मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

स्थिरचित्तयुक्त सकारात्मक चिरनिद्रेच्या दिशेने...

स्थिरचित्तयुक्त सकारात्मक चिरनिद्रेच्या दिशेने...
(येईल तेव्हा येईल...चिंतन आदेश)



दुनिया के रैन बसेरे मै, पता नाही कितने दिन रहना  है ?
जीत लो सबके दिलों को, बस यही जीवन का गहना है

जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला मरण अटळ आहे. "जन्माला कसे, कुठे, कधी यावे ?" हे कदाचित फारसे आपल्या हातात नसेल, परंतु स्वत:सह समाजाला उर्जा प्रदान करणारा, समाजमनाला चटका लावून जाणारा स्थिरचित्तयुक्त  सकारात्मक मृत्यू आपण आपल्या जीवित कर्मातून नक्कीच प्राप्त करून घेऊ शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीत मृत्यूचे ज्ञा काळाअगोदर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, या मागे विज्ञा आहे, "कर भला, तो हो भला" प्रकारचे कर्म आहे.कथनी आणि करणीयांना सदैव एकत्र घेवून चालणारी जीवनपद्धती आहे. मी तुमच्या सोबत आहे आणि मृत्युनंतरही सदैव सोबत कार्यरत असेन...” हे वाक्य बोलायला म्हणून खूप सोपे आहे. परंतु हे वाक्य जगायला खूप मोठी आंतरिक उर्जा, तळमळ, ताकद, विलक्षण जीवन साकारण्याची क्षमता आपल्यात असायला हवी ! आपले जीवित कार्य त्यादिशेने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सदैव कार्यरत असायला हवे, आपल्या वर्तमान कामाप्रती आपल्याला प्रचंड आत्मविश्वास असायला हवा, तरच आपण हे विधान करू शकतो. आणि या विधानाला अधिन राहून जगणे म्हणजे  स्थिरचित्तयुक्त सकारात्मक चिरनिद्रेच्या दिशेने... सदैव कार्यरत राहाणे होय.

सत्वस्थ  चढती  उंचमध्ये  राजस  राहती
 
हीन वृतीत वागूनी, जाती तामस खालती   

असे गीताईने म्हटले आहे. या भूतलावर जन्मलेले सर्व जीव विशिष्ट वेळी जन्माला येतात,  विशिष्ट रितीने व विशिष्ट  मार्गाने जीवन व्यतीत करतात आणि विशिष्ट वेळी मार्गस्थ होतात.वास्तविक पारमार्थिक स्तरावर विचार करता मृत्यूची परमात्म्याने योजलेली अवस्था विशेष उपकारक, अदभूत आहे. मानवी मृत्यूसमयी दु:खाच्या खाईत जाऊन शोकाकूल होण्यापेक्षा ती वेळ साजरी करावीया तत्वातही  तथ्य आहे. आम्ही आमच्या बन्सीधरकाकांची अंत्ययात्रा घरापासून स्मशानभूमीपर्यंत नेताना भजन-कीर्तनाचा आधार घेतला  होता. ग्रामीण भागात आजही हे तत्त्व पाळले जाते. मानवी जन्म जितका आनंदाचा मांगल्याचा आहे तेढा मृत्यूही आनंदाचा आणि परमात्म्याशी महामिलनाचा अंतिम  मांगलिक  प्रसंग आहे, असे आम्ही मानतो. आणि, “ज्याला जीवन कसे जगावे ? हे  समजते,  त्याला मरावे कसे ? हे सुद्धा  समजते ! असे म्हटले तर वावगे ठरू नये. आपला जीवात्मा जेव्हा देह सोडतो तेव्हा आपण त्याला मृत्यू म्हणतो आणि तो जेव्हा नवीन देह धारण करतो त्याला आपण जन्म वा पुनर्जन्म म्हणतो.नैनं  छीदन्ति शस्त्राणि, नैनं  दहति  पावका :”  या उक्तीप्रमाणे मानवी आत्मा कधीमरत नाही किंवा जन्मा येत नाही तो निव्वळ शरीर बदलतो. यावर मतभेद असू शकतात आणि ते असायलाच हवेत. कारण ते मतभेद आहेत म्हणून हे सारे इतकी वर्षे टिकून आहे.  “वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृन्हाती नरो पराणि ” अर्थात मानवी  जीवनाची गती वर्तुळाकार आहे, जेथे सुरु होतें तेथेच समाप्त होतें. जन्म आणि मृत्यू एकामागून  एक पडणारी पावले आहेत. या जन्मी, या भूमीवर काय कमावले ते सारे येथेच सोडून जावे लागते. मागच्या जन्मातील पाप-पुण्याचं गाठोडं  पुढील जन्मी वाहून न्यावे लागतेहे पूर्व संचिताचे आणि  नियतीचे ऋण पुढील जन्मी सव्याज फेडावे लागते. वर्तमान जगात सारे हे मानणार नाहीत. परंतु  श्रद्धावान  माणसे हे  निश्चित मानतात आणि कदाचित म्हणूनच थोड्या प्रमाणात का होईना, सचोटीने, श्रद्धेने आणि  सद्भावनेने  वागणारी माणसे या जगात आपल्याला आढळतात. 

