रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

सर्वसमावेशक स्वातंत्र्याच्या शोधात...


सार्वभौम भारताचा आज ७० वा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्याचे महत्व समजण्यासाठी कधीतरी “गुलाम” असावे लागते. ते गुलामीचे जीणे जगलेली पिढी आज कार्यरत नसल्याने आणि उरलेल्या आम्हा सर्वांना गुलामी माहिती नसल्याने दिवसागणिक स्वातंत्र्याचे महत्व कमी होते आहे की काय? अशी स्थिती सध्याच्या सुट्टीच्या मानसिकतेने निर्माण केली आहे. अर्थात दुसऱ्या बाजूने आजची तरुणाई सर्वसमावेशक भारतीय स्वातंत्र्याचा शोध घेत असल्याचेही दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा झालेला उदय याचेच द्योतक आहे. खरेतर स्वातंत्र्याच्या बीजांचा आज वटवृक्ष व्हायला हवा होता. परंतु गत ७० वर्षांत आम्हाला वटवृक्षमय सर्वसमावेशक विकास साधता आलेला नाही. म्हणूनच मोठ्या विश्वासाने तरुणांनी भारतीय राजकारणाला वळण दिले आहे. तो विश्वास जपत आगामी काळात सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने कार्यरत राहिल्यास आपण “अतुल्य भारत” साकारू शकू.
भारताला स्वातंत्र्य ७० वर्षांपूर्वीच मिळालंय. पण मिळालंय म्हणजे नक्की कुणाला मिळालंय ? ज्यांना आजही स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्यांना ते कधी मिळणार ? ज्यांना मिळालं नाही आणि ज्यांना मिळालंय ते कोण आहेत ? अशा अनेक अंगाने भारतीय स्वातंत्र्याचा विचार व्हायला हवा. जेव्हा जेव्हा देशात महिलांवरील सामूहिक अत्याचार - बलात्काराची घटना घडते तेव्हा तेव्हा अनेक संवेदनशील मने या देशाबद्दल, देशाच्या आत्मियतेबद्दल विचार करू लागतात. अनेकदा हा देश आपला नसावा, या भावना बळावतात. या देशात नियमित दंगली होत असतात. दुर्दैवी दलित अत्याचार, पुतळा विटंबना, विविध पुरस्कार वापसी या घटना तर ठराविक अंतराने घडतातच. भावनेची किंमत मोजून मानवी मतांच्या स्वातंत्र्याचा लिलाव देशात या काळात बहरतो हा इतिहास आहे. कोकणात तर अगदी शुल्लक अपवाद वगळता शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. त्याला कारणेही तशीच आहेत. परंतु  इतरत्र या देशातील शेतकरी आत्महत्या करतात, परंतु व्यापारी कधी आत्महत्या री नाही. या देशातील गिरणी कामगार देशोधडीला लागले पण गिरणीमालक मात्र गब्बर झाले. शाळेत असताना भारत माता की जयम्हणताना रक्त सळसळायचं, स्फूर्ती यायची, प्रचंड अभिमान वाटायचा आजही वाटतो. परंतु या देशात जातीवर आधारित समाजव्यवस्था अस्तित्वात असल्याचं कळायला लागल्यापासून देश या संकल्पनेला तडा जाऊ लागलाय. देशाची घटना, त्यातून निर्माण होऊ शकणारी लोकशाही, प्रजासत्ताक संकल्पनेतून घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात अस्तित्वात लंच नाही. यास्तव, आज या देशातील सार्वत्रिक समाजमन कशाचाही विचार न करता मृतमय जीवन जगत प्रत्येक विशेष स्मरण दिन हा सुट्टी दिन म्हणून घालवतो आहे.
देशभर सगळीकडे थोड्या फार फरकाने चाकोरीबद्ध पद्धतीने आपण  स्वातंत्र्यदिन साजरा करतो आहोत. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतले आम्ही एक स्वतंत्र नागरिक होत म्हणजे नक्की काय ? जे काम करण्यासाठी मला पगार दिला जातो, ते करण्यासाठी नागरिकांकडून मनाला येइल तेवढं 'चहापाणी' घेणे म्हणजे स्वातंत्र्य ? रहदारीचे नियम माहित असूनही ते पाळणे म्हणजे स्वातंत्र्य ? जमल्यास वर्षातले दोन दिवस देशाच्या नावाने सोडून बाकीचे सारे दिवस गावभर वाट्टेल तिथे मावा, गुटखा खा थुंकणे म्हणजे स्वातंत्र्य ?  रोज संध्याकाळी नाक्यावर बसून आमच्या माताभगिनींची, त्यांनी आत्महत्या करेपर्यंत छेड काढणे म्हणजे स्वातंत्र्य ? हजारो जीवांचे मोल देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कमावलेल्या गडकिल्ल्यांच्या दौलतीवर दारू सिगरेट पिणे म्हणजे स्वातंत्र्य ? बायकांनी नोकरी व्यवसायाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी दारू सिगरेट पिण्यातही पुरुषांची बरोबरी करणे म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य ? सामाजिक ऐक्यासाठी सुरु केल्या गेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणे म्हणजे स्वातंत्र्य ? अर्थात आपल्या मनाला येईल तसं वागणं म्हणजे स्वातंत्र्य, असे आजकाल काहीसे दिसते आहे. आजच्या आणि पुढच्या पिढीकडून पूर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु आपण आज आजूबाजूला पाहतो तेव्हा 'स्वातंत्र्य आणि स्वैराचार' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे माहित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. माझे स्वातंत्र्य हे  माझा स्वैराचार होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी. कारण असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर आपणाला स्वराज्य तर मिळालेय  परंतु सुराज्य येण्याकरिता ते गरजेचे आहे .

