आठवणी !’ हा अभ्यासपूर्ण ऐतिहासिक लेख प्रसिद्ध.
• दिनांक २४ एप्रिल ते १ मे दरम्यान
कोकण-कोल्हापूर विभागातील ५ जिल्हे, २९ तालुके, ७८ शाळा, १४१ वर्ग, २२५ शिक्षक, ३७ ग्रामशिक्षण समित्या, २२२ विद्यार्थी, ३५ पालक, ३८ क्षेत्र अधिकारी यांच्याशी संवाद साधून बनविण्यात
आलेल्या, महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन लेखन हमी प्रकल्प : एक अवलोकन’ या टेलिफिल्म निर्मितीत ‘कॅमेरामन’ म्हणून सहभाग.
• दिनांक १२ जून रोजी, नाशिकच्या आर. आर. पाटील शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या
वतीने आम्ही संस्थापक-सचिव म्हणून कार्यरत असलेल्या ‘जी.पी.ई.एस.आर.आय.’ संस्थेला, माजी परीवहनमंत्री प्रशांत हिरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय
स्वाभिमान पुरस्कार प्रदान.
• नोव्हेंबर महिन्यात ‘झेप क्षितिजापलिकडे’
तर्फे ‘माध्यम २००५’ स्नेहमेळाव्याचे आयोजन.
• वर्षभरात दैनिक पुढारीत, ‘संरक्षण आंबा मोहोराचे’,
‘चाहूल गणेशाची’, ‘आला शिमगा’ आदि विशेष लेखमाला
प्रसिद्ध.
• वर्षभर साप्ताहिक कोकण एक्सप्रेसमध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम दि हार्ट’
स्तंभलेखन
प्रसिद्ध.
• दिनांक ८,
९ डिसेंबर रोजी, समर्थन आयोजित नागपूर येथील हिवाळी अधिवेशनास भेट आणि
निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभाग.
सन २००४ (वय २४ वर्षे)
• चिपळूण तालुका प्रेस क्लब तर्फे विविध पुरस्कार
मिळाल्याबद्दल ‘पत्रकार दिन’ कार्यक्रमात
सत्कार.
• भारत सरकारच्या वतीने नेहरू युवा केंद्रामार्फत
दिला जाणारा ‘उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार’ १२ जानेवारी रोजी स्वीकारला.
• दिनांक ३१ जानेवारी रोजी, रत्नागिरी जिल्ह्याची पर्यटन श्रीमंती सर्वांसमोर यावी
याकरिता बनविलेल्या ७३ मिनिटांच्या, रत्नागिरीत
कार्यक्रमाद्वारे प्रथम प्रसारित ‘RATNAGIRI
DISTRICT TOURISM DOCUMENTRY’ चे संहिता लेखन.
• मे महिन्यात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३४७
व्या जयंतीदिनी स्मारकास भेट, लेखन.
• दिनांक २६ जून रोजी अलोरे (ता. चिपळूण) येथे
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम.
• १८ जुलै रोजी सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत
आयुर्वेद महाविद्यालयात, पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यावतीने ‘कोयना अवजल :
कोकणातील पाणी समस्येवरील एक उपाय’ ही ‘लिखित आणि दिग्दर्शित’
टेलिफिल्म प्रथम
प्रदर्शित.
• सातत्याने पावसाळी वातावरणात वर्षा सहलींचे
आयोजन.
• एप्रिल महिन्यात साप्ताहिक गोळीबार मध्ये ‘ओळख कोयना प्रकल्पाची’
लेखमाला
प्रसिद्ध.
• मे महिन्यात, नाशिक येथील
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेली एम.ए. समकक्ष ‘साहित्यभूषण’ पदवी परीक्षा उत्तीर्ण.
• वर्षभर साप्ताहिक कोकण एक्सप्रेसमध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम दि हार्ट’
आणि साप्ताहिक
गोळीबारमध्ये ‘झंझावात’
स्तंभलेखन
प्रसिद्ध.
• दिनांक ८ ऑगस्ट रोजी ‘झेप क्षितिजापलिकडे’
संस्थेच्या
पहिल्या वर्धापनदिनी शिवथरघळ येथे ‘संस्था सचिव’ म्हणून घोषणा, प्रथम वर्धापन दिन
विशेषांकाचे प्रकाशन (संपादन)
• दिनांक ८ ऑगस्ट रोजी शिवथरघळ आणि जावळीच्या
अरण्यमय खोऱ्यात ‘झेप क्षितिजापलिकडे’ तर्फे चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे अवशेष संशोधन आणि
पदभ्रमण मोहीम.
