बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

कोकण पर्यटन विकास राजाश्रयाच्या प्रतिक्षेत !

                                  
कोकण पर्यटन विकास हा सातत्याने काम करण्याचा विषय आहे. अशी कामे करणाऱ्या अनेक कोकणी माणसांनी आपापल्या गावात दृष्ट लागण्यासारखे प्रकल्प उभारलेत. त्या प्रकल्पांची आणि इथल्या निसर्गाची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की कोकणात प्रवेश करायला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जमिनीवर रस्ता’ म्हणतात तो शिल्लक नसला तरीही पर्यटक तुडुंब गर्दी करतात. कोकण पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर अनेक सर्वस्तरीय बोलके पोपट’ सदैव बरळत असतात. वरवरच्या गोष्टीत समाधान मानणाऱ्या आमचीएखादा विषय हातात घेऊन तो तडीस लावण्याची मानसिकताच नसल्याने कोकणातील खऱ्याखुऱ्या विकासाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. स्वर्गीय निसर्गसौंदर्याची आणि साधनसंपत्तीची मुक्तहस्ते उधळण केलेलाविकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेला हा उपेक्षितअविकसित प्रदेश राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहे. वानगीदाखल बोलायचे झाल्यास डेस्टीनेशन चिपळूणचे स्वप्न पाहणाऱ्या ग्लोबल चिपळूण पर्यटन’ संस्थेचे गेल्या ५ वर्षांचे अनुभव पाहाता राजाश्रयाची आवश्यकता सहज लक्षात येईल.

                               भारतातल्या अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्था पर्यटनावर उभारलेल्या आहेत. कोकणात ७२० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांगा, जंगले, जैवविविधतानद्या,धबधबेतलावप्राचीन वास्तूतीर्थक्षेत्रेकिल्लेथंड हवेची ठिकाणे आदि सारं असूनही कोकण पर्यटनाची अवस्था आजही दिनदुबळी आहे. जागतिक पर्यटनातील आपला वाटा अगदी नगण्य आहे. वास्तविक पर्यटन हा जगात सर्वाधिक रोजगार आणि अति मौल्यवान परकीय चलन मिळवून देणारा उद्योग आहे. परंतु भारतात आजही तो दुर्लक्षित आहे. निसर्गरम्य कोकणात येणा-या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सर्वकाही आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कोकणातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत असतात. कोकणातील समुद्रकिनारे पर्यटन हंगामात पर्यटकांच्या वर्दळीने फुलून गेलेले असतात. परंतु काही अपवाद वगळता राज्य व केंद्र सरकारने कोकणच्या पर्यटन विकासाच्या किरकोळ स्वरूपातून निधी देऊन त्याठिकाणी काही अल्पसल्प कामे केलेली आहेत. त्यापलीकडे कोकणच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरीव असे काहीही केले नाही. केवळ घोषणाबाजीच चालू आहे. कोकणातील कातळशिल्पांना धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने अलिकडे प्रयत्न सुरू केलेत. कोकण पर्यटन विकास आराखडा संदर्भात अतिशय महत्वाच्या बैठका कोकणात सतत होताच असतातत्या बैठकांवर पैसाही खर्च होत असतो. कोकणात आलेल्या पर्यटकाने काही दिवस येथेच वास्तव्य करून पर्यटनाचा आनंद घ्यावा यासाठी शासन आणि प्रशासनाने आजवर काय प्रयत्न केलेत ? हा प्रश्न आहे. कोकणातील कातकरी, आदिवासीकोळी आदि समाजाच्या सोबतची अनुभूती आपण पर्यटनात आणू शकतो का ? असे नाविन्यपूर्ण विचार करायला प्रशासनाला वेळच नाही आहे. युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास गतीने व्हावा यासाठी नारायण राणे यांनी स्वत: मुख्यमंत्री झाल्यावर स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास महामंडळ ही कंपनी स्थापन केली होती. पुढे ती बरखास्त केली गेली. छगन भुजबळ पर्यटनमंत्री असताना रत्नागिरी येथे झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणसाठी स्वतंत्र सागरी पर्यटन महामंडळ स्थापन होणार होते. वर्तमान सरकारनेही भरीव कोकण विकासाच्या स्वरुपात पोकळ घोषणा केल्या आहेत. एप्रिल-२०१६ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासाच्या घोषणांचा पाऊस पाडला होता. कोकणच्या विकासाची भूक भागविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत कोकणच्या पर्यटन विकासाची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. कोकणच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले असले तरीही, ‘कोकणच्या पदरात काय पडले ?’ याचे मोजमाप होणारच आहे.

