बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

कोकण पर्यटन विकास राजाश्रयाच्या प्रतिक्षेत !

                                  
कोकण पर्यटन विकास हा सातत्याने काम करण्याचा विषय आहे. अशी कामे करणाऱ्या अनेक कोकणी माणसांनी आपापल्या गावात दृष्ट लागण्यासारखे प्रकल्प उभारलेत. त्या प्रकल्पांची आणि इथल्या निसर्गाची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की कोकणात प्रवेश करायला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जमिनीवर रस्ता’ म्हणतात तो शिल्लक नसला तरीही पर्यटक तुडुंब गर्दी करतात. कोकण पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर अनेक सर्वस्तरीय बोलके पोपट’ सदैव बरळत असतात. वरवरच्या गोष्टीत समाधान मानणाऱ्या आमचीएखादा विषय हातात घेऊन तो तडीस लावण्याची मानसिकताच नसल्याने कोकणातील खऱ्याखुऱ्या विकासाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. स्वर्गीय निसर्गसौंदर्याची आणि साधनसंपत्तीची मुक्तहस्ते उधळण केलेलाविकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेला हा उपेक्षितअविकसित प्रदेश राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहे. वानगीदाखल बोलायचे झाल्यास डेस्टीनेशन चिपळूणचे स्वप्न पाहणाऱ्या ग्लोबल चिपळूण पर्यटन’ संस्थेचे गेल्या ५ वर्षांचे अनुभव पाहाता राजाश्रयाची आवश्यकता सहज लक्षात येईल.

                               भारतातल्या अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्था पर्यटनावर उभारलेल्या आहेत. कोकणात ७२० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांगा, जंगले, जैवविविधतानद्या,धबधबेतलावप्राचीन वास्तूतीर्थक्षेत्रेकिल्लेथंड हवेची ठिकाणे आदि सारं असूनही कोकण पर्यटनाची अवस्था आजही दिनदुबळी आहे. जागतिक पर्यटनातील आपला वाटा अगदी नगण्य आहे. वास्तविक पर्यटन हा जगात सर्वाधिक रोजगार आणि अति मौल्यवान परकीय चलन मिळवून देणारा उद्योग आहे. परंतु भारतात आजही तो दुर्लक्षित आहे. निसर्गरम्य कोकणात येणा-या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सर्वकाही आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कोकणातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत असतात. कोकणातील समुद्रकिनारे पर्यटन हंगामात पर्यटकांच्या वर्दळीने फुलून गेलेले असतात. परंतु काही अपवाद वगळता राज्य व केंद्र सरकारने कोकणच्या पर्यटन विकासाच्या किरकोळ स्वरूपातून निधी देऊन त्याठिकाणी काही अल्पसल्प कामे केलेली आहेत. त्यापलीकडे कोकणच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरीव असे काहीही केले नाही. केवळ घोषणाबाजीच चालू आहे. कोकणातील कातळशिल्पांना धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अलिकडे प्रयत्न सुरू केलेत. कोकण पर्यटन विकास आराखडा संदर्भात अतिशय महत्वाच्या बैठका कोकणात सतत होताच असतातत्या बैठकांवर पैसाही खर्च होत असतो. कोकणात आलेल्या पर्यटकाने काही दिवस येथेच वास्तव्य करून पर्यटनाचा आनंद घ्यावा यासाठी शासन आणि प्रशासनाने आजवर काय प्रयत्न केलेत ? हा प्रश्न आहे. कोकणातील कातकरी, आदिवासीकोळी आदि समाजाच्या सोबतची अनुभूती आपण पर्यटनात आणू शकतो का ? असे नाविन्यपूर्ण विचार करायला प्रशासनाला वेळच नाही आहे. युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास गतीने व्हावा यासाठी नारायण राणे यांनी स्वत: मुख्यमंत्री झाल्यावर स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास महामंडळ ही कंपनी स्थापन केली होती. पुढे ती बरखास्त केली गेली. छगन भुजबळ पर्यटनमंत्री असताना रत्नागिरी येथे झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणसाठी स्वतंत्र सागरी पर्यटन महामंडळ स्थापन होणार होते. वर्तमान सरकारनेही भरीव कोकण विकासाच्या स्वरुपात पोकळ घोषणा केल्या आहेत. एप्रिल-२०१६ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासाच्या घोषणांचा पाऊस पाडला होता. कोकणच्या विकासाची भूक भागविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत कोकणच्या पर्यटन विकासाची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. कोकणच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले असले तरीही, ‘कोकणच्या पदरात काय पडले ?’ याचे मोजमाप होणारच आहे.

