रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

नव्वद वर्षांची वास्तू आजही भक्कम उभी

रत्नागिरी - नव्वद वर्षांपूर्वी कोकणात खाडीकिनारीच्या मालदोली गावात उभारलेली देखणी, भव्य-दिव्य वास्तू आजही भक्कम उभी आहे. हा अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावाच आहे. रामचंद्र वासुदेव मराठे न्यास हे त्या वास्तूचे नाव. डॉ. विश्वेश्वरय्या यांचा परिसस्पर्श वास्तूच्या घडणीत असल्याचे सांगितले जाते; मात्र याला लेखी पुरावा नाही.
या वास्तूचे नियोजन करणारी व्यक्ती त्या काळातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ असावी, असे स्थापत्य अभियंता धीरज वाटेकर यांनी सांगितले. साडेसात एकर जागेत सुमारे २ हजार चौ. फूट आकाराच्या वास्तूत मुख्य दरवाजापासून पाठीमागील दरवाजापर्यंत सरळ रेषेत मोकळी जागा व त्याच्या दोनही बाजूला खोल्या आहेत. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. आतून-बाहेरून लाकडाचे स्वतंत्र दोन जिने आहेत. ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज लागणार नाही वा तो दमणार नाही, अशी जिन्यांची तंत्रशुद्ध रचना आहे. काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत.
विहीर, डोंगरातील झऱ्यांचे पाणी, विशिष्ट उंचीवर १० बाय २० फूट आकाराच्या टाक्‍यात साठविण्याची सोय आहे. वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्‍या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. शास्त्रीयदृष्ट्या आवश्‍यक चौफेर सूर्यप्रकाश प्रत्येक खोलीत मिळतो. छताच्या रिपांचा भाग फळ्या मारून बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात छोट्या गळतीला प्रतिबंध होतो. वास्तूतील सर्व दरवाजे-खिडक्‍या बंद करायला किमान ३० मिनिटे लागतात.या वास्तूत विश्व हिंदू परिषदेचे अनेक समाजपयोगी उपक्रम चालतात. 
मैत्रीखातर काम
या वास्तूचा आराखडा आणि संपूर्ण काम हे विश्वविख्यात अभियंता भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पुण्यातील पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी रामचंद्र वासुदेव मराठे यांच्याशी असलेल्या मैत्रीखातर त्यांनी ते केले, असे सांगितले जाते. 
हे सारे वैभव त्या काळात मालदोलीसारख्या अगदी ग्रामीण भागात कसे उभारले, हे एक आश्‍चर्यच आहे. त्या अभियंत्याला अभियंता दिनी मानाचा मुजरा करायलाच हवा.
 - धीरज वाटेकर
भक्कम वास्तू अशी...
  •  छताच्या लगी मजबूत 
  •  कोठेही बाक आलेले नाही
  •  आय बीम आजही मजबूत 
  •  भिंतींचा गिलावा उत्तम 
  •  लाकूड अजूनही मजबूत





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...