लेखकाचा परिचय

वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून विचारप्रवण लेखन करणाऱ्या मला, लेखन आणि सामाजिक क्षेत्रातील सहभागाबद्दल, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने २००४ साली उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. सन १९९७ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमधून मी सामाजिक कार्य, लेखन आणि बरेच काही काम सुरु केले त्याला आज २५+ वर्षांचा कालावधी लोटला आहे. सलग १४ वर्षे मी, दैनिक कोकण गर्जना, पुढारी, लोकसत्ता यांकरिता ग्रामीण पत्रकारिता, १९ वर्षे डायरी लेखन, विविध अभ्यासदौरे, गुहा संशोधन, पर्यटन, संशोधन अभ्यास, जंगल भ्रमण या करिता हिमाचल ते कन्याकुमारी असा भारतभर प्रवास केला आहे. याद्वारे जमा झालेला किमान ३० हजार वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल फोटोंचा संग्रह माझ्याकडे आहे. पर्यावरण संवर्धन, बिगरमौसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियानपर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण कार्यात माझा सतत सक्रिय सहभाग असतो. चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही ५ पर्यटन पुस्तके आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी, जनी जनार्दन या ४ चरित्र पुस्तकांचे लेखन मी केले आहे. 

'जनी जनार्दन' हे 'देवमाणूस' या उपाधीने गौरविलेले, 'विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक' स्वर्गीय आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांचे जीवनचरित्र आहे. आजच्या काळात जणू दंतकथा वाटावे असे तात्यांचे संपूर्ण चरित्र या ७०८ पानांच्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रथमच वाचकांसमोर आले आहे. तरुणाईला आयुष्यभर पुरेल इतकी संस्काराची शिदोरी या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध झाली आहे.  

गेट वे ऑफ दाभोळआणि वाशिष्टीच्या तीरावरूनया दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थया पुस्तकाचे संपादन तसेच आजपर्यंत विविध विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक आदि सुमारे २० अंक आणि पुस्तिकांचे संपादनही करण्याची संधीही मला यापूर्वी मिळालेली आहे. माझ्याकडे स्वतःचा वैयक्तित संदर्भ कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, "परमचिंतन" अभ्यासिका आणि वस्तूसंग्रहालय (निवडक दुर्मीळ) असून संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन (१२ हजार प्रतींचे वितरण) मी केले आहे. राज्यभरातील विविध नियतकालिकतून गेल्या २० वर्षांत, विविध विषयांवरील, माझे सुमारे २००० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटन" पुस्तकास कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा नलगे ग्रंथ पुरस्कार, सप्टेंबर २०१६ ला माय अर्थ फौंडेशनतर्फे पर्यावरण भूषणपुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष गौरव, ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वरतर्फे दिनांक ७ जानेवारी २०१८ रोजी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०१८प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून दिनांक २९ जून २०१८ रोजी 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आले. 

सततचा प्रवास, ‘अ.भा.वि.प.चे विद्यार्थीदशेतील काम, वाचन, लेखन, अभ्यास, समाजमनाकडे पाहण्याची चिकित्सकदृष्टी, संस्कारक्षम वयात आई-वडिलांनी केलेले संस्कार यातूनच माझी संपूर्ण जडणघडण झाली आहे.

नाव : धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर, रा. चिपळूण (वय  वर्षे)

शिक्षण : डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग, पत्रभूषण (औरंगाबाद), साहित्यभूषण (नासिक),E.M.B.A. (Marketing Management & Travel and Tourism Management)

पत्ता : विधिलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.                      

मो.  : ९८६०३६०९४८. 

ईमेल : dheerajwatekar@gmail.com     

प्रसन्न प्रवासया नावे (dheerajwatekar.blogspot.in) ब्लॉगलेखन

वर्तमान कार्यक्षेत्र  :

 लेखकसंपादकमुक्तपत्रकार आणि छायाचित्रकारपर्यटन-पर्यावरण अभ्यासक.

 कोकण आणि गोवा विभागप्रमुखनिराली प्रकाशनपुणे.

 खाजगी स्थापत्य अभियंता.

 कार्य विशेष :

 आजतागायत सतत २० वर्षे विविध सामाजिक कामात सहभाग.

 सलग १४ वर्षे दैनिक लोकसत्तादैनिक पुढारीदैनिक कोकण गर्जना करिता ग्रामीण पत्रकारिता.

 गेली  वर्षे डायरी लेखन.

 वैयक्तित संदर्भ कात्रणसंग्रहसंशोधन ग्रंथालय, "परमचिंतनअभ्यासिका आणि वस्तूसंग्रहालय.

 विविध अभ्यासदौरे, गुहा संशोधनपर्यटन अध्ययनसंशोधन, अभ्यासजंगलभ्रमण याकरिता हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान असा भारतभर आणि सन २०१८ साली भूतान देशाचा प्रवास.

 पर्यावरण संवर्धनबिगरमौसमी जंगलपेर अभियानवृक्ष लागवडबीज पेरणी अभियानचंदन लागवड अभियान,  पर्यावरण जनजागृतीरमणीय निसर्ग छायाचित्रण कार्यात सतत सक्रीय सहभाग.

 चिपळूण तालुका पर्यटनश्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी  इंग्रजी)श्रीक्षेत्र अवधूतवनठोसेघर पर्यटन  या  पर्यटक प्रिय पुस्तकांचे लेखन.

 ग्रामसेवक ते समाजसेवकप्राथमिक शिक्षणातील कर्मयोगीकृतार्थीनी या  चरित्र पुस्तकांचे लेखन.

 कोकणचे नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर लिखित गेट वे ऑफ दाभोळ’ आणि वाशिष्टीच्या तीरावरूनशेवचिवडा या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या पुस्तकाचे संपादन.

 विविध विशेषांकस्मरणिकागौरव अंक आदि सुमारे २० अंक आणि पुस्तिकांचे संपादन.

 व्रतस्थ (अण्णासाहेब शिरगावकरआणि अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले (संदीप भानुदास तापकीरया दोन पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन. 

 कोकणसह देशभरातील विषयवार सुमारे २५ हजार डिजिटल फोटोजचे कलेक्शन.

 संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती  संपादन (१२ हजार प्रतींचे यशस्वी वितरण)

 सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या १० टेलिफिल्म्सची निर्मिती.

 राज्यभरातील प्रसिद्ध विविध नियतकालिकतून  हजारहून अधिक लेख प्रसिद्ध.

 युवा व्यक्तिमत्व विकासपर्यावरण संवर्धन विषयक व्याख्याने.

कार्य गौरव :

 सन २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा "उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कारने सन्मानित.

 सन २०१६ साली पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटनपुस्तकास "कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा नलगे ग्रंथ पुरस्कार’.

 सप्टेंबर २०१६ ला पुण्याच्या माय अर्थ फौंडेशनतर्फे पर्यावरण भूषण” पुरस्काराने सन्मानित.

 नोव्हेंबर २०१६ ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेपद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष कार्यगौरव.

 विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे  जानेवारी २०१८ रोजी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०१८’ ने सन्मानित.

 संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉविनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटरया स्वयंसेवी संस्थेकडून दिनांक २९ जून २०१८ रोजी 'प्रकाशाचे बेट' या पुरस्काराने सन्मानित.

•  दिनांक २१ जुलै २०१९ : चिपळूण येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथालय चळवळीत सक्रीय असलेल्या आणि समाजात ग्रंथप्रेम वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'पासाने वकील ग्रंथमित्र पुरस्कारमान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारलाधीरज वाटेकर यांच्यासारख्या ग्रंथमित्राचा पुरस्काराने सन्मान होतोय ही वाचनालयासाठी गौरवाची संधी असल्याची भावना ग्रंथालयाचे अध्यक्षनामवंत कवी अरुण इंगवले यांनी व्यक्त केली.   


•  दिनांक २४ जुलै २०२३ : सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुण्यातील हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणारा 'पर्यावरण दूत' पुरस्कार आम्ही (धीरज वाटेकर) विद्यापीठ सभागृहात कुलगुरू डॉ. राजनीश के. कामत यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुण्याच्या हरित मित्र परिवार लोक विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. के. वडजे, प्र. कुलगुरू जी. एस. कांबळे, कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...