• सप्टेंबर महिन्यात, ‘श्रमिक सहयोग’ आयोजित ‘वंचित घटकातील मुलांचे शिक्षण’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभाग.
• सप्टेंबर महिन्यात ‘झेप क्षितिजापलिकडे’
तर्फे ‘आरोहणाचा अश्वमेध’ कार्यक्रमाचे आयोजन.
• नोव्हेंबर महिन्यात पोफळी (ता. चिपळूण) येथे ‘मी यशस्वी होणारंच !’
कार्यशाळा आयोजन.
• ३ डिसेंबर ते २ जानेवारी २००५ दरम्यान ‘दापोली आणि गुहागर’ परिसरात कोकण पर्यटन
विकास संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित ‘कोकण बॅकवॉटर महोत्सव’
आयोजनात सक्रीय
सहभाग.
सन २००३ (वय २३ वर्षे)
• दैनिक पुढारीत ‘पत्रकार’ म्हणून कार्यरत असताना दिनांक २६ जानेवारी रोजी ‘सुभाषबाबूंच्या सहवासातील रम्य त्या आठवणी’ हा विशेष लेख ‘बहार’ पुरवणीत प्रसिध्द.
• दैनिक पुढारीत दिनांक ४ मार्च रोजी ‘कुंभार्लीतील महाकाली जत्रोत्सव : एक दृष्टीक्षेप’ या विषयावर पूर्ण एक पान पुरवणी प्रकाशित.
• २० एप्रिल रोजी कोकणात रचनात्मक उपक्रम
राबविण्यासाठी ‘झेप क्षितिजापलिकडे’ संस्थेची स्थापना, संस्था सदस्य म्हणून
कार्यरत.
• दिनांक १५ जून रोजी अलोरे (ता. चिपळूण) येथे
एकदिवशीय मानसशास्त्रीय ‘आर्ट ऑफ थिंकिंग’ कार्यशाळेचे आयोजन, १२५ जणांची उपस्थिती.
• ऑगस्ट महिन्यात ‘झेप
क्षितिजापलिकडे’ तर्फे रत्नागिरीत एक दिवशीय मानसशास्त्रीय
कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.
• स्वत: अभियंता आणि भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याप्रति विशेष आदर
असल्याकारणाने, विचारपूर्वक दैनिक
पुढारीच्या माध्यमातून अभियंता दिन विशेषांक ही १६ पानी पुरवणी (टॅब्यूलर आकार)
काढण्यात पुढाकार घेतला. अंकात भरभरून लेखन केले, त्याबद्दल दिनांक
१५ सप्टेंबरला कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत पोफळी वीज मंडळात विशेष गौरव
करण्यात आला. विशेष म्हणजे तेव्हापासून सर्वत्र या विषयावर पुरवण्या निघू लागल्या, पुढे ८ वर्षे पुढारी परिवाराच्या सहकार्याने ही पुरवणी सुरु राहिली, आम्ही सक्रीय योगदान देत राहिलो.
• दिनांक २८ सप्टेंबर रोजी पोफळी (ता. चिपळूण)
येथे एकदिवशीय मानसशास्त्रीय ‘हस्ताक्षर सुधार व कोलाज
निर्मिती’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन, ३०० शालेय विद्यार्थी सहभाग.
• ऑक्टोबर महिन्यात साप्ताहिक ‘कोकणाचा कॅलिफोर्निया’
मुंबई यांनी ‘अष्टपैलू वैभव’ पुरस्कार जाहीर केला.
• दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पोफळी (ता. चिपळूण)
येथे एकदिवशीय मानसशास्त्रीय ‘बुद्धिप्रामाण्य वर्तन
शिबीर’चे यशस्वी आयोजन.
• समाजाच्या विविध क्षेत्रात संशोधनात्मक
समाजकार्य करण्यासाठी ‘जी.पी.ई.एस.आर.आय.’ या संस्थेची चिपळूण येथे स्थापना आणि संस्था सचिव म्हणून
सलग ६ वर्षे (सन २००८ पर्यंत) सक्रीय सहभाग.
• दैनिक पुढारीत ‘पत्रकार’ म्हणून कार्यरत असताना ‘आपलं कोकण आणि अक्षर कोकण’ पुरवणीत अनेक विशेष लेख प्रसिध्द.