आजची पिढी म्हणजे नुसताधिंगाणा, कशाची काही पडली नाही आहे, सदैव  मोबाइल आणि इंटरनेट, ना कशाची काळजी, ना  जबाबदारी असे मागच्या पिढीचे एक सामुदायिक मत आहे. काही अंशी ते खरेही आहे. राष्ट्राभिमानाच्या कल्पना वेगळ्या असतील परंतु त्या आजच्या तरुण पिढीला राष्ट्राभिमानी भावनेपासून दूर लोटता येणार नाही. काळाप्रमाणे व्यवस्था बदलतात परंतु हा सारा बदल चुकीचा असतो से नाही. देशाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आजची पिढी मागच्या पिढीइतकी आक्रमक नाही, पण आक्रमकता हेच केवळ  राष्ट्राभिमानाचे प्रमाण असू शकत नाही. तेव्हाचे राजकारणी आणि आजचे राजकारणी यां जसा फरक तसाच तेव्हाच्या राष्ट्राभिमानात आणि आजच्या राष्ट्राभिमानात फरक फरक पडत गेला आहे.  आज १५ ऑगस्टचा “स्वातंत्र्योत्सवआपल्या परीने साजरा करण्याचे अनेकांनी मार्ग शोधलेत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या सुट्टीचं हे वास्तव आहे की अनेकजण त्या दिवशी उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडतात आणि संपूर्ण दिवस इतर सुट्टीप्रमाणे घालवतात. एकमेकांना १५ ऑगस्टचे छान-छानमेसेजेसपास करतात. फेसबूकवर राष्ट्रप्रेमाचे संदेश, फोटो अपलोड करतात. ज्या मातीत, देशात आपण लहानाचे मोठे झालो, वाढलो, बहरलो, त्या देशाचं आपण काही देणं लागतो ही भावना निर्माण करायला आपली व्यवस्था कमी पडते आहे. देशासाठी आयुष्य वाहिलेल्यांना खरी श्रद्धाजली देण्यासाठी त्यांच्यासारखे जीवन जगण्याची तयारी ठेवावी लागले. कदाचित हे विधान अतिशयोक्ती वाटेल परंतु, सातत्यानं केलेली एखादी छोटी गोष्ट मोठं ध्येय गाठण्यात यशस्वी ठरत असते. या दिवशी आपण अनेक गोष्टी करू शकतो एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन त्याची माहिती करून घेणे, मुलांना, देशभक्तांची माहिती देणे, स्वातंत्र्य संग्रामावरील पुस्तक वाचन, स्वातंत्र्यानंतर भारत अनेक आव्हानांना कसे सामोरे  गेला याची माहिती करून घेणे, देशातील इस्त्रो, बीएआरसी, अशा संस्थांची माहिती करून घेणे आदि अनेकांचा समावेश होऊ शकेल. 