जशी मती, तशी गती” हा  शास्त्र नियम आहे. मृत्यू सारख्या महत्वाच्या विषयावर लिहिताना तत्वज्ञान आणि अध्यात्मविद्या यांबरोबरच थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहाण्याचा, विचार करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण  सर्वसामान्य माणसांच्या मनात मृत्युच्या गहनतेपेक्षा त्याविषयी भयगंडाचे वर्चस्व अधिक आहेदुसऱ्या बाजूला मृत्यू अटळ आहे हे माहीत असतानाही आपल्यातील अनेकजण, आपण या पृथ्वीवर अमरत्व घेऊन जन्माला आल्याप्रमाणे वागत असतात, ऐन यौवनात संसारी माणसं आपल्या स्वतःच्यात प्रचंड मश्गुल असतात. आयुष्यात उपभोगलेले तारुण्य, मिळवलेली धनदौलत हे सर्व क्षणभंगूर असते. ते इथेच सोडून जावे  लागते,  हे न कळल्याने आयुष्याच्या शेवटला कायमची जागेवर बसलेली पाहावयास मिळतात. आपल्या समाजात जागतिक स्तरावर पुनर्जन्माविषयी मतभेद असू शकतात. मात्र मृत्यू  हा वादातीत आहे, अत्यंत नि:पक्षपाती आहे. तो सर्वाना समबुद्धीने  वागणूक देतो. हा मृत्यू एवढा सामर्थ्यशाली आहे की तो  मानवाची अहंकाररुपी इमारत क्षणार्धात जमीनदोस्त करून टाकतो. साऱ्या मानव जातीला अक्षरशः कस्पटासमान आणि कधीकधी तुच्छतेने वागवतो. अर्थात हा मृत्यू काहींचा जिंदादिल मित्रही बनतो, परंतु ती माणसे त्या उंचीची असावी लागतात, तेव्हाच हे घडू शकते. आणि म्हणूनच या भयप्रद अशा मृत्यूविषयी काहीजण सकारात्मक बोलण्याची, लिहिण्याची ताकद बाळगतात.  

पूर्वी कधीतरी  शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात पानिपतच्या लढाईवर एक पाठ  होता. त्यात दत्ताजी शिंदे यांच्या तोंडचे एक सुरेख वाक्य होते. आप मेला, जग बुडाले, आबरू जाते, अन वाचतो कोण..” अर्थात आपण मेलो की हे सारे जग आपल्यासाठी संपून जाते, मागे काय आणि कोण राहिलं याचा विचार व्यर्थ आहे. हे अगदी खरे आहे. दत्ताजींप्रमाणेच फ्रान्सच्या पंधराव्या लुईचे अशाच आशयाचे after me, the delugeअसे वाक्य आहे. पानिपतच्यानंतर इतक्या वर्षांनंतरही आपल्याला हे वाक्य आठवते अर्थात आपण मेल्यानंतर हे जग आपल्यासाठी संपते मात्र या जगासाठी आपण संपतोच असे नाहीहे यातून स्पष्ट होते. दिवा विझायच्या आधी ज्योत अधिक प्रज्ज्वलित होते”, मनुष्य जीवनात  मृत्युसमयी अगदी तसेच घडते असा अनेकांचा अनुभव आहे.मनुष्य जन्माची चाहूल नऊ महिने अगोदर  लागते, पण जेव्हा तो या जगातून कायमचा निघून जाणार असतो तेव्हा अनेकदा त्याची चाहूल लागत नाही”. तरीही हे सारे अनेकांना आजही अनाकलनीयच वाटते.
मानवी जीवनातील झोपेचे विविध प्रकार आहेत. ही झोप जर का एकदा कोपली तर जगणे मुश्कील होऊन बसते. मूल लहान असताना बाळाची आई ही अंगाई म्हणून थकते पण बाळ जागे ! आणि पुढे बाळ  मोठे झाल्यावर शाळा-अभ्यास सुरू होतात तर 'बाळ' मस्त झोपायला लागते आणि तीच आई त्याला उठवताना हैराण होते. अशी ही झोप नंतरच्या आयुष्यात अनेक अर्थाने आपणास साथ देते. यात बालपणातील विनातक्रार निश्चिंत गाढ झोप, विद्यार्थीदशेत असताना परीक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाला बसल्यावर येणारी हमखास झोप किंवा निकाल लागल्यानंतरची समाधानाची झोप, मित्रांसोबतच्या गप्पांत  रात्र जागवल्यावर पहाटे लागलेली गाढ झोप, नव्या लग्नाची नवलाई असताना पहाटसमयी लागलेली गुलाबी साखरझोप, त्यानंतरच्या काळात  सौ. कडून उद्धार होणारी कुंभकर्णझोप, सकाळचा  गजर बंद करून 'अंमळ' पडल्यावर लागलेली बेसावध झोप, सणासुदीला दुपारच्या वेळी बासुंदी-पुरीचे झकास जेवण झाल्यावर येणारी तृप्त झोप, गाडीतील  सामान चोरीला जाऊदेणारी गाफील झोप, शासकीय-निमशासकीय-खाजगी नोकरीतील भर पगारी झोप, रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनी  रात्री व कर्मचारी पुढाऱ्यांनी कामावर असताना भरदिवसा घ्यायची हक्काची झोपपरिसंवाद, विचारमंथन, बैठक वगैरे मध्ये दुपारी भोजनानंतर सभागृहातले दिवे मंद करुन  वक्ते आपले 'दृक-श्राव्य' सादरीकरण देत असताना अनावर होणारी महाघातकी  झोप, एखादा वक्ता भाषण लांबवू लागला की येणारी सहज झोप, उभ्याने प्रवास सुरु असणाऱ्या जलद गाडीत अनपेक्षित बसायला जागा मिळताच येणारी अचानक लाभाची झोप, लांब पल्ल्याच्या विमान प्रवासातील नाइलाजाची झोप, असे अजूनही अनेक प्रकार सांगता येतील. चिरनिद्रा ही मात्र मानवी जीवनातील अखेरची झोप आहे. परंतु तत्पूर्वीच्या मानवी जीवना झोप ही एक महान सुखमानली गेली आहे. कारण येथे लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेदभाव नसतो. ज्याला कोणत्याही व्यसनाशिवाय वा झोपेच्या गोळीशिवाय  शांत-निवांत झोप लागते तो खरा भाग्यवान मनुष्य होय.
संत ज्ञानेश्वरांचे पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे असे वचन आहे. अर्थात पलिकडे ओरडणारा कावळा हा पैलतिरी यायला बोलवत आहे आणि हा शुभशकुनच आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस ही रचना केली असावी, असे वाटते. मानवी शरीर हे पंच महाभूतांनी बनलेले आहे, असे भारतीय संस्कृती मानते आणि आम्ही ती संस्कृती मानतो. तरीही मानवी शरीर हे पृथ्वीवरील विविध मुलाद्र्व्यांपासून बनलेले एक जैवयंत्र मानले तरी त्या देहात चेतनाकशी येते ? विचार करण्याची कुवत कशी येते ? हा प्रश्न आहेच ! आम्हाला शाळेत असताना कविवर्य भा. रा. तांबे (सन १८७४ ते १९४१) यांची, “जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय...” ही मृत्यूवर आधारित कविता होती. या तांब्यांनी, “नववधू प्रिया मी बावरते...” सारख्या मृत्युवरच खूप कविता केल्या असल्याचे नंतर आम्हास कळले. अमेरिकेत आजही हलोविन साजरा होतो. या दिवशी मृतात्मे आपल्या भेटीस येतात, अशी समजूत आहे असे आमच्या वाचनात आले. जगात थोड्या फार फरकाने ही संकल्पना जगात सर्वत्र आहे, आपल्यातील काहींना ती पटत नाही, एवढंच ! मृत्यू येत नाही म्हणून जगत राहाण्यापेक्षा प्रायोपवेशन करून देहत्याग करणारी संस्कृती आपल्याकडे आहे, अर्थात उच्चतम स्थितीला पोहोचलेले दिग्गज वगळता हे सर्वाना जमणे  केवळ अशक्य. जो पर्यंत आपण शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत तो पर्यंत जगणे ठीक, परंतु पूर्णतः परावलंबी झाल्यानंतर जगत राहावे का ? असा तो विषय आहे. मृत्यूचे भय कमी करणारा आणखी एक संदर्भ आहे. संत एकनाथांना एकदा एका व्यक्तीने विचारले, “आपण सदैव आनंदी कसे दिसता ?” त्यावर ते म्हणाले, मी रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करताना म्हणतो की, “माझा आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस आहे, तो गोड व्हावाआपण आपल्या मनाशी अशी धारणा ठेवल्यास मृत्यूचे भय नक्कीच कमी होईल.

आपल्याकडे जीवात्म्याला जन्म मिळाला की त्यासोबत कर्मही येते, असे संत म्हणतात. तर जन्म हा पूर्वकर्मांचे फलित आहे, असे वेदांत सांगतो. पूर्वजन्मांच्या कर्मांचे फलित, भोगण्यासाठी आपण सामान्य माणसे कायम जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकतो. कर्म टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे येतेच ! तर मग जन्म व मरणाचा हा फेरा सुटून  मोक्ष मिळणार तरी कसा ? असा प्रश्न पडू शकतो. मूळात कर्माचे मूळ अधिष्ठान इच्छा आहे.  इच्छा कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. इच्छा मनातून उत्पन्न होते. अर्थात सर्व मानवी कर्मांचे मूळ आपले मन आहे. हे मन अहंभावनेने भरलेले असते. सतत ते आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडते . अस्तित्व टिकवण्यासाठी सतत नवनवीन  इच्छा निर्माण करते, कर्म घडवून आणत असते. मन इच्छेवरच जगते, कर्मांच्या फळावरच पोसले जाते. उपनिषदांप्रमाणे कर्म दोन प्रकारची असतात. 'श्रेयस कर्म' 'प्रेयस कर्म'. जीवाने कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते. मनाचा कल हा नेहमी प्रेयसाकडे असतो. तो प्रथम श्रेयसाकडे वळवायला हवा. प्रेयसामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते  'मी'ची लालसा वाढते. विवेकाने हे शक्य होते. विवेक बुद्धीत असतो. परंतु बुद्धिला मनातील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या 'मी'ला मारण्यास समर्थ आहे. संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहून ते सहज मिळवता येते. ते मिळाले की श्रेयस  प्रेयसावर विजय मिळवू शकतो. तो विजय मिळाला की 'मी' मेला ! 'मी' मेला की मनाचे अस्तित्व संपले.  मन संपले की द्वैत संपते आणि  द्वैत संपले की कर्म नष्ट होतात, असा हा प्रवास आहे.
  
रामदास स्वामींनी दासबोधात मृत्यूबाबत परखड वर्णन केले आहे... 