सन २००२ (वय २२ वर्षे)
• मे महिन्यात, अलोरे, चिपळूण येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे
इत्यंभूत आणि सर्वंकष वृत्तांकन केल्याबद्दल ‘दैनिक पुढारी चा पत्रकार’ म्हणून गौरव.
• दैनिक पुढारीच्या ज्या ‘विश्वसंचार’ पुरवणीतील कात्रणे
लहानपणी काढू लागलो, त्याच पुरवणीत यावर्षी ‘शिरगावमध्ये भगव्या रंगाचे दुर्मीळ वटवाघूळ’ ही ‘बायलाईन’ बातमी प्रसिद्ध झाली.
• दैनिक पुढारीत या वर्षात ‘विकास कोकणाचा’, ‘दुभंगलेली सय्यदवाडी’, ‘प्रेक्षणीय चिपळूण’ घडलेल्या घटनांचा ‘मागोवा’, ‘कोयना प्रकल्पातून’, ‘महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वेक्षण’ या लेखमाला प्रसिद्ध.
• जुलै महिन्यात पत्रकार मारहाण प्रकरणी दैनिक
पुढारीचा ‘पत्रकार’
म्हणून उपोषणात
सहभाग.
• दिनांक १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्ताने
लिहिलेला ‘अंगारक योग साधून येणारा यंदाचा गणेशोत्सव आगळा’ हा लेख दैनिक लोकसत्तात प्रसिद्ध !
• दीपावलीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर
पत्रसंवादाच्या माध्यमातून समाजातील शेकडो मान्यवरांना दीपावली शुभचिंतन करताना
विविध विषयांवर सकारात्मक विचारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न
सुरु...आजतागायत सतत गेली १६ वर्षे कार्यरत.
• नोव्हेंबर २००२ मध्ये चिपळूण येथे संपन्न
झालेल्या जगद्गुरु तुकोबाराय साहित्य संमेलनात ‘प्रसार माध्यमे
आणि साहित्य’ या विषयावरील परिसंवादात चित्रलेखाचे संपादक
ज्ञानेश महाराव आणि दैनिक जनमुद्राचे संपादक कैलाश म्हापदी यांच्यासोबत सहभाग.
संमेलनात प्रसिद्ध झालेल्या ‘तुकोबावाणी’ या विशेषांकाची ‘सहसंपादक’ म्हणून जबाबदारी, दोन विशेष लेख
प्रसिद्ध.
सन २००१ (वय २१ वर्षे)
• ‘...आणि शिवचरणाशी सहस्रकाचा उदय झाला’ नव्या शतकाचा पहिला सूर्योदय शिवतीर्थ किल्ले रायगडावर
अनुभवला, लेखन.
• ‘अभाविप’ आयोजित स्वामी विवेकानंद
जयंती, युवक सप्ताह निमित्ताने प्रा. जोगेन्द्रसिंह
बिसेन यांच्या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
• जानेवारी महिन्यात आकाशवाणी रत्नागिरी आयोजित ‘युवा महोत्सव’ कार्यक्रमात ‘युवकांच्या दृष्टीकोनातून देशासमोरील प्रश्न’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत ‘शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी’ कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून सहभाग.
• फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी आकाशवाणी
केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ‘युवावाणी’ कार्यक्रमात ‘ठळक घडामोडी’ सांगण्यासाठी निवड.
• दिनांक १८ एप्रिल रोजी, महाराष्ट्रातील तंत्रनिकेतन स्तरावरील पेपरफुटी प्रकरणी
रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘अभाविप’तर्फे तीव्र निदर्शने. परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा
निर्णय.
• जून महिन्यात पदवी परीक्षेतील पुनर्मुल्यांकन
सुविधा पुढे सुरु राहावी म्हणून रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासमोर ‘अभाविप’तर्फे निदर्शने, कार्यकर्ता म्हणून सहभाग.
• पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘चिंतन आदेश’ पाक्षिकाने १८ ते ३०
वर्षे या युवा गटासाठी घेतलेल्या घेतलेल्या ‘आजचे राजकारण आणि आम्ही’ या विषयावरील लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक.
• कोल्हापूरच्या ‘साप्ताहिक करवीर
काशी’ दीपावली अंकात प्रसिद्द ‘आधि अध्यात्म मगच विज्ञान हेच खरे’ या लेखास अनेक उत्तम अभिप्राय.