                                 
रोजगारासाठी मुंबईकडे डोळे लावलेल्या कोकणाची गेल्या १५-२० वर्षांपासून सर्वदूर चर्चा होत आहे. या चर्चेतून निघणाऱ्या मंथनानुसार चिंतन करून कोकणाचा पर्यटन विकास करण्याचा विचारही होतो आहे. पण त्याचा वेग मंझील अभी बहोत दूर है म्हणावं असा आहे. कोकणात जलवाहतुकीच्या विकासाचा प्रश्न मोठा आहे. येथे आजही केवळ महत्त्वाच्या बंदरांमधून दळणवळण सुरु आहे. त्या महत्त्वाच्या बंदरांवर उतरले तर पुढे जायला वाहतूक सेवा उपलब्ध नाही. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असतेपरंपरागत बोटींच्या मंदगतीमुळे प्रवासाला वेळ लागतो. फारपूर्वी बॅरिस्टर नाथ पैकुसुमताई अभ्यंकरतात्यासाहेब नातू, मधु दंडवते आदिंसह आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू वगळता कोकणच्या विकासाच्या मुलभूत संकल्पना समजावून घेऊन राजकारण्यांनी विचार केल्याचे फारसे जाणवत नाही. आजकालचे लोकप्रतिनिधी तर आपला गड राखण्याच्याच गर्तेत पुरते अडकलेले असतात. सध्या कोकणात येणारे विकासाचे प्रकल्प पाहाता, ‘आपली पुढची पिढी कोकणात राहील का ?’ असा प्रश्न केरळच्या महापुराने समोर उभा करून ठेवला आहे. केरळला आलेला महापूर गेल्या शंभर वर्षांतला सर्वात मोठा होता. निसर्गाला आव्हान दिलं की काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे हा महापूर आहे. केरळमध्ये झालेली बेसुमार वृक्षतोडडोंगरांचं उत्खननसपाटीकरणनियमांना फासलेला हरताळभातशेतीवरील अतिक्रमणबेसुमार बांधकामेनदीतला वाळू उपसा हे सारे कोकणातही सुरू आहेत. डॉ. माधव गाडगीळ समितीच्या पश्चिम घाट विषयक अहवाल न स्वीकारून कोकण विकासाच्या अनुषंगाने उडवलेली चेष्टा यांमुळे येणारा काळ भयावह असणार आहे. राज्याच्या राजधानीत,मुंबईत पाणी झिरपायला माती शिल्लक नाही. कोकणातही बेसुमार वृक्षतोड, डोंगर पोखरले जात आहेत. विकास करणाऱ्या शासनप्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या आकलनाच्या पलिकडचा महाप्रलय केरळने अनुभवला. आपल्या डोळय़ांदेखत अनेक संसार उद्ध्वस्त होताना केरळातील नागरिकांनी पाहिले. केरळ राज्यातील नैसर्गिकता आणि कोकण या दोहोमध्ये बरेच साम्य आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती आणि कोकणातील स्थिती हे साम्य सहज लक्षात येते. कोकणातील बंदरे आणि केरळ राज्यातील समुद्रकिनारे आणि बंदरे यातही बरेच साम्य आहे. कोकणात दीडशे इंचापेक्षाही अधिक पाऊस प्रतिवर्षी कोसळतो. नदीनाले तुडुंब भरून वाहतात. नदीनाल्यांना पावसाने वाढलेले पाणी थेट समुद्रापर्यंत जाते आहे. हे पाणी शहरांत शिरू शकते. याची झलक सन २००५ ने आपल्याला दाखविली आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी कोकणातील जनतेने पाणी मुरण्यासाठी गावपातळीवर प्रकल्प राबविणे आवश्यकता व्यक्त केली आहे.