संसार म्हणजे सेवेचं स्वार | नाही मरणासी उधार |
माफी लागलें शरीर | घडीने घडी
सरता संचिताचे शेष | नाही क्षणांचा अवकाश |
भरतां न भरतां निमिष | जाणें लागे

अर्थात प्रत्येक प्राण्याच्या पाठीमागे मृत्यूचा दूत स्वार आलेला असतो. मरणाजवळ उधारी नाही. प्रत्येक घटिकेचे माप शरीरास लागले आहे. आयुष्यात संचिताप्रमाणे येणारे पाप-पुण्यांचे भोग संपले की, एक निमिषाचाही वेळ न लागता प्राणी मृत्युमुखी पडतो. जीवनातसदैव  हसतमुख राहिल्यास मृत्युपूर्व  सोनेरी संध्याकाळसुध्दा आपण  त्याच मजेने जीवन व्यतित करू शकतो. “स्वत:च्या मृत्यू नेमका कधी येणार हे कळणे अशक्य !” तरीही आपली जीवनरेषा किती लांब आहे याचा अंदाज बांधून  उर्वरित भविष्यासंबधी योजना अनेकजण  आखतात. नोकरी, धंद्यातून निवृत्ती मिळावी याची प्रथम वाट बघितली जाते, पण ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात येऊन ठेपते तेव्हा मात्र ती नकोशी वाटते. निवृत्तीचा काल असा घालवायचया ही मोठीच विवंचना होऊन बसते. मग अशा वेळी या वृध्द माणसांना एकाकी, निरूपयोगी, उदासीन वाटू लागते. माणसे जसजशी वृध्दत्वाकडे झुकू लागतात तसतशी ती स्वतःचा विचार अधिक करू लागतात. इतरांजवळ बोलताना स्वतःच्या भूतकाळासंदर्भात सतत सांगत राहतात. आपल्या आजाराबद्दलचा, दिसण्याबद्दलचा, कपड्यांबद्दलचा उत्साह कमी होत जातो.  याउलट  काही जणां धार्मिक वृत्ती वाढत जाते. निरनिराळ्या तीर्थस्थळांना भेटी देणे, अध्यात्मिक पुस्तके वाचणे  हे प्रकार वाढू लागतात. मानवाला या वयात आपल्या स्वतःच्या आणि जवळच्या माणसांच्या मरणाची भीती असते. आपल्या मरणानंतर पुढे काय ? याचे उत्तर नीटसे माहीत नसल्याने दडपणमिश्रीत उत्सुकता असते. दुसरे म्हणजे आपण आपला comfort zone तयार केलेला असतो आणि तो सोडून बाहेर पडायची आपली तयारी नसते. ते पचवायलाही  खूप कठीण जाते. मृत्यू हा शाश्वत आणि बरोबर असूनही आपण सतत भविष्याचा विचार करत असतो.

महाभारतात एक कथा आहे. तहानेने अतिशय व्याकुळ पांडव वनात फिरताना पाण्याच्या शोधार्थ एका उंच झाडावर चढले, त्यांना जवळच एक विस्तीर्ण सरोवर दिसले. धर्मराजाने नकुलाला सरोवराजवळ जाऊन पाणी आणण्याची आज्ञा केली. नकुल सरोवराजवळ पोहोचला. त्यावेळी त्याला यक्षाचा आवाज ऐकू आला की, पाणी पिण्याआधी माझ्या प्रश्‍नांची उत्तरे दे आणि नंतर तू पाणी पिऊ शकतोस. अतितृष्णेमुळे नकुलाने यक्षाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि पाणी प्राशन केले, तो मृत झाला. धर्मराजाने, बराच वेळ होऊनही नकुल न आल्यामुळे सहदेवाला पाणी आणण्याची आज्ञा केली. जी घटना नकुलाबाबत झाली तीच सहदेवाबाबत झाली पुढे  हाच प्रकार अर्जुन आणि भीमाबाबत घडला. अखेर  धर्मराज स्वतसरोवराजवळ आले. आपले पराक्रमी बांधव मृतावस्थेत पाहून त्यांना अतिशय दु:ख झाले. त्यावेळी यक्षाने धर्मराजाला सांगितले, हे सरोवर माझ्या मालकीचे आहे. तुझ्या बंधूंनी माझ्या प्रश्‍नांना उत्तरे न देता पाणी प्राशन केले म्हणून ते मृत झाले. धर्मराजांनी यक्षाच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कबूल केले. यक्षाने अनेक प्रश्‍न विचारले. धर्मराजाच्या योग्य व मर्मज्ञ उत्तराने यक्ष प्रसन्न झाला. त्याने चारही मृत पांडवांना जीवंत केले. यक्षाने विचारलेल्या असंख्य प्रश्‍नांपैकी एक प्रश्‍न होता, “या जगातले सर्वांत मोठे आश्‍चर्य काय ? यावर धर्मराजांनी उत्तर दिलेले उत्तर फार महत्वाचे आहे, “प्रतिदिनी लाखो माणसे मृत्यू पावलेले अनुभवत असताना मनुष्य, आपण स्वत: अमर आहोत, यादृष्टीने जीवन व्यवहार करतात, हे सर्वांत मोठे आश्‍चर्य आहे”, धर्मराजाचे हे उत्तर सार्वकालीन सत्य आहे. मानव हा स्वार्थवश होऊन अनेक पापकृत्ये करतो व भोगसंपदा जमवितो. मुळात  या जगात भोगवस्तू अमर्याद आहे, परंतु भोगशक्ती मर्यादित आहे, हे त्याला उमजत नाही. मर्यादित भोगशक्तीला मृत्यूची सीमा आहे, याचा त्याला विसर पडतो. अखेर जेव्हा विविध दुर्धर रोगांचे  त्याच्या देहावर आक्रमण होते तेव्हा त्याची अवस्था संध्याछाया भिववती हृदयाअशी होते. अखेर मृत्यू भयाने शेवटच्या काळात तो थोडी बहुत सत्कृत्ये करण्याचा प्रयत्न करतो. पण, हा प्रयत्न सौ चूहें खा के बिल्ली चली हजअशा पद्धतीचा ठरतो.

अलीकडे हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच वाढले आहे. सध्याची स्पर्धात्मक, तणावग्रस्त मानवी जीवनशैली, “नेमके  कशासाठी काय चालले आहे आपले आयुष्यात ?” याचा पडलेला विसर आदि अनेक या मागची कारणे  संभवतात. या कारणांना बाजूला केल्यास शतप्रतिशत कार्यरत जीवन जगत असताना हृदयविकाराने आलेला अचानकचा, मानवी मनाला चटका लावून जाणारा मृत्यू आम्हाला अलीकडे भावतोय. जगातील युवा पिढीला मोठी स्वप्ने पाहायला शिकवून, ती  जगायला आणि पूर्ण होण्यादृष्टीने सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देणाऱ्या माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांचा दुर्दैवी मृत्यू गतवर्षी आमच्यासह त्यांच्या जगातील अनेक चाहत्यांना दु:ख देवून गेला. मानवी जीवन हे सतत येत जात असते. या जीवनातील  धनकीर्ती, सुखपोभोग हे  क्षणिक आहेत.  कार्यतत्पर होऊन सत्याचा प्रसार करताना येणारा मृत्यू हा संसारी किड्याप्रमाणे येणाऱ्या मृत्यूपेक्षा निश्चितपणे  श्रेष्ठ आहे, असे आम्हास वाटते. आपण माणसांमुळे मोठे  होतो, यास्तव आपल्याला पैशापेक्षा माणसांचा कळवळा अधिक असायला हवा. अशाप्रकारच्या  या जीवनपद्धतीतून कदाचित आपल्या नशिबी संघर्ष येईल पण आपापल्या जीवन आणि मृत्युच्या संघर्षात जिज्ञासावृत्तीने ध्येयानुरूप प्रामाणिक वाटचाल करत राहिल्यास आयुष्याला अपेक्षित परिवर्तन नक्की घडेल.

मरणाच्या चिरनिद्रेत प्रवेश केल्यानंतर आम्ही, सुखद झोपेतून जागं होण्याला,  सर्व मानवी चेतना जागवण्याला, जागं होताना आपण कोण ?, आपली माणसं, आपली कामं, कर्तव्य याची जाणीव होण्याच्या क्रियेला, आलेल्या नव्या दिवसाच्या नवलाईला मुकलेले असू हे नक्की ! पण तरीही हे सारे घडण्यापूर्वीचा प्रत्येक क्षण आमच्या हातात आहे, आणि तो कसा जगायचा ? हे ठरवणेही आमच्या हातात आहे. मानवी मृत्यूला बिलगुनही आज विचारांनी, आपल्या कामांनी जीवंत असलेली अनेक माणसे आपल्याला जन्म आणि मृत्यू यातील अवधी कसा सत्कर्मी लावावयाचा  ? याची जाणीव करून देत आहेत.  आपण तसे जगायचे ठरवले तर आपलाही मृत्यू, जेव्हा येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत तरी आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.


धीरज वाटेकर, चिपळूण.   
www.dheerajwatekar.blogspot.com

(पूर्वप्रसिद्धी : पाक्षिक चिंतन आदेश, पुणे  दीपावली विशेषांक २०१६ )




सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

जागतिक पुरातत्त्वीय वारश्यात कोकणची उपेक्षा

केळशीतील वाळूच्या टेकडीचा समावेश हवा !

निश्चित कालमापन असलेली त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूची टेकडी ठरलेल्या, पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित कोकण किनारपट्टीवरील दापोली तालुक्यातील केळशी येथील टेकडीचा समावेश, सध्या तिला पोहोचू लागलेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरातत्त्वीय वारश्यात होण्याची गरज आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये नॅरो गेजनेरळ-माथेरानची टॉय ट्रेनवगळता, हजारों वर्षांचा    इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही. कोकणचे पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे. कोकणात अलीकडच्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे होऊ लागले आहेत. त्यासाठी कोकण पर्यटनम्हणून प्रयत्न व्हायला हवेत 