व्यक्तिश: आम्ही आजच्या स्वातन्त्र्यादिनाला, पहिल्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानातील कराची शहर अनुभवलेल्या दिवसांसह कोकणच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील ४१ वर्षांच्या सेवाकाळाचा जीवनप्रवास यशस्वी केलेल्या, महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चिपळूण येथील ८५ वर्षे वयाचे सेवानिवृत्त अपग्रेड़ मुख्याध्यापक मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजी यांचा जीवनप्रवास शब्दबद्ध असलेल्या आम्ही लिहिलेल्या (धीरज वाटेकर) "प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी" या चरित्र ग्रंथाचे तरुणाईचे उपस्थितीत समारंभपूर्वक प्रकाशन करण्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यपूर्व काळ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्यांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक समजत नाही असे नेते या देशाने पाहिलेत.  देशातील सर्व सामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यानी स्वातंत्र्याचे रोपटे लावले आणि ते राजकारण्यांनी पोखरले अशी समाजाची भावना आहे. या पोखरण्यावर औषध नाही, सारे एका कंट्रोलच्या बाहेर गेले आहे. पूर्वी लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान असताना देशात एकेवर्षी दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना “देशात दुष्काळ पडला आहे आजपासून मी सायंकाळचे जेवण बंद करणार आहे” असे जाहीर केले त्यानंतर जनतेला आवाहन करण्याची गरज पडली नाही. मध्यंतरी माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विचारप्रवाहांचे लोक एकाच व्यासपीठावर आले, देशाने राजकीय सर्वसमावेशकता पाहिली. विकसनशील भारताच्या प्रयत्नात ही राजकीय सर्वसमावेशकता दिसायला हवी म्हणजे स्वातंत्र्यदिन समाजाला आपलासा वाटू लागेल. अर्थात आपला देश खरोखरच एक बलाढय राष्ट्र म्हणून जगासमोर येण्याचा असा काही प्रयत्न करताना दिसत असेल तर या देशाचे नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत. यात भारतीय संविधानाचे पालन, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे, आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढय़ास ज्यामुळे स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शाची जोपासना त्यांचे अनुसरण करणे, भारताची सार्वभौमता, एकता एकात्मता उन्नत राखणे, धार्मिक, भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा वाढीला लावण्यासाठी कार्यरत राहाणे, आपल्या संमिश्र संस्कृती” या  समृद्ध वारशाचे जतन करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण, सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, आपला देश सतत यशाच्या चढत्या श्रेणी प्राप्त करेल यासाठी सतत प्रयत्नशील राहाणे आदींचा समावेश आहे.

आज देशात स्वच्छ भारत अभियानआणिमेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान उंचावत आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटीआणिस्कील इंडियासारखे  देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) चालना देणारे उपक्रम आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरणारे  आहेत. त्यामुळे देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, थेट परदेशी गुंतवणुकीस चालना मिळेल. ‘जन धन योजनाआणिबेटी बचाओ, बेटी पढाओसारख्या योजनाही समाजात बदल घडवून णू शकतात. संपूर्ण देशातील लोकांच्या मनात वरील योजनांमुळे अभिमानाची भावना आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे हे खरे असले तरी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करूनही ज्या गतीने या योजनांच्या घोषणा झाल्या, त्या गतीने त्यांची अंमलबजावणी झालेली नाहीअर्थात त्याकरिता वेळ द्यावा लागणार हे नक्की आहे. दुर्दैवाने वर्तमान काळातील मानवी समुदायाला टप्प्याटप्प्याने नाही तर तात्काळ फार मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. कितीही पद्धतशीर नियोजन आणि कार्यप्रणालीचे  योग्य व्यवस्थापन राबवूनही योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडथळ्यानी या देशाला गत ७०वर्षात ग्रासले आहे. वास्तविक कायदेमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांनी मनापासून हातात हात घालून काम केले तर या देशात मोठा बदल घडून येऊ शकतो, देशवासीयांची  तशीच अपेक्षा आहे. भारतानेच जगाला योग्य दिशा दाखवावी, हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. ते पुरे करण्यासाठी, गुंतवणूक, रोजगार, आर्थिक विकासाबरोबरच शांतता, प्रगती आणि मैत्री यांची शाश्वती देणारीवसुधैव कुटुंबकमही उक्ती सत्यात उतरविण्यासाठी चार स्तंभांचीच भूमिका महत्वाची आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्काच्या नावाने वैचारिक धोबीघाट तयार करून आपापली वैचारिक धुणी धुण्याचा प्रकार देशात नेहमीच सुरु असतो. या देशात राज्यघटनेने राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिलेल्यावंदे मातरम् सारख्या गीतालाही विरोध होतो. अशा अनेक घटना पाहाता, भारतात देशहितासाठी मोठे संघटित सामर्थ्य उभे करण्याची गरज राहणार आहे. लोकशाहीपद्धतीनेच अनेक प्रश्नांना सणसणीत उत्तरे द्यावी लागणार आहेत. ती उत्तरे देण्याची ताकद आजच्या तरुणाईत नक्की  आहे. फक्त “सर्वसमावेशक स्वातंत्र्याच्या शोधात...” असलेल्या या तरुणाईला तसा विश्वास देऊ केल्यास आपला सर्वांचा भारत आगामी काळात जगात “अतुल्य” बनेल.