                             जाहिरातींवर करोडो रुपये उधळून आपल्याच विकासाचे गोडवे गाताना सरकारने कोकण पर्यटनासारख्या शाश्वत विकासाच्या जाहिरातींवरही खर्च करायला हवा. कोकणात आपल्याला महत्व न कळलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. ज्याच्या नीटश्या मार्केटिंग मधून आपण पर्यटन वाढवू शकतो. हेमाडपंथीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं कोकणातील श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे १९०० वर्षानंतर आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. ही माहिती अगदी सहज फलकांद्वारे पर्यटकांपर्यंत जायला हवी. आपल्याकडील संकासूरजाकडीकोळी नृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेरावातील कलाकार’ निवडक पर्यटनस्थळी उभारून त्यातूनही पर्यटनवृद्धी आकाराला येऊ शकतेयाकरिता शिस्तबद्ध प्रयत्न गरजेचे आहेत. केळशीता. दापोलीतीलनिश्चित कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूच्या टेकडीला आम्ही विकासाच्या नावाखाली तिच्यावरून सागरी महामार्ग नेण्याच्या हेतूने अर्ध्यातून कापली आहे. आमचे हे असे वागणे, ‘आमचे केरळ नक्की होणार ?’ याचे द्योतक म्हणावे का गुहागर-पालशेतची नव्वद हजार वर्षे जुनी पुराश्मयुगकालीन गुहा संशोधनाच्या वीस वर्षांनंतरही दुर्लक्षित आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये नॅरो गेज’ नेरळ-माथेरानची टॉय ट्रेन’ वगळताहजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाहीयाची पर्यटनाच्या नावाने बोंबलणाऱ्या लोकप्रतिनिधींना लाज वगैरे वाटत नाही. महाराजांच्या किल्ल्यांना आम्ही आजहीपुरातत्त्वीय जागतिक पटलावर आणू शकलेलो नाही. भाषण करताना छत्रपती शिवरायचा जयघोष करण्यापलिकडे काही करण्याची आमची नि आमच्या श्रेष्ठींची कुवतच नाहीअसे अनेकदा वाटते. कोकणात अलीकडच्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे होऊ लागले आहेत. त्यासाठी कोकण पर्यटन” म्हणून प्रयत्न व्हायला हवेत ! आज कोकणात प्रत्येकजण त्याला हवा असलेला कोकणाचा पर्यटन विकास करू पाहतो आहे. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण कुठेही फिराआपल्याला काही महत्वाच्या ठिकाणीमुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here’ असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहेयाची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातीलबरचं काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेलआपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं याचे नियोजनही कराल. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहेमग आपल्याला अशी होर्डींग्स उभारण्यासाठी कोणी अडवलंय पर्यटन विकासकामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदार यंत्रणांना पर्यटन दृष्टी किती असते समुद्रकिनाऱ्यावरील कामे,  किल्ल्यांचीहेरीटेजची डागडुजी करताना काम करणारा आणि करून घेणारा त्याकडे फक्त ठेकेदारी काम’ म्हणून पाहतो, मग अशा पर्यटन विकासाच्या कामांचा पुढे अल्पकाळात पुरता बोजवारा उडतो. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग म्हणजे आपला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६’ अजूनही पूर्ण होतो आहे. या राष्ट्रीय महामार्गावरएखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे प्राचीन कोकण अगदी जसेच्या-तसेधूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावातखानपानजगण्याच्या काही सवयीमनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! हा विचार पुढे नेणाऱ्या गावाला शासनाने विशेष प्रोत्साहन योजना’ जाहीर करायला काय हरकत आहे ?