                                 
रोजगारासाठी मुंबईकडे डोळे लावलेल्या कोकणाची गेल्या १५-२० वर्षांपासून सर्वदूर चर्चा होत आहे. या चर्चेतून निघणाऱ्या मंथनानुसार चिंतन करून कोकणाचा पर्यटन विकास करण्याचा विचारही होतो आहे. पण त्याचा वेग मंझील अभी बहोत दूर है म्हणावं असा आहे. कोकणात जलवाहतुकीच्या विकासाचा प्रश्न मोठा आहे. येथे आजही केवळ महत्त्वाच्या बंदरांमधून दळणवळण सुरु आहे. त्या महत्त्वाच्या बंदरांवर उतरले तर पुढे जायला वाहतूक सेवा उपलब्ध नाही. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असतेपरंपरागत बोटींच्या मंदगतीमुळे प्रवासाला वेळ लागतो. फारपूर्वी बॅरिस्टर नाथ पैकुसुमताई अभ्यंकरतात्यासाहेब नातू, मधु दंडवते आदिंसह आता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू वगळता कोकणच्या विकासाच्या मुलभूत संकल्पना समजावून घेऊन राजकारण्यांनी विचार केल्याचे फारसे जाणवत नाही. आजकालचे लोकप्रतिनिधी तर आपला गड राखण्याच्याच गर्तेत पुरते अडकलेले असतात. सध्या कोकणात येणारे विकासाचे प्रकल्प पाहाता, ‘आपली पुढची पिढी कोकणात राहील का ?’ असा प्रश्न केरळच्या महापुराने समोर उभा करून ठेवला आहे. केरळला आलेला महापूर गेल्या शंभर वर्षांतला सर्वात मोठा होता. निसर्गाला आव्हान दिलं की काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे हा महापूर आहे. केरळमध्ये झालेली बेसुमार वृक्षतोडडोंगरांचं उत्खननसपाटीकरणनियमांना फासलेला हरताळभातशेतीवरील अतिक्रमणबेसुमार बांधकामेनदीतला वाळू उपसा हे सारे कोकणातही सुरू आहेत. डॉ. माधव गाडगीळ समितीच्या पश्चिम घाट विषयक अहवाल न स्वीकारून कोकण विकासाच्या अनुषंगाने उडवलेली चेष्टा यांमुळे येणारा काळ भयावह असणार आहे. राज्याच्या राजधानीत,मुंबईत पाणी झिरपायला माती शिल्लक नाही. कोकणातही बेसुमार वृक्षतोड, डोंगर पोखरले जात आहेत. विकास करणाऱ्या शासनप्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या आकलनाच्या पलिकडचा महाप्रलय केरळने अनुभवला. आपल्या डोळय़ांदेखत अनेक संसार उद्ध्वस्त होताना केरळातील नागरिकांनी पाहिले. केरळ राज्यातील नैसर्गिकता आणि कोकण या दोहोमध्ये बरेच साम्य आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती आणि कोकणातील स्थिती हे साम्य सहज लक्षात येते. कोकणातील बंदरे आणि केरळ राज्यातील समुद्रकिनारे आणि बंदरे यातही बरेच साम्य आहे. कोकणात दीडशे इंचापेक्षाही अधिक पाऊस प्रतिवर्षी कोसळतो. नदीनाले तुडुंब भरून वाहतात. नदीनाल्यांना पावसाने वाढलेले पाणी थेट समुद्रापर्यंत जाते आहे. हे पाणी शहरांत शिरू शकते. याची झलक सन २००५ ने आपल्याला दाखविली आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी कोकणातील जनतेने पाणी मुरण्यासाठी गावपातळीवर प्रकल्प राबविणे आवश्यकता व्यक्त केली आहे.

                             जाहिरातींवर करोडो रुपये उधळून आपल्याच विकासाचे गोडवे गाताना सरकारने कोकण पर्यटनासारख्या शाश्वत विकासाच्या जाहिरातींवरही खर्च करायला हवा. कोकणात आपल्याला महत्व न कळलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. ज्याच्या नीटश्या मार्केटिंग मधून आपण पर्यटन वाढवू शकतो. हेमाडपंथीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं कोकणातील श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे १९०० वर्षानंतर आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. ही माहिती अगदी सहज फलकांद्वारे पर्यटकांपर्यंत जायला हवी. आपल्याकडील संकासूरजाकडीकोळी नृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेरावातील कलाकार’ निवडक पर्यटनस्थळी उभारून त्यातूनही पर्यटनवृद्धी आकाराला येऊ शकतेयाकरिता शिस्तबद्ध प्रयत्न गरजेचे आहेत. केळशीता. दापोलीतीलनिश्चित कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूच्या टेकडीला आम्ही विकासाच्या नावाखाली तिच्यावरून सागरी महामार्ग नेण्याच्या हेतूने अर्ध्यातून कापली आहे. आमचे हे असे वागणे, ‘आमचे केरळ नक्की होणार ?’ याचे द्योतक म्हणावे का गुहागर-पालशेतची नव्वद हजार वर्षे जुनी पुराश्मयुगकालीन गुहा संशोधनाच्या वीस वर्षांनंतरही दुर्लक्षित आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये नॅरो गेज’ नेरळ-माथेरानची टॉय ट्रेन’ वगळताहजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाहीयाची पर्यटनाच्या नावाने बोंबलणाऱ्या लोकप्रतिनिधींना लाज वगैरे वाटत नाही. महाराजांच्या किल्ल्यांना आम्ही आजहीपुरातत्त्वीय जागतिक पटलावर आणू शकलेलो नाही. भाषण करताना छत्रपती शिवरायचा जयघोष करण्यापलिकडे काही करण्याची आमची नि आमच्या श्रेष्ठींची कुवतच नाहीअसे अनेकदा वाटते. कोकणात अलीकडच्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे होऊ लागले आहेत. त्यासाठी कोकण पर्यटन” म्हणून प्रयत्न व्हायला हवेत ! आज कोकणात प्रत्येकजण त्याला हवा असलेला कोकणाचा पर्यटन विकास करू पाहतो आहे. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण कुठेही फिराआपल्याला काही महत्वाच्या ठिकाणीमुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here’ असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहेयाची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातीलबरचं काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेलआपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं याचे नियोजनही कराल. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहेमग आपल्याला अशी होर्डींग्स उभारण्यासाठी कोणी अडवलंय पर्यटन विकासकामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदार यंत्रणांना पर्यटन दृष्टी किती असते समुद्रकिनाऱ्यावरील कामे,  किल्ल्यांचीहेरीटेजची डागडुजी करताना काम करणारा आणि करून घेणारा त्याकडे फक्त ठेकेदारी काम’ म्हणून पाहतो, मग अशा पर्यटन विकासाच्या कामांचा पुढे अल्पकाळात पुरता बोजवारा उडतो. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग म्हणजे आपला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६’ अजूनही पूर्ण होतो आहे. या राष्ट्रीय महामार्गावरएखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे प्राचीन कोकण अगदी जसेच्या-तसेधूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावातखानपानजगण्याच्या काही सवयीमनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! हा विचार पुढे नेणाऱ्या गावाला शासनाने विशेष प्रोत्साहन योजना’ जाहीर करायला काय हरकत आहे ?

    कोकण ही अभिजात कलावंतांची रंगभूमी आहे. येथील माणसांनी दशावतारभजनसंगीतनाटय़बाल्या डान्सनमनकलगीतुरा आदि अनेक लोककला-परंपरा पूर्वांपार जपल्या आहेत. सातासमुद्रापार पोहोचविल्या आहेत. आपल्याकडे दूरचित्रवाणी मालिकांत जे तंत्रज्ञ (पडद्यामागचे कलाकार) आहेतत्यातील बहुतांशी कोकणातील आहेत. ह्या सर्व कला शतकानुशतके मोबदल्याच्या विचार ना करताकलेला दैवत मानणाऱ्या कोकणी माणसाने जपल्यात. कमी मानधनात काम करणारे कलावंत दुनियेत फक्त कोकणात सापडतात. कोकण विकासाची दिवास्वप्न दाखवणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींना यांचे दु:ख समजत नाही. कोकणातील माणसांची श्रद्धा डोळस तेवढीच जाज्ज्वल्य आहे. या मातीतील ग्रामीण जीवनाचा गावपाडा हा आजही न्यायनीतीधर्म अनुष्ठान लाभलेल्या गावह्राटीला अधीन राहून चालत आहे. अनेक गावांनी आपली पारंपारिक वैशिष्ट्ये जपलीत. समाजातून संस्कृती आणि संस्कृतीतून परंपरेचा उगम होत असतो. या परंपरा आजही मनुष्य जीवनाला जगण्याचा भावनिक आधार प्राप्त करून देत आहेत. दैवी कुलाचार व कुलधर्म पाळण्यासोबत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी देवाचा कौल घेण्याची प्रथा इथल्या गावह्राटीचे एक खास वैशिष्टय आहे. गावाच्या चतु:सीमेत राहणारे ग्रामस्थ,प्राणीमात्रजीवजंतू यांचे परस्पर संबंधित व्यवहार-नाते सांगणारी गावह्राटी’ अतिशय व्यापकसर्वहितकरविविध सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी अतिशय प्राचीन संकल्पना आहे. तळकोकणात आजही काहीश्या सूर्यास्ती वातावरणात अनेक गावांत ही पणती प्रकाशते आहे. शहरी बकालपणाला कंटाळलेलाघडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला-थकलेला,शरीरावरचामनावरचा ताण हलका करण्यासाठी आलेल्या प्रत्येक पर्यटकाला कोकणातील हा वेगळेपणा भावतो आहे. कोकणचा कोकणीपणाइथली संस्कृती मूळपणाला धक्का न लावता ती पर्यटकांसमोर आणण्याचे शहाणपण आम्हाला कधी येणार हा प्रश्न आहेकोकणातील दाभोळ हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीनशक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल२५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. आम्ही आमच्या विकासासाठी हे संदर्भ वापरणार केव्हा या बंदरातवाशिष्ठी बॅकवॉटरमध्ये शेकडो मगरी आहेत, इथे मगर विकास-पर्यटन प्रकल्प साकारता येईल.

            
गोव्यात मांडवी’ आणि झुआरी’ नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहेमग चेरापुंजी खालोखाल पर्जन्यमान असलेल्या कोकणाला काय अवघड आहे कोकणच्या मागील पन्नास वर्षाच्या इतिहासाचा अभ्यासआगामी पन्नास वर्षाचा वेध घेवून परिपूर्ण नियोजन करणे अत्यावश्यक आहे. पांढरी वाळू आणि निळाशार समुद्र हे आपल्या समुद्राचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे, त्याचे योग्य मार्केटिंग व्हायला हवे. कोकणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात समुद्रडोंगरहिलस्टेशनबॅकवॉटरकिल्लेनिसर्ग, जंगलसंस्कृती,लोककलाहेरीटेज’ अशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी केलीजागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून गावागावात निर्माण केल्या तर कोट्यवधी पर्यटक कोकणात येतील. सागरी पर्यटनडॉल्फिन सफारीस्नॉर्कलिंगबिच टुरिझमबॅकवॉटर टुरिझमकृषी व ग्रामीण पर्यटनसह्यादीतील इको टुरिझमअॅडव्हेंचर टुरिझमजंगल सफारी सारखी दालने कोकणाला खुणावत आहेत. कृषीच्या दृष्टीने कोकण समृद्ध आहे. इथल्या हापूसची १००० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल आहे. कोकणात वालुकामय परंतु खडकाळ बीचेसची संख्या खूप म्हणजे शंभरच्यावर आहेअशा ठिकाणी काही वेगळे पर्यटन प्रकल्प राबविता येतील का ? यावर विचार व्हायला हवा. कोकणात येवामेवा चाखून जावा म्हणणारी नारळमसालेकाजूकोकमकेळीअननसवनौषधी ही श्रीमंत पिकेही पर्यटनपूरक आहेतसर्वाना एकत्रित येऊन काम करावे लागेल.

                आगामी काही दशकात देशातील ४० टक्के समूहाला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाहीअसे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातूनचिपळूणमधून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीला महाराष्ट्रातील बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या यादीत अग्रक्रमावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोयना अवजल’ हे आज कोकणचे जलवैभवठरायला हवे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आशियातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा सिंचन योजनामुळे कृष्णा नदीतील २२ टीएमसी पाणी डोंगरारांगांमधून उचलून सातारासांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कडेगावखानापूरमाण खोऱ्यातील आटपाडी ते थेट सांगोल्यापर्यंतच्या ८० हजार ४५६ हेक्ट)र दुष्काळग्रस्त भागातील गावांना ओलिताखाली आणल्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. सन १९६५ पासून वाशिष्ठी नदीद्वारे गेली ५३ हून अधिक वर्षे ६७ टीएमसी पाणी प्रतिवर्षी समुद्राला मिळते आहे. आगामी काळात सौरउर्जा स्वस्त होण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशभर गंभीर बनतो आहे. त्यामुळे कोयना अवजलला मागणी वाढणार आहे. तत्पूर्वीच संपूर्ण कोकणवासियांनीलोकप्रतिनिधींनी या अवजलकडे जलवैभव’ म्हणून पाहात कोकणची तहान कायमस्वरूपी भागविण्यासाठी सज्ज व्हायला हवे आहे ! भविष्यात पाण्यावरून युध्द होतीलसंघर्ष होतीलअसे गेली अनेक दशके जाणकार सांगत आहेत. युध्दसंघर्ष होईल की नाही हा वेगळा विषय असला तरी पाण्याचे महत्त्व त्यातून स्पष्ट होते आहे. गेली ५३ वर्षे वाशिष्ठीद्वारे सागराला मिळणारे कोयनेचे पाणीटेंभू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर विचार करताअसे आणखी किती दिवस पाहायाचे हा प्रश्नच आहे. स्थानिकांना कोकण पर्यटनातून रोजगार संधी मिळण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या परिसराचा अभ्यास करायला हवा आहे. आपल्या भागात येणाऱ्या पर्यटकांना काय आवडते पर्यटक कोठे अधिक रमतात ?याचा विचार करून त्यानुसार आपण इतरांपेक्षा काय वेगळे करू शकतो असा विचार कोकणी तरुणांनी करायला हवाय. आपल्याकडे साधारणत: २०-२५ वर्षांपूर्वी पापड-लोणची-फेण्यावगैरे खाद्यपदार्थ घरी करायचाच प्रकार होता. आजचे याचे मार्केट आपण जाणतो. पर्यटन हा असाच प्रकार आहे. पूर्वी आपल्याकडे फक्त धार्मिक पर्यटन ही संकल्पना होती. आज आम्ही कोकणातला पाऊस’ विकण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडचे पर्यटन हे असे आपण वर्षभर जपायला हवे. त्याकरिता स्वतःच्या इच्छेनुरूप मनापासून प्रयत्न करणाऱ्या अभ्यासू तरुणांना या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. भाषेवर प्रभुत्त्व मिळविल्यास उत्तम गाईड होता येईल. पर्यटन क्षेत्रातील मोक्याची जागा उपलब्ध झाल्यास तिथे येणाऱ्या पर्यटकांची गरज ओळखून नवा व्यवसाय सुरु करता येईल. प्रसंगी आपल्या छंदालाही व्यवसायाचे स्वरूप देता येईल. गणपतीपुळेतारकर्लीदिवेआगरअलिबागडहाणूपालघर ही ठिकाणे डोळसपणे फिरल्यास आपल्याला पर्यटनातील अनेक व्यवसाय सापडतील. वेगवेगळ्या हॉटेलरिसोर्ट्समध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ ही आज मोठी रोजगाराची संधी आहे. आजही अनेक दर्जेदार रिसोर्ट्सना चांगल्या मनुष्यबळाची गरज सतावते आहे. त्याकडेही तरुणांनी पाहाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे आहे.