कोकणचा इतिहास अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. गेल्या काही वर्षांत झालेले संशोधन मात्र बारकाईने अभ्यासले की कोकणचे जागतिक महत्त्व लक्षात येते. परंतु त्यास्थळांना आंतरराष्ट्रीय मानकेमिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पुण्याच्या जगप्रसिद्ध डेक्कन पुरातत्त्वीय कॉलेजचे निवृत्त ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक असलेल्या डॉ. मराठे यांनी गेल्या काही वर्षांत कोकणात केलेली संशोधने जगाला थक्क करायला लावणारी आहेत. गुहागरजवळ पालशेत गावी ९० हजार वर्षांपूर्वीची मानवनिर्मित हत्यारे त्यांना सापडली. केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत डॉ. मराठे यांना साधारणत: आठ हजार वर्षांपूर्वीचे मानवनिर्मित बांधकाम खोल समुद्रात सापडले. पणजीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला आहे. गुहागर-दापोली खाडी किनाऱ्यावर देर्दे गावी नवव्या शतकातील बुडालेली पुरातन बोट मिळाली. जोग नदी मुखाजवळ बिरवाडी गावात १० व्या शतकातील घर मिळाले. गुहागरात प्राचीन असंख्य कालवे आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्रतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी जगभरातील समुद्रतळाचे सौंदर्य न्याहाळून कोकणात समुद्रतळाशी जगापेक्षा वेगळी समृद्धी असल्याचे सिद्ध केले आहे. या सर्वांचा नीट अभ्यास केला तर कोकणची संस्कृती, मनुष्यजन्म सारे काही जगात सर्वात प्राचीन असल्याचे जाणवते. याला आंतरराष्ट्रीय मानकाचे कोंदण मिळाल्यास खऱ्या अर्थाने कोकण ग्लोबलहोणार आहे.

वाळूच्या टेकडीचे केळशी गाव भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनार्‍यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे 18 मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी 1990 मध्ये या टेकडीचा शोध लावला. गत दशकात डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कर्ब-14 पद्धतीने कालमापन केले असता 1170 ते 1190 वर्षांपूर्वी काळ मिळाला आहे. केळशी येथे केलेल्या शोधन कार्यात काही भांडी, घडे आणि खापरं मोठ्या प्रमाणावर मिळाली. पातळ आणि जाड अशा दोन प्रकारातील मृद भांडी आढळली. गोलाकार भांडी, वाडगे, ताटं आणि घडे यांची खापरे मिळाली. मातीच्या भांड्यांच्या कडांचे वेगवेगळे प्रकार आढळले. त्यात छोट्या मानेची, उघड्या काठाची, बारीक मानेची भांडी गोलाकार भांडी, वाडगे, ताटे आणि घडे यांची देखील खापरे आढळली. त्याचप्रमाणे गोलाकार काचेच्या भांड्यांचे आणि काचेच्या पेल्यांचे तुकडे व बांगड्यांचे तुकडे सापडले. तीस वर्षे वयाच्या दोन माणसांच्या कवट्या आणि एका लहान बालकाचा सांगाडाही मिळाला. अशाच उत्खननात टेकडीच्या पायथ्याशी जेथे आज भरतीचे पाणी दीड मीटर उंचीपर्यंत येते, तेथे 1.2 मी. व्यासाची जांभ्या दगडात बांधलेली विहीर आढळून आली आहे. या विहिरीच्या आत आणि आसपास मिळणार्‍या खापरांवरून ही विहीर शिलाहार काळातील (.. 1000) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पृष्ठवंशिय आणि पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची हाडे इथल्या शोधनकार्यात सापडली. त्यात पाळीव गुरे, म्हैस, हरिण, समुद्री कासव व मासे यांचा समावेश आहे. माशांची हाडे आणि प्राण्यांचे अवशेष यांची संख्याही मोठी होती. मोठ्या हाडांचा पृष्ठभाग सूक्ष्मदर्शकाखाली काळजीपूर्वक अभ्यासला असता ती हाडे दूरवरून वाहून न येता ती जागच्या जागी गाडली गेली असावीत असे अनुमान काढण्यात आले. वाळूच्या टेकडीच्या माथ्यावर गाडल्या गेलेल्या दोन कवट्यांच्या जवळच तांब्याची सहा नाणी सापडली. विशेष म्हणजे ही नाणी चांगल्या स्थितीत असून त्या वरील मजकूरही सुस्पष्ट आहे. अल् सुलतान अहमदशाह बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी 837’ असा मजकूर त्यावर आहे. त्यामुळे ही नाणी बहामनी सुलतान अहमदशाह पहिला यांनी हिजरी सन 837 म्हणजेच इ. . 1433 मध्ये वापरात आणलेली आहेत हे नक्की झाले. 