धीरज वाटेकर, चिपळूण       

शुक्रवार, २४ जून, २०१६

कोकणातील वास्तूविकास

कोकण...! स्वर्गीय निसर्ग सौंदर्याची खाण असलेले कोकण...! अपरान्तभूमी म्हणून गौरविलेले कोकण...! प्राचीन इतिहासाचा, गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा सांगणारे कोकण...! बाजारूपणाचा स्पर्श न झालेले देवभूमी कोकण...! आणि आता कोकण रेल्वे पाठोपाठ येथील एकमेव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वेगाने होत असलेल्या विकास   कामामुळे, येऊ घातलेल्या नवनवीन प्रकल्पामुळे "कायमस्वरूपी निवासी वास्तव्य ठिकाण" म्हणून, निवांतपणासाठी आणि व्यापारासाठीही कोकण जगभरातील अनेकांच्या मुखी घट्ट बसलय ! याची प्रचिती कोकणात सुरू असलेले विविध कल्पक वास्तूप्रकल्प आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता सहज येऊ शकते. त्या विषयीचे हे विवेचन...!

आधुनिक काळात कोकणही बदलतय. विविध नवनव्या सुधारणांचा स्वीकार करताना आपले जुने आणि सर्वाना भावणारे कोकणीपण विविध वास्तू प्रकल्पांमध्ये जपताना दिसतय. मोठाले वास्तू प्रकल्प, रोहाऊस, फार्महाऊस, सदनिका प्रकल्प यांना मिळणारा प्रतिसाद,  त्यातील कोकणीपणा अनेक "विकासक" जाणीवपूर्वक जपताना आढळत आहेत. आणि यामागे येथे येऊ इच्छिणार्यांची कोकणच्या प्रेमाने भारलेली मानसिकता आहे. या मानसिकतेचा उपयोग करून कोकणात अधिकची आर्थिक, व्यावसायिक समृद्धी आणणे सहज शक्य आहे. पण आता आधुनिक पद्धतीच्या पर्यटन व्यवसायात या कल्पनेला काही लोकांनी वेगळे स्वरूप दिले आहे. आज कोकणात पर्यटनाला येणार्‍यांचे हॉटेलात उतरण्यासह इतर ठिकाणी उतरण्याचे प्रमाण वाढते आहे, यासाठी सेकेंड होम म्हणून खरेदी केल्या जाणार्‍या वास्तूप्रकल्पांचा उपयोग करून घेणे सहज शक्य आहे. याचा विचार करून कोकणात काही प्रकल्पांनी आपली आखणी केली आहे. भविष्यात या संपूर्ण व्यवसायात ही वाढती संधी ठरणार आहे. कोकणातील तीर्थक्षेत्रदर्शन, सांस्कृतिक पर्यटन, कोकणी संस्कृतीची ओळख यांचीही संधी येथे मिळते. आणि याच आकर्षणापोटी मानवीसमुह आज कोकणाकडे वळतो आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण शांत, निवांतपणे, आनंदात काहीकाळ जगता येईल? अशी जागा शोधत असतात, अशा शोधकर्त्यांच्यासाठी कोकण सर्वोत्तम पर्याय म्हणून उभे राहीले आहे. आज कोकणातील अनेक वास्तू प्रकल्प यास्तव केवळ विविध पर्यटनस्थळांच्या नजिक उभे राहत आहेत. त्यांना चांगले ग्राहक उपलब्ध होत आहेत. कामाचा आठवडाभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा, पाण्याचा आवाज असे मनमोहक रूप कोकणचे विशेष असले तरी आज ही अनुभूती येथील अनेक छोट्या-मोठ्या वास्तू प्रकल्पांतही  घेता येते आहे. ज्यामुळे दिवसभराचा मानवी थकवा गायब होऊन मिळणार्‍या समाधानामुळे अनेक पाऊले कोकणात गुंतवणुकीसाठी आकृष्ट होताना दिसत आहेत. त्यांना कोकणीपणा जपणारे पर्याय उपलब्ध करून देणारे "विकासक" हमखास यात यशस्वी होत आहेत, होणार आहेत यात शंका नाही.