                  कोकणात पर्यटन क्षेत्रात क्षमता असूनही भरपूर मागासलेपण आहे. पायाभूत सुविधांची वानवा आहे. कोकणातून सर्वत्र हवाईबंदर प्रवास सुरु व्हावा म्हणून आम्ही कोकणवासीयच आग्रही नाहीआम्हाला त्याची गरजच वाटत नाहीकोकण रेल्वे’ आम्हाला हवी होतीम्हणून झाली का ? याबाबत मला प्रश्न आहे. धावत्या युगात काळही धावतोयजगाची समीकरणे रोज बदलताहेत ! वेगेवेगळे प्रवाह येताहेत. या साऱ्या प्रवासातलालमातीचा टिळा कपाळी लावून पराक्रमाचीमांगल्याचीसृष्टिसौंदर्याचीइतिहासाची ज्योत तेवत ठेवणारा कोकण त्याच्या सुयोग्य विकासासाठी शासनप्रशासनलोकप्रतिनिधी आणि आम्हाला खुणावतोयत्याच्या आवाजाची गाज ऐकून सर्व कोकणवासी कार्यरत झाले,त्याला राजाश्रय मिळाला तर कोकण पर्यटन’ राज्याच्या विकासाचा पासवर्ड बनेल ! 

धीरज वाटेकर
विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८
(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहासपर्यटनपर्यावरणविषयकसामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)













रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

नव्वद वर्षांची वास्तू आजही भक्कम उभी

रत्नागिरी - नव्वद वर्षांपूर्वी कोकणात खाडीकिनारीच्या मालदोली गावात उभारलेली देखणी, भव्य-दिव्य वास्तू आजही भक्कम उभी आहे. हा अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावाच आहे. रामचंद्र वासुदेव मराठे न्यास हे त्या वास्तूचे नाव. डॉ. विश्वेश्वरय्या यांचा परिसस्पर्श वास्तूच्या घडणीत असल्याचे सांगितले जाते; मात्र याला लेखी पुरावा नाही.
या वास्तूचे नियोजन करणारी व्यक्ती त्या काळातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ असावी, असे स्थापत्य अभियंता धीरज वाटेकर यांनी सांगितले. साडेसात एकर जागेत सुमारे २ हजार चौ. फूट आकाराच्या वास्तूत मुख्य दरवाजापासून पाठीमागील दरवाजापर्यंत सरळ रेषेत मोकळी जागा व त्याच्या दोनही बाजूला खोल्या आहेत. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. आतून-बाहेरून लाकडाचे स्वतंत्र दोन जिने आहेत. ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज लागणार नाही वा तो दमणार नाही, अशी जिन्यांची तंत्रशुद्ध रचना आहे. काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत.
विहीर, डोंगरातील झऱ्यांचे पाणी, विशिष्ट उंचीवर १० बाय २० फूट आकाराच्या टाक्‍यात साठविण्याची सोय आहे. वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्‍या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. शास्त्रीयदृष्ट्या आवश्‍यक चौफेर सूर्यप्रकाश प्रत्येक खोलीत मिळतो. छताच्या रिपांचा भाग फळ्या मारून बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात छोट्या गळतीला प्रतिबंध होतो. वास्तूतील सर्व दरवाजे-खिडक्‍या बंद करायला किमान ३० मिनिटे लागतात.या वास्तूत विश्व हिंदू परिषदेचे अनेक समाजपयोगी उपक्रम चालतात. 
मैत्रीखातर काम
या वास्तूचा आराखडा आणि संपूर्ण काम हे विश्वविख्यात अभियंता भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पुण्यातील पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी रामचंद्र वासुदेव मराठे यांच्याशी असलेल्या मैत्रीखातर त्यांनी ते केले, असे सांगितले जाते. 
हे सारे वैभव त्या काळात मालदोलीसारख्या अगदी ग्रामीण भागात कसे उभारले, हे एक आश्‍चर्यच आहे. त्या अभियंत्याला अभियंता दिनी मानाचा मुजरा करायलाच हवा.
 - धीरज वाटेकर
भक्कम वास्तू अशी...
  •  छताच्या लगी मजबूत 
  •  कोठेही बाक आलेले नाही
  •  आय बीम आजही मजबूत 
  •  भिंतींचा गिलावा उत्तम 
  •  लाकूड अजूनही मजबूत





सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

अहमदनगरच्या 'मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन' तर्फे 'ग्लोबल लाॅरिस्टर' या बहुमानाने धीरज वाटेकर सन्मानित


चिपळूण : समाजाच्या विविध क्षेत्रात तळमळीने विधायक सामाजिक काम करणा-या राज्यातील कार्यकर्त्यांना अहमदनगरच्या 'मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन' चालविणा-या 'पिपल्स हेल्पलाईन' संस्थेच्यावतीने नुकताच 'ग्लोबल लाॅरिस्टर' हा बहुमान जाहिर करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. यात कोकणात पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २१ वर्षे कार्यरत पत्रकार आणि लेखक धीरज वाटेकर यांनाही हा बहुमान देऊन मानवंदना देण्यात आली.


धीरज वाटेकर यांनी गेली काही वर्षे सातत्याने कोकणात राबविलेल्या विविध सामाजिक, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन उपक्रमांची दखल घेऊन त्यांना पिपल्स हेल्पलाईन संस्थेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी हा बहुमान देण्यात येऊन मानवंदना देत असल्याचे नुकतेच जाहिर करून  भ्रमणध्वनीवरून त्यांचे अभिनंदनही केले. या मानवंदना सन्मानामध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे कष्टकरी हमाल पंचायतीचे प्रणेते डाॅ. बाबा आढाव, शोषित महिलांसाठी कार्य करणा-या स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, शास्त्रीय पद्धतीने नव्या शहरांच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असलेले आर्किटेक्ट अर्षद शेख, हिरवेबाजार परिवाराचे डाॅ. पोपटराव पवार यांचा समावेश आहे. 

वयाच्या सतराव्या वर्षापासून आजतागायत गेली सतत एकवीस वर्षे धीरज वाटेकर हे विविध सामाजिक कामात कार्यरत आहेत. विविध अभ्यासदौरे, पर्यटन, संशोधन, अभ्यास, जंगल भ्रमण या करिता त्यांनी हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान असा भारतभर प्रवास केला असून त्या माध्यमातून देशभरातील पर्यावरण आणि पर्यटन या विषयातील हजारो छायाचित्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. पर्यावरण संवर्धन, बिगर मौसमी जंगल पेर अभियान, वृक्ष लागवड, बीज पेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, रोपवाटिका, पर्यावरण जनजागृती यासारख्या उपक्रमात ते गेली काही वर्षे सक्रीय आहेत. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन या विषयावरील आठ पुस्तके लिहिली आहेत. संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादनही त्यांनी केले आहे. यापूर्वी त्यांना सन २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा "उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार", पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटन" पुस्तकास "कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘नलगे ग्रंथ पुरस्कार', सप्टेंबर २०१६ ला पुण्याच्या माय ‘अर्थ फौंडेशन’तर्फे “पर्यावरण भूषण” पुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष गौरव आणि यावर्षी ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डाॅ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून नुकतेच त्यांना 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले. 


ग्लोबल लाॅरिस्टर' या संकल्पनेविषयी बोलताना अॅड. कारभारी गवळी म्हणाले, महात्मा गांधींनी आपले बॅरिस्टर असणे बाजूला ठेवून उन्नत चेतनेने देश वासियांना एकत्र करून स्वातंत्र्याचा लढा जिंकला. आजही आपल्या देशासमोर पर्यावरणासह समाजातील दुबळ्या घटकांचे प्रश्न सोडवून सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायासाठी लढणा-या कार्यकर्त्यांची फळी कार्यरत असून त्यांच्या कार्याला सक्रिय पाठिंबा देण्याच्या हेतूने अहमदनगरच्या हुतात्मा स्मारकात 'ग्लोबल लाॅरिस्टर' बहुमान मानवंदना संकल्पना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे राज्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या वाटेकर यांनी या क्षेत्रातील मार्गदर्शक व ज्येष्ठ सहकारी संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, चंदनतज्ञ महेंद्र घागरे, विलास महाडिक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या मानवंदना कार्यक्रमास विठ्ठल झुरम, श्याम आसावा, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, अजित कुलकर्णी आणि संस्थेशी जोडलेले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 





शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

दृष्टी परिवर्तनाचे ‘रक्षाबंधन’ घडावे !

     
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन ! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी बहिण भावाच्या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णिला आहे. भारतीय संस्कृती मानवी जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ असे वचन आहे अर्थात ‘जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो.’ हे सारे खरे असले तरीही स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचार आपल्याला नवीन नाहीत. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. या पार्श्वभूमीवर वर्तमानकाळात रक्षाबंधनाचा सण हा मानवी दृष्टी परिवर्तनाचा सण बनायला हवायं ! ज्यातून भारतीय संस्कृती संवर्धनाचे मूल्य बदलत्या युगातही जपले जाईल.

      हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेस राखी पौर्णिमा येते. ही पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावाआपल्या भावाने आपले रक्षण करावेही या मागची मंगल मनोकामना ! रक्षाबंधन एकमेकांशी जवळीक साधण्याचा, परस्परांना हमीविश्वास देण्याचा, ‘मी तुझ्या मदतीसाठीसंरक्षणासाठी इथे आहे, मी आपल्या नाते संबंधाप्रति,  मैत्रीप्रति वचनबद्ध आहे’  हा विश्वास दर्शवण्याचा सण आहे. आपल्याकडे पूर्वी सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपणलाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई. या मनाच्या खेळात आपला शाश्‍वत पाठीराखा कोणीतरी असावा, ही भावना भावाजवळ येऊन थांबे, तेव्हा ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतं. कोणत्याही क्षणीप्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणाऱ्या भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना बहिणीच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भसंस्कार यात महत्त्वाचा आहे. ‘राखी ह्या शब्दातच ‘रक्षण कर (राख म्हणजे सांभाळहा संकेत आहे. रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झालीयाबाबत निश्‍चित पुरावा नाही. एका आख्यायिकेनुसार पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे अनेकदा देवांचे काही चालत नसे. एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेलअशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याला त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे म्हणतात. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले होते. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलत असते. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःकडे घेत असतो. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे बहिणीचे भावाच्या विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत यामध्ये दिसून येतो. देशाच्या काही भागात ज्या स्त्रीयांना भाऊ नाहीत्या स्त्रीया चंद्राला आपला भाऊ मानून ओवाळतात. हा पूर्वांपार चालत आलेला सणभारतीय संस्कृतीमध्ये आजही मानाचे स्थान राखून आहे.ह्याच दिवशी आपले कोळीबांधव खवळलेल्या सागराला शांत करण्यासाठीत्याची पूजा करून नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात थांबलेल्या मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात.