सन २००० (वय २० वर्षे)
• मे २००० मध्ये तिवडी (ता. चिपळूण) येथे निसर्ग
सहवास शिबीर आयोजनात सक्रीय.
• राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ‘प्रतिभासंगम’ प्रचारार्थ सातत्यपूर्ण
लेखन.
• जुलै महिन्यात झालेल्या ‘अभाविप’च्या शहर अभ्यासवर्गात
प्रसिद्धी आणि टी.एस.व्ही.पी. प्रमुख म्हणून जबाबदारी.
• मुंबईतील विद्या प्रभुदेसाई महिलेस जीवंत
जाळल्याप्रकरणी, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘अभाविप’तर्फे तीव्र निदर्शने,
कार्यकर्ता
म्हणून सहभाग.
• २२ ते २४ सप्टेंबर २००० दरम्यान नांदेड येथे
संपन्न झालेल्या ‘प्रतिभासंगम’ संमेलनात सहभाग.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी, ‘अभाविप’ आयोजित अभ्यासमंडळात, ‘डॉ. आंबेडकर’ या विषयावर मांडणी.
• मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचातर्फे २५
डिसेंबर रोजी लेखन स्पर्धेतील यशाकरिता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्मृती लेखन गौरवपत्र’.
सन १९९९ (वय १९ वर्षे)
• राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ‘प्रतिभासंगम’ प्रचारार्थ सातत्यपूर्ण
लेखन.
• साहित्य कलायात्री पुणे निर्मित ‘साहित्यिक डायरी’त युवा साहित्यिक म्हणून
गौरव.
सन १९९८ (वय १८ वर्षे)
• विविध वृत्तपत्रातून ‘वाचकांचा पत्रव्यवहार’
सदरांतर्गत
लेखनास प्रारंभ.
• मार्च महिन्यात भारतीय मानव समाज विकास केंद्र
औरंगाबाद तर्फे घेण्यात आलेल्या टपालाद्वारे पत्रकारिता प्रशिक्षण कोर्स
यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ‘पत्रभूषण पुरस्कार’ने सन्मानित.
• जुलै महिन्यात शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी
येथे अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एस. टी. पास सवलत बंद
केल्याप्रकरणी, ती पूर्ववत चालू करावी या मागणीसाठी एस. टी.
विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर ‘अभाविप’तर्फे निदर्शने, कार्यकर्ता म्हणून सहभाग.
• दिनांक ७ सप्टेंबर रोजी ‘प्रतिभासंगम का ? व कशासाठी ?’ हा पहिला लेख स्थानिक वृत्तपत्रातून (दैनिक सागर आणि दैनिक
रत्नागिरी एक्स्प्रेस) प्रसिद्ध.
• पुणे येथील राज्यस्तरीय ‘प्रतिभासंगम’ युवा साहित्य संमेलनाचा ‘रत्नागिरी जिल्हाप्रमुख’
जबाबदारी.
• साप्ताहिक ‘मिलाप’ दीपावली अंकात ‘शिमगा’ ही पहिली कथा प्रसिद्ध.
• साप्ताहिक प्रजारक्षक दीपावली अंकात पहिल्यांदा कविता ‘कधी काळी लग्न करणार असलीस तर...!’ प्रसिद्ध.
सन १९९७ (वय १७ वर्षे)
• सातत्याने लेखन प्रांतात कार्यरत राहण्याच्या
विचारात असताना, रत्नागिरीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या
राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ‘प्रतिभासंगम’ आणि पर्यायाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता
म्हणून सामाजिक कामास सुरुवात.
सन १९९६ (वय १६ वर्षे)
• महत्वपूर्ण कात्रणांचे संकलन करण्यास, विशेषतः विविध व्यक्तिचित्रे जमविण्यास सुरुवात, वाचनाची आवड.
सन १९९४ (वय १४ वर्षे)
• नवव्या इयत्तेत शिकत असताना ‘आश्चर्य वाटते’ या पहिल्या कवितेचे लेखन.
सन १९८८ / १९८९ (वय ८/९ वर्षे)
• वयाच्या ८-९ व्या वर्षापासून आवडलेली विविध
कात्रणे, रंगीबेरंगी चित्रे कापून ठेवणे, माचीसचे रिकामे बॉक्स जमविणे आदि छंद
जडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा