थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने सीगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यामुळे किनारपट्टीवर विलोभनीय दृश्य पहावयास मिळत असून किनाऱ्याचे वैभव अधिक खुलले आहे. हे सीगल पक्षी अमेरिका, युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी कोकणात येत असतात. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असे मोहक रूप असलेल्या पक्ष्यांना या पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करत असतात.
फोटोस्टोरी : धीरज वाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा