मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

"प्रतिभासंगम का ? व कशासाठी ?"


पूर्वप्रसिद्धी दैनिक सागर 7.9.1998


सहज सुचल म्हणून...

7 सप्टेंबर 1998...

आजपासून बरोबर 19 वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी दैनिक सागरने प्रकाशित केलेल्या "प्रतिभासंगम का ? व कशासाठी ?" या लेखाने आमचा "प्रकाशित लेखन प्रवास" सुरु झाला. आणि याच तारखेला जन्मलेल्या सखीशी (रूपाली अरविंद जाधव-पोलादपूर) आम्ही 7 वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालो.

लग्नानंतर बायकोचा जन्मदिवस आठवणीत असणे, सुखी संसारासाठी आवश्यक असल्याचे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. नियतीने, निसर्गशक्तीने, परमेश्वराने आमच्यासारख्या लेखन प्रांतात कार्यरत मनुष्याच्या नशीबी असा योगायोग जुळवून आमच्या लेखन कार्याला अधिकचे बळ पुरविले आहे, असे आम्ही मानतो.

आजच्या दिनी "त्या" निसर्गशक्तीस वंदन...!

सौ. पत्नीस हार्दिक अभिष्टचिंतन...!

धीरज वाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कोकणच्या सांस्कृतिक बंधातील उमाळा

            कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला की त्याच्यातल्या ‘कोकणी’ जाणीवा अलगद फुलत जातात. या ...