केळशी गावाचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो. सारे उल्लेख 1601 नंतरचे आहेत. पंधराच्या शतकाच्या अखेरीस नैसर्गिक घटनेतून या समुद्रकिनार्‍यावरील खारफुटीचे जंगल उद्ध्वस्त झाले असावे, अशाच प्रकारची घटना गुहागर-बाग येथे घडल्याचे पुरावे सापडतात. अलिबागच्या उत्तरेस रेवस बंदरात खारफुटीचे जंगल नष्ट झाल्याचेही संशोधनातून पुढे आले होते. अलिबाग-चौल उत्खनन पुराव्यावरून इ. . पहिल्या शतकात समुद्र पातळी तीन ते चार मीटरने कमी होती हे नक्की झाले आहे. केळशी येथील विहिरीच्या पुराव्यावरून आणि आजूबाजूच्या पुरातत्त्वीय अवशेषावरून इ. . 15 व्या शतकापर्यंत समुद्राची पातळी ही तीन ते चार मीटरने कमीच होती हे नक्की होते. वास्को द गामाच्या तिसर्‍या सफरीविषयी यूल, बर्नल, लोगन, गॅस्पर, कोरिआ, सॅन रोमन, कॅस्टेन्हेडा आणि बॅरोज आदि लेखकांनी लिहिले आहे. या प्रवासात गामाच्या गलबतांच्या तांड्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. 14 ते 17 गलबते या प्रवासात होती. त्यापैकी 4 ते 5 गलबते भारताच्या किनार्‍याला लागण्यापूर्वीच नष्ट झाली. 9 एप्रिल 1524 रोजी वास्को--गामा याने लिस्बन सोडले, तेव्हा त्याच्यासोबत 3000 माणसे होती. गलबतांचा तांडा भारतात शिरताच दिवच्या आसपास त्सुनामी आली तेव्हाचे वर्णन या लोकांनी जे सांगितले ते असे होते समुद्र इतक्या प्रचंड प्रमाणात खवळला की भयंकर आवाज, किंकाळ्यांनी आकाश दुमदुमले. जहाजांनी विचित्र हेलकावे घेतले, लाटांचे तांडव सुरू झाले, एका जागी नीटपणे उभे राहता येत नव्हते, माणसे एका बाजूवरून दुसर्‍या बाजूला जाऊन आपटत होती. माणसांनी अखेर देवाचा धावा करायला सुरूवात केली कारण लाटांच्या थैमानामुळे जहाजांवरील ताबा सुटला होता. दरवेळी भीषण लाट येत होती, जिरत होती, तोपर्यंत नव्या लाटेचा अविष्कार होत होता. हे सारे सुमारे 1 तास चालले होते. अशा परिस्थितीतही वास्को--गामाने प्रसंगावधान राखून लोकांना धीर देत सांगितले की पोर्तुगीजांच्या उपस्थितीमुळे समुद्रसुद्धा कंपित झाला आहेअशी माहिती केर्र या लेखकाने दिली आहे. त्यात त्याने वास्कोने भूकंपनिर्मित त्सुनामी ओळखली, असे म्हटले आहे. खोल समुद्रात जहाजाला त्यामानाने त्सुनामीचा तडाखा कमी बसतो याची दोन कारणे आहेत. त्सुनामीच्या उंचीच्या स्वरूपातील परिणाम खोल समुद्रात काही सेंमी. असतो. समुद्राचा पृष्ठभाग वरखाली होण्याचा काळ हा 5 ते 20 मिनीटं असतो. एवढ्या कालमर्यादेत उंचीत होणारा हा छोटा बदल जाणवत नाही.

 समुद्र किनाऱ्यावरून रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ह्रास 

समुद्र किनाऱ्यावरून रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ह्रास झाल्याची स्पष्ट भूमिका केळशीतील ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते मनोहर वर्तक यांनी मांडली आहे. उटम्बरहून केळशीकडे निघालेला रस्ता, अगदी सुरुवातीच्या ४० वर्षे पूर्वआखणीनुसार बेलेश्वर मंदिरानजीक पूर्वेकडे वळतोकेळशी खाडी, साखरी, आतगाव, आंबोलीमार्गे वेसवीकडे जातो. या जुन्या मार्गावरील गावांना मुख्य प्रवाहात या रस्त्यामुळे आणणे शक्य होणार होतेआत्तापेक्षा खर्च कमी झाला असता. पुलाची जागा बदलली जाऊन उंची कमी झाली असती, पर्यायाने खर्च कपात झाली असतीपरंतु वर्तमान वाळू टेकडीचा ह्रास करणारा, “रेवस-रेड्डीरस्ता हा बेलेश्वर मंदिरापासून पश्चिमेकडे वळविला गेला. रस्ता चिंचवळ वस्तीत आलारस्ता अगदी घरांना लागून आला, घरांना धोका निर्माण झाला. रस्ता पुढे केळशीतील पर्यटन प्रसिद्ध पेशवेकालीन बांधणीच्या प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिराजवळून आखण्यात आला. त्याला विरोध झाल्याने तो पुन्हा वळवून देऊळ आणि शाळा यांच्या मधून आखण्यात आलाहा रस्ता सागरी महामार्ग असून तो शाळेपासून, प्रमुख ग्रामदेवतेच्या मंदिरापासून अंतरावर असावा, याचे काही नियम आहेत त्यात हा वर्तमान रस्ता बसत नाही. पुढे रस्ता दक्षिणेकडे वळून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हजरत याकूबबाबा सरवरी यांच्या ४०० वर्षे प्राचीन दर्ग्याजवळ आला. काम सुरु असताना दर्ग्यानजिकच्या काही कबरीकोसळल्या. स्थानिकांनी हरकत नोंदविल्यानंतर कोसळलेला भाग पुन्हा बांधून देण्यात आला. येथून हा रस्ता समुद्रमार्गे उत्तरेकडे वळून वाळूच्या टेकडीकडे गेला. हे सारे काम मूळ जमीन मालकांची परवानगी न घेता झाले. यात अनेक गडबडी झाल्या आहेत. परवानगी मिळविल्याची कागदपत्रे तयार करताना हयात नसलेल्या व्यक्तीची सही घेणे, कधीही इंग्रजी न शिकलेल्या व्यक्तीची इंग्रजीतील सही असे अनेक दोष वर्तक आजही स्पष्ट करतात, त्याचे पुरावे सांगणारे दस्तावेज आजहि न्यायालयात जमा आहेत.  रस्ता नेताना रस्त्याकरिता केवडा, मारवेल, सुरु या झाडांचे असलेले जंगल जे. सी.बी. च्या सहाय्याने संपूर्णत: मूळापासून नष्ट केले गेले.