      आज बदलत्या काळात राख्यांचे ट्रेण्डही बदललेत. सध्या बाजारात डिझायनर राख्यांची चलती आहे. बच्चे कंपनीसाठी डोरेमॉनपासून बालगणेशापर्यंत राख्यांची भरपूर व्हरायटी आज पहायला मिळते आहे. एका मोठ्या मण्यामध्ये आणि दोन्ही बाजूला एकेक किंवा अधिक छोटे मणी अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या बीड्स राख्यांना आज बाजारात खूप मागणी आहे. जरदोसी धाग्यांपासून वेगवेगळ्या डिझाइनमध्ये बनलेल्या राख्या, लहान मुलांच्या भावविश्वातली मिकी माऊस, टेडी बेअर, बॅटमॅन, हॅना मॉण्टा, छोटा भीम,बालगणेशडोरॅमॉन कार्टून्स विराजमान असलेल्या राख्या, मण्यांप्रमाणेच मोत्यांचाही वापर असलेल्या डिझायनर राख्या, विविध रंगधागे आणि आकारात मिळणाऱ्या फॅन्सी राख्यांसह स्वस्तिकजपमाळेतील मणीरुदाक्षओम्कुयरीगणपतीदेवी अशी अक्षरं / चिन्हं असणाऱ्या धार्मिक, अध्यात्मिक टच देणाऱ्या राख्यांनी मार्केट काबीज केले आहे. डायमण्ड्स, मणी, वेल्वेट बॉल्स यापासून बनवण्यात आलेली ब्रेसलेट राखी, फेंगशुईतील विण्डकॉइन, ड्रॅगन, कासव, गोल्डफिश, लाफिंग बुद्धा अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षीचा ट्रेंड आहे तो वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो असे लिहून धाग्यात गुंफलेल्या राख्यांचा. बदलत्या काळात नात्यातील भावना त्याच असल्या तरी परिसीमा बदलताहेत. पूर्वीपासूनचा कडक स्वभावाचा दादा आता मित्र किंवा कुल ब्रो झाला आहे. त्यामुळे राख्याही बदलल्यात. राखीपौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षकआणि ट्रेंडी राखी बांधावी याकडे तरुणींचा कल जास्त आहे, अर्थात बाजारपेठेनेही याची दाखल घेतलेली आहे. ऑनलाइन मार्केट अर्थात इन्स्टाग्रामफ्लिपकार्ट सारख्यासाइट्सवरूनही राख्यांची विक्री होते आहे. ‘प्लॅटिनम बँड्स’ हे सुद्धा राखीचं एक महागडं नवं रूप बाजारात उपलब्ध आहे. कस्टमाइज्ड गोष्टी आवडणाऱ्यांसाठी, भावांना त्यांच्या नावाच्या आद्याक्षराची राखी बांधणं पसंत करणाऱ्या बहिणींसाठी वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये नावे कोरून अ‍ॅक्रेलिक, लाकूड, धातूवर तयार केलेल्या राख्या अनेकांनाभावताहेत. बाजारात या राख्यांचं प्रमाण फारसं नसलं तरी त्या ऑनलाइन उपलब्ध होताहेत. राखीला बंधू-भगिनी प्रेमाची झालर म्हणून चक्क भावाबहिणीचे फोटोच राखीवर पिट्र करून घेण्याचा नवीन प्रकार रुजू पाहतो आहे, अर्थात राखीतही आता डिजिटलायझेशन येत आहे.

      आमच्या लहानपणी आम्ही सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या चकतीची स्पंजवाली राखी मनगटावर आवडीने मिरवायचो. एक सोनेरी धागा, त्या धाग्याच्या मधोमध एक चांदीची चकती, त्या चकतीवर एक भला मोठा स्पंज आणि त्या स्पंजवर फुलं, मोती असलं काही तरी डिझाइन असायचं. ही राखी बांधल्यानंतर दुसऱ्या किंबहुना त्याच दिवशी पहिल्या त्या राखीच्या चकत्या गळून पडायच्या. मग स्पंज सुटा व्हायचा आणि दोन दिवसांनंतर मनगटावर फक्त धागा शिल्लक राहायचा. स्पंजचा वापर पाटी पुसायला व्हायचा. लालहिरव्यापिवळ्या अशा कोणत्याही रंगात मिळणारी रेशमी गोंड्याची साधी राखी अनेकांच्या हातावर दिसायची. बालपणातली राखी म्हटलं की अजूनही हेच चित्र राखी डोळ्यांसमोर येते. त्या काळीही चंदनाचा एखादा छोटासा नारळ, एकच फुलं, रूदाक्ष अशा डिझाइनच्या आटोपशीर राख्याही होत्या. स्वस्तिकचं चिन्ह आणि त्यावर शुभ लाभ ही अक्षरं असलेली राखी अपवादाने दिसायची. राखी जेवढी मोठी, तेवढं चांगलं, अशी एक वेडी समजूत मनात कुठेतरी घट्ट रूजलेली होती. शाळेतल्या रक्षाबंधनाची मौज वेगळीच होती. तिसरी-चौथीत असताना आपल्याच हातावर अधिकाधिक राख्या असाव्यात, असं वाटायचं. नि आठवी-नववीत आल्यानंतर, आज आपला हात प्लास्टरमध्ये असता तर किती बरं झालं असतं ? असा विचार मनात येऊन जायचा, असो !