    कोकण ही अभिजात कलावंतांची रंगभूमी आहे. येथील माणसांनी दशावतारभजनसंगीतनाटय़बाल्या डान्सनमनकलगीतुरा आदि अनेक लोककला-परंपरा पूर्वांपार जपल्या आहेत. सातासमुद्रापार पोहोचविल्या आहेत. आपल्याकडे दूरचित्रवाणी मालिकांत जे तंत्रज्ञ (पडद्यामागचे कलाकार) आहेतत्यातील बहुतांशी कोकणातील आहेत. ह्या सर्व कला शतकानुशतके मोबदल्याच्या विचार ना करताकलेला दैवत मानणाऱ्या कोकणी माणसाने जपल्यात. कमी मानधनात काम करणारे कलावंत दुनियेत फक्त कोकणात सापडतात. कोकण विकासाची दिवास्वप्न दाखवणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींना यांचे दु:ख समजत नाही. कोकणातील माणसांची श्रद्धा डोळस तेवढीच जाज्ज्वल्य आहे. या मातीतील ग्रामीण जीवनाचा गावपाडा हा आजही न्यायनीतीधर्म अनुष्ठान लाभलेल्या गावह्राटीला अधीन राहून चालत आहे. अनेक गावांनी आपली पारंपारिक वैशिष्ट्ये जपलीत. समाजातून संस्कृती आणि संस्कृतीतून परंपरेचा उगम होत असतो. या परंपरा आजही मनुष्य जीवनाला जगण्याचा भावनिक आधार प्राप्त करून देत आहेत. दैवी कुलाचार व कुलधर्म पाळण्यासोबत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी देवाचा कौल घेण्याची प्रथा इथल्या गावह्राटीचे एक खास वैशिष्टय आहे. गावाच्या चतु:सीमेत राहणारे ग्रामस्थ,प्राणीमात्रजीवजंतू यांचे परस्पर संबंधित व्यवहार-नाते सांगणारी गावह्राटी’ अतिशय व्यापकसर्वहितकरविविध सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी अतिशय प्राचीन संकल्पना आहे. तळकोकणात आजही काहीश्या सूर्यास्ती वातावरणात अनेक गावांत ही पणती प्रकाशते आहे. शहरी बकालपणाला कंटाळलेलाघडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला-थकलेला,शरीरावरचामनावरचा ताण हलका करण्यासाठी आलेल्या प्रत्येक पर्यटकाला कोकणातील हा वेगळेपणा भावतो आहे. कोकणचा कोकणीपणाइथली संस्कृती मूळपणाला धक्का न लावता ती पर्यटकांसमोर आणण्याचे शहाणपण आम्हाला कधी येणार हा प्रश्न आहेकोकणातील दाभोळ हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीनशक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल२५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. आम्ही आमच्या विकासासाठी हे संदर्भ वापरणार केव्हा या बंदरातवाशिष्ठी बॅकवॉटरमध्ये शेकडो मगरी आहेत, इथे मगर विकास-पर्यटन प्रकल्प साकारता येईल.

            
गोव्यात मांडवी’ आणि झुआरी’ नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहेमग चेरापुंजी खालोखाल पर्जन्यमान असलेल्या कोकणाला काय अवघड आहे कोकणच्या मागील पन्नास वर्षाच्या इतिहासाचा अभ्यासआगामी पन्नास वर्षाचा वेध घेवून परिपूर्ण नियोजन करणे अत्यावश्यक आहे. पांढरी वाळू आणि निळाशार समुद्र हे आपल्या समुद्राचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे, त्याचे योग्य मार्केटिंग व्हायला हवे. कोकणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात समुद्रडोंगरहिलस्टेशनबॅकवॉटरकिल्लेनिसर्ग, जंगलसंस्कृती,लोककलाहेरीटेज’ अशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी केलीजागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून गावागावात निर्माण केल्या तर कोट्यवधी पर्यटक कोकणात येतील. सागरी पर्यटनडॉल्फिन सफारीस्नॉर्कलिंगबिच टुरिझमबॅकवॉटर टुरिझमकृषी व ग्रामीण पर्यटनसह्यादीतील इको टुरिझमअॅडव्हेंचर टुरिझमजंगल सफारी सारखी दालने कोकणाला खुणावत आहेत. कृषीच्या दृष्टीने कोकण समृद्ध आहे. इथल्या हापूसची १००० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल आहे. कोकणात वालुकामय परंतु खडकाळ बीचेसची संख्या खूप म्हणजे शंभरच्यावर आहेअशा ठिकाणी काही वेगळे पर्यटन प्रकल्प राबविता येतील का ? यावर विचार व्हायला हवा. कोकणात येवामेवा चाखून जावा म्हणणारी नारळमसालेकाजूकोकमकेळीअननसवनौषधी ही श्रीमंत पिकेही पर्यटनपूरक आहेतसर्वाना एकत्रित येऊन काम करावे लागेल.