दरम्यानसन २००६ साली केळशी खाडीवरील पुलाच्या कामाला सुरवात झाली. तत्कालीन  ११ कोटींच्या या पुलाचे  पिलर उभारून पूर्ण झाले होते व  पिलर उभारण्याचे काम सुरू होते. त्यातच या पुलाला जोडणारा साडेतीन कोटींचा रस्ता या वाळूच्या टेकडीवरून नेण्यात आला. वाळूच्या टेकडीवरून महामार्ग नेण्याची कुशाग्र बुद्धिमत्तालाभलेले लाभलेले अभियंता, त्यावर ब्रन काढणारे लोकप्रतिनिधी या काळात जनतेने पहिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ताकामी रायगड व रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडण्यासाठी मोठ्या यंत्राच्या साहाय्याने टेकडीच्या माथ्यापासून १२ मी. पर्यंत आणि १२० मी. लांबपर्यंतचा टेकडीचा भाग कापून टाकला. निसर्ग निर्मित टेकडीला ग्रहण लागले. टेकडी कापली गेल्याने  या संपूर्ण विषयाचे गांभीर्य समजून घेवून पुण्याच्या प्रणवतीर्थया संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली. आणि  ११ एप्रिल २००७ ला केळशी खाडीवर सुरू असलेल्या पुलाचे काम बंद पडले. आज बांधकाम खात्याने आपण टेकडी वाचवूअसा खुलासा केला आहे.  टेकडी वगळून रस्ता करण्याची भूमिका घेतली आहे, वास्तवात विकास व्हायलाच हवा आहे. मात्र तो सर्वसमावेशक आणि निसर्गासपूरक असावयास हवा. समुद्राच्या भरती रेषेपेक्षा केळशी गाव सुमारे ४ फूट खाली आहे, आजही समुद्राला भरती आली की काही भागात पाणी शिरते. ही टेकडी या गावचे संरक्षण आहे. आजपासून ७५ वर्षांपूर्वी हि टेकडी आज अस्तित्त्वात असलेल्यापेक्षा दुपटीहून अधिक होती. या टेकडीच्या पुढे ठराविक अंतरावर तुलनेने छोट्या टेकड्याही दृष्टीपथास पडत. कालौघात त्या नष्ट झाल्या. दरम्यान यावर्षी समुद्राच्या उधाणामुळे वाळूची टेकडी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. या वर्षी पावसाळी हंगामात सुमारे ३० मीटर लांब व २५ फूट रूंद असा भाग समुद्राच्या उधाणामुळे व सततच्या पाण्याच्या मार्‍यामुळे नष्ट झाला, टेकडी बचाव मोहिमेत जी भूमिका अनेक वर्षांपूर्वी अभ्यासक आणि संशोधकांनी मांडली ती स्थानिकांनी उचलून धरली आहे. रस्ता करण्याच्या नादात ओरबाडलेली टेकडी आता निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे.  “टेकडी नष्ट झाल्यास संपूर्ण गावाला धोका आहेहे संशोधकांचे मत यावर्षी गावातील गुजरवाडा आणि कांदेवाडीला झालेल्या त्रासामुळे सर्वांना पटले आहेकेळशीतील ही संपूर्ण टेकडी एकजीव असून त्यात स्तरविन्यास नाही. हा सर्व वाळूचा ढीग एकाचवेळी निर्माण झाला आहे. गोव्यातील दोनापावला येथील देशातील एकमेव समुद्र विज्ञान संस्थेने पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या प्रचलित यादीमध्ये या टेकडीचे नाव नमूद नसल्याचे म्हटले आहे.

जगात सर्वत्र पुरात्त्वीय वारसास्थाने जतन होत आहेतपर्यटन विकासात त्यांचा वापर होतो आहे. आपण भारतीय याबाबतीत  कमालीचे उदासीन आहोत. यूनेस्कोच्या  जागतिक  वारसा  स्थळांच्या यादीत जुलै २०१२ रोजी  भारतातील पश्चिम घाटाचा समावेश करण्यात आला आहे. यात केरळ २०, कर्नाटक १०, तामिळनाडू ५ आणि महाराष्ट्रातील कास पठार, कोयना आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. तत्पूर्वीच्या यादीत राज्यातील  छत्रपती शिवाजी टर्मिनस, एलिफंटा-घारापुरी लेणी, अजिंठा-वेरूळ लेणी यांचा समावेश आहे. जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सारे पर्यटनाचे आविष्कार एकत्र सामावलेल्या, विविध किल्ल्यांच्या माध्यमातून श्री शिवछत्रपतींचा गौरवशाली वारसा सांगणाऱ्या, हजारो वर्षांची पुरातत्त्वीय परंपरा जपणाऱ्या कोकणातील एकही ठिकाण यात नाही. ही बाब गेली अनेक वर्षे कोकण पर्यटनाचा डांगोरा पिटणाऱ्या येथील समाजकारणी-राजकारणी यांचे काम दाखविण्यास पुरेशी आहे.   केळशीतील वाळूची टेकडीसारखी जागतिक दर्जाची मानके पुढे आणल्यास कोकण पर्यटन दिमाखात जगाच्या नकाशावर झळकेल आणि आजचा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याची खरीखुरी उर्मी आपल्याला प्रदान करेल.

धीरज वाटेकर                         
पर्यटन अभ्यासक      






आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...