गाव हा खरे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा-आवडीचा विषय. नेहमीच्या व्यापातून वेळ काढून काही काळ गावाच्या वातावरणात रमावे, असे आपल्याला सर्वांना वाटते. आपलं वास्तव्यस्थान इतरांपेक्षा वेगळं दिसावं आणि त्याचे कौतुकही व्हावे असे आपल्याला वाटत असतेच. या मानवी स्वभावाचा विचार करून अनेक विकासक कोकणात आपले प्रकल्प विकसित करत आहेत, यात आपण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं असंच ठरवून काम होत आहे. आणि हे वेगळेपण कोकणी सौंदर्याईतकच मानवी मनाला भुरळ पाडणारे आहे. अनेकदा वास्तूप्रकल्पांच्यामध्ये पुरेपूर गावातील घराचा स्पर्श घडवणे शक्य नसले तरी तो फील देण्याचा प्रयत्न प्रकल्पांत होतो. काही ठिकाणी घरातील रचना मिळतीजुळती करून तो फील आणण्याचा प्रयत्न होतो.

कोकणातील वास्तू म्हटलं की अंगण आलंच. अंगण ही नुसती कल्पना नाही. ते मानवी डोळ्यासमोरील वास्तव आहे. अंगण वास्तूची शोभा वाढवते. वास्तूचे परिपूर्ण रूप हे अंगणामुळेच खुलते. घरासमोरील अंगण मनाला विसावा देते. या अंगणातील तुळस, विविध फुलझाडं परिसर सुगंधितकरून सोडतात. या मानवी अपेक्षा ओळखून आज कोकणात अनेक विकासक आपल्या प्रकल्पांची मांडणी करीत आहेत. कोकणच्या निसर्गरम्य ठिकाणचे अंगण तर खूप मजा देते. लहान मुलांसाठी हे अंगण  खेळण्या-बागडण्यासाठीही उपयुक्त ठरते. या सार्‍याचा विचार आज निवासी सदनिका प्रकल्पांतही केला जात असून "मोकळी जागा" याला खूप गांभीर्याने घेतले जाते आहे, ही बाब आपणास कोकणातील मोक्याचे विविध प्रकल्प फिरून पाहिल्यानंतर  सहज जाणवेल. आज या संकल्पनेचा उपयोग करून अनेक "विकासक" आपल्या प्रकल्पांना अधिकाधिक "कोकणी अथवा कोकण फ्रेंड्ली" करताहेत.

आज भारतात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणार्‍या व्यवसायात "रिअल इस्टेट" क्षेत्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. या उद्योगात खूपच सकारात्मकता आहे. यास्तव शासकीय स्तरावर या व्यवसायाच्या विकासासाठी पूरक वातावरण तयार व्हावे म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. कोकणात तर पर्यटन विकास, निसर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न, पायाभूत सुविधा विकास ह्या सार्‍या या व्यवसायाला अधिक बळ देतच असतात. आणि म्हणूनच या क्षेत्रात कोकणही आघाडीवर आहे.  या व्यवसायात थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणही गेल्या काही काळापासून वाढू लागले असून, याचा कोकणालाही उपयोग करून घेता येईल. आज जगातील अनेक देशांची गुंतवणूक या व्यवसायात भारतात होते आहे. व्यवसाय म्हणून कोकण नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे कोकणात ही गुंतवणूक वाढल्यास कोकणचे अर्थकारणही काही प्रमाणात बदलू शकते. अधिकाधिक आर्थिक उपलब्धि झाल्यास होणार्‍या विकासाचा आनंद गुंतवणूकदारांना सुद्धा मिळणार आहे, ज्यातुन गुंतवणूक वाढून संपूर्ण प्रगतीस वाव मिळू शकतो.