                आगामी काही दशकात देशातील ४० टक्के समूहाला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाहीअसे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातूनचिपळूणमधून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीला महाराष्ट्रातील बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या यादीत अग्रक्रमावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोयना अवजल’ हे आज कोकणचे जलवैभवठरायला हवे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आशियातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा सिंचन योजनामुळे कृष्णा नदीतील २२ टीएमसी पाणी डोंगरारांगांमधून उचलून सातारासांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कडेगावखानापूरमाण खोऱ्यातील आटपाडी ते थेट सांगोल्यापर्यंतच्या ८० हजार ४५६ हेक्ट)र दुष्काळग्रस्त भागातील गावांना ओलिताखाली आणल्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. सन १९६५ पासून वाशिष्ठी नदीद्वारे गेली ५३ हून अधिक वर्षे ६७ टीएमसी पाणी प्रतिवर्षी समुद्राला मिळते आहे. आगामी काळात सौरउर्जा स्वस्त होण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशभर गंभीर बनतो आहे. त्यामुळे कोयना अवजलला मागणी वाढणार आहे. तत्पूर्वीच संपूर्ण कोकणवासियांनीलोकप्रतिनिधींनी या अवजलकडे जलवैभव’ म्हणून पाहात कोकणची तहान कायमस्वरूपी भागविण्यासाठी सज्ज व्हायला हवे आहे ! भविष्यात पाण्यावरून युध्द होतीलसंघर्ष होतीलअसे गेली अनेक दशके जाणकार सांगत आहेत. युध्दसंघर्ष होईल की नाही हा वेगळा विषय असला तरी पाण्याचे महत्त्व त्यातून स्पष्ट होते आहे. गेली ५३ वर्षे वाशिष्ठीद्वारे सागराला मिळणारे कोयनेचे पाणीटेंभू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर विचार करताअसे आणखी किती दिवस पाहायाचे हा प्रश्नच आहे. स्थानिकांना कोकण पर्यटनातून रोजगार संधी मिळण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या परिसराचा अभ्यास करायला हवा आहे. आपल्या भागात येणाऱ्या पर्यटकांना काय आवडते पर्यटक कोठे अधिक रमतात ?याचा विचार करून त्यानुसार आपण इतरांपेक्षा काय वेगळे करू शकतो असा विचार कोकणी तरुणांनी करायला हवाय. आपल्याकडे साधारणत: २०-२५ वर्षांपूर्वी पापड-लोणची-फेण्यावगैरे खाद्यपदार्थ घरी करायचाच प्रकार होता. आजचे याचे मार्केट आपण जाणतो. पर्यटन हा असाच प्रकार आहे. पूर्वी आपल्याकडे फक्त धार्मिक पर्यटन ही संकल्पना होती. आज आम्ही कोकणातला पाऊस’ विकण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडचे पर्यटन हे असे आपण वर्षभर जपायला हवे. त्याकरिता स्वतःच्या इच्छेनुरूप मनापासून प्रयत्न करणाऱ्या अभ्यासू तरुणांना या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. भाषेवर प्रभुत्त्व मिळविल्यास उत्तम गाईड होता येईल. पर्यटन क्षेत्रातील मोक्याची जागा उपलब्ध झाल्यास तिथे येणाऱ्या पर्यटकांची गरज ओळखून नवा व्यवसाय सुरु करता येईल. प्रसंगी आपल्या छंदालाही व्यवसायाचे स्वरूप देता येईल. गणपतीपुळेतारकर्लीदिवेआगरअलिबागडहाणूपालघर ही ठिकाणे डोळसपणे फिरल्यास आपल्याला पर्यटनातील अनेक व्यवसाय सापडतील. वेगवेगळ्या हॉटेलरिसोर्ट्समध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ ही आज मोठी रोजगाराची संधी आहे. आजही अनेक दर्जेदार रिसोर्ट्सना चांगल्या मनुष्यबळाची गरज सतावते आहे. त्याकडेही तरुणांनी पाहाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे आहे.

                  कोकणात पर्यटन क्षेत्रात क्षमता असूनही भरपूर मागासलेपण आहे. पायाभूत सुविधांची वानवा आहे. कोकणातून सर्वत्र हवाईबंदर प्रवास सुरु व्हावा म्हणून आम्ही कोकणवासीयच आग्रही नाहीआम्हाला त्याची गरजच वाटत नाहीकोकण रेल्वे’ आम्हाला हवी होतीम्हणून झाली का ? याबाबत मला प्रश्न आहे. धावत्या युगात काळही धावतोयजगाची समीकरणे रोज बदलताहेत ! वेगेवेगळे प्रवाह येताहेत. या साऱ्या प्रवासातलालमातीचा टिळा कपाळी लावून पराक्रमाचीमांगल्याचीसृष्टिसौंदर्याचीइतिहासाची ज्योत तेवत ठेवणारा कोकण त्याच्या सुयोग्य विकासासाठी शासनप्रशासनलोकप्रतिनिधी आणि आम्हाला खुणावतोयत्याच्या आवाजाची गाज ऐकून सर्व कोकणवासी कार्यरत झाले,त्याला राजाश्रय मिळाला तर कोकण पर्यटन’ राज्याच्या विकासाचा पासवर्ड बनेल ! 

धीरज वाटेकर
विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८
(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहासपर्यटनपर्यावरणविषयकसामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...