आजची बदलती मानवी जीवनशैली, कामाच्या व्यापातील वाढता ताणतणाव यामुळे अनेकजण निवांतपणाचे पर्याय शोधताना दिसतात. देशातील अनेक कॉर्पोरेट तसेच खाजगी कंपन्यांनी ५ दिवसांचा आठवडा ही संकल्पना रुजवायला सुरूवात केली आहे. पर्यायाने शनिवार-रविवार सुट्टी मिळू लागली आहे, मिळणार आहे. आठवडाभर कामाच्या दगदगीला कंटाळलेले अनेकजण "सेकंड होम" किंवा "वीकेंड होम" या पर्यायाचा विचार करतात. वीकेंड होम घालविण्यासाठीचे दुसरे घर आज अनेकांची गरज बनली आहे. आज ही सेकंड होमची संकल्पना मध्यमवर्गीयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गत १०-१५ वर्षांत या सेकंड होमच्या पसार्यात खूप वाढ झाली असून ज्यासाठी संपूर्ण कोकण एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

भारताच्या वर्तमान औद्योगिक धोरणांमुळे या "रिअल इस्टेट" प्रकल्पांत थेट १०० टक्के परकीय गुंतवणूक शक्य झाली आहे. थेट परकीय गुंतवणुकीच्या वर्तमान धोरणांमुळे पूर्वीचे निर्बंध कमी झाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापाराची आणि विकासाची दारे खुली झाली आहेत. प्रकल्पाच्या उभारणीतीत गुंतवणुकीसाठीचे अनेक अनुकूल मार्ग आणि सोयीसुविधा त्यामुळे सहजसुलभ झाल्या आहेत. एकूणात कोकणातील ही गुंतवणूक भविष्यात सोन्यासारखी उजळून निघणार आहे. जिचा लाभ आपण योग्य वेळी उठवायला हवा. आपण सुरक्षित, आनंददायी, समाधान मिळवून देणार्‍या अशा गुंतवणूक पर्यायाकडे पाहत असाल, तर नक्कीच कोकणचा आणि येथील विविध वास्तू प्रकल्पांचा सकारात्मक विचार करू शकता.

धीरज वाटेकरचिपळूण
dheerajwatekar@gmail.com
पूर्वप्रसिद्धी : दैनिक लोकसत्ता वास्तुरंग पुरवणी
19.03.2016
पुह्नार्प्रसिद्धी : दैनिक लोकसत्ता रत्नागिरी-सिंधुदुर्ग

२६.0१.201७ (प्रजासत्ताक दिन विशेष पुरवणी) 







बुधवार, २२ जून, २०१६

कपिलाषष्टी योग:राखाडी रंगाचा पिसारा फुलवलेला मोर

15.12.2015

देवांचा सेनापती कार्तिकेय आणि वाग्देवी सरस्वती यांचे वाहन असलेला सर्वांगसुंदर मोर हा भारताचा साऱ्या जगाने मान्यता दिलेला राष्ट्रीय पक्षी. मोर नाचत असतांना त्याची पिसे सप्तरंगासारखी दिसतात. साधारणत: आकाशात ढग गोळा झाले की मोर नाचतो. तेव्हा त्याची पिसे गळतात. निसर्गनियमाप्रमाणे तशीही ती औगस्टनंतर गळतात. उन्हाळ्यात ती पुन्हा येतात. मादीला आकर्षीत करणे हा या पिसार्याचा मुख्य उद्देश. मोराच्या लांबच लांब पिसार्याची लांबी, त्याच्या एकूण शरीराच्या ६०% इतकी असते. मोराच्या ह्या लांबलचक पिसार्याखाली राखाडी रंगाची पिसं असतात. यांच काम म्हणजे ह्या पिसार्याला आधार देणं. ही मोरपिसं जितक्या वेळेस ही गळून पडतात, तितक्या वेळेस ती पुन्हा येत रहातात. त्यामुळे गळलेली राखाडी रंगाची पिसे असलेला मोर सहसा पिसारा फुलवताना, नाचताना, बागडताना दिसत नाही, कारण त्यात काही गंमत नाही आणि मुख्यत्वे त्या पिसार्याने तो मादीला आकर्षित करू शकत नाही. हे जरी निसर्गनियमित तत्व असले तरी तत्वाला अपवाद असतातच. असाच अपवादात्मक "राखाडी रंगाचा पिसारा फुलवलेला मोर" आम्हाला नुकताच आमच्या चिपळूणातील ओरायन इन्स्टिट्यूट ओफ सायन्सच्या "विद्यान अभ्यास दौरा" दरम्यान चिन्चोलिमोराची येथे दत्तात्रय थोपटे यांच्या कृषि पर्यटन केन्द्र मुक्कामी पाहायला आणि सुदैवाने क्‍लिक करायला मिळाला. अक्षरश: कपिलाषष्टीचा योग जुळून आल्यासारखे वाटले. 
 

लेखन आणि छायाचित्रे : धीरज वाटेकर

सामर्थ्य : जगावेगळ्या नात्यांचे




आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...