            कुरियर, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात पोस्टानं राख्या येणं कमी झालं तरीही ग्रामीण भागात ते कायम आहे. माध्यमं बदलली असली तरी माया कायम आहे. हा सण साजरा करण्यामागचा मूळ हेतू, शास्त्र जाणून तरुण पिढी या संस्कृतीलापरंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. याची जाणीव करून देण्याची जबाबदारी ज्येष्ठांनी योग्य रित्या पार पाडली तर हे सण मानवी जन्माचे सार्थक घडवतील.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

‘ग्रेटभेट’ : विश्वविख्यात 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे

      जेथे अंधार आहे, तेथे दिवा लावा !
     
माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रपतीपदाच्या काळातील आपल्या पोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान विश्वास दाखवलेले आणि संपूर्ण जगभर 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' अशी ओळख असलेल्या, '...आणि दोन हात' या प्रसिद्ध आत्मचरित्राचे नायक आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांची त्यांच्या दादर येथील क्लिनिकमध्ये आम्ही नुकतीच (१८ ऑगस्ट २०१८) सदिच्छा भेट घेतली. आपल्या समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. समाजात वाईट कितीही असलं तरीही आपण आपल्या आयुष्यात काय चांगलं करू शकतो ? याचा विचार सतत केला पाहिजे. असे सांगून,  'जेथे अंधार आहे तिथे दिवा लावा !' जे काम करतायं, ते लिहूनही ठेवा. उपयोग होईल, असा सल्ला ८७ वर्षे वयाच्या आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांनी दिला.

      दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी, प्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांचे आम्ही लिहिलेले चरित्र, आमची आठवी लेखनकृती 'कृतार्थीनी' प्रकाशित झाल्यानंतर, त्या पुस्तक लेखनाचे कौतुक करण्यासोबतच आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांनी, 'मुंबईत याल तेव्हा अवश्य भेटा' अशी सूचना केली होती. आम्हालाच त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायला बराच उशीर झाला, अर्थात संपर्क होता !

      'काळोखाचा सागर किती अथांग असला,
      तरी त्यात प्रकाशाची बेटं असतातचं !’
ही कुसुमाग्रजांची कविता सरांनी आम्हाला ऐकवली. आपलं वय किती ? आणि काही कौटुंबिक प्रश्न विचारल्यानंतर, इंजिनियर असूनही पैशाच्या मागे न धावता लेखनकला जोपासून आहात. तुमच्याकडे पाहून तुमच्या मित्रमंडळींचा काय वाटते ? सद्यस्थितीत लोकं जागे होत आहेत का ? शिक्षणाचा परिणाम काही होतोय का ? कोणाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडला ? संस्काराची शिदोरी ? असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी विचारले. विशेष म्हणजे आम्ही देत असलेल्या उत्तरातील मुद्दे, हातात कागद-पेन घेऊन आदरणीय डॉ. श्रीखंडे सर स्वतः टीपत होते. आमच्या जीवनातील हा अत्यंत विलक्षण असा अनुभव होता.

      बोलताबोलता आमची कॉलेजमध्ये असल्यापासूनची चरित्रे वाचनाची आवड आणि त्यातून 'कॅटलिस्ट' प्रमाणे कार्यरत राहाण्याची बनलेली मानसिकता त्यांनी बरोबर हेरली. आमच्या व्यक्तिगत ग्रंथालयाची, संकल्पित संग्रहालयाची माहिती, कोकणातील पर्यटन, पर्यावरण विषयक आम्ही करीत असलेल्या कामांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. पुरातत्तवीय नवलांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, संग्रहालयाकडे आत्यंतिक आवश्यक म्हणून पाहण्याच्या आपल्याकडील वृत्तीचा अभाव आणि विदेशी लोकांची संग्रहालये विकसित करण्याची मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले. भरपूर पैसा कमावणारी माणसं आज प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगून त्यांनी याच्या पुष्ठ्यर्थ वैद्यकीय जीवनातील अलिकडची उदाहरणे सांगितली.

      अटलबिहारी वाजपेयींबद्दल तुला काय वाटतं ? या त्यांच्या प्रश्नावर बोलताना, 'काही माणसांचं मोठेपण आपल्याला उशीरा समजतं. किंबहुना माणूस गेल्यावर समजतं.' हे आमचे उत्तर ऐकल्यावर या मागची कारणमीमांसा करताना ते थेट आठनऊशे वर्षे मागे गेले. इतिहासात आपली प्राचीन भारतीय संस्कृती महान आहे. संपत्ती आणि सुबत्ता यामुळे भारतावर झालेली परकीय आक्रमणे आणि पारतंत्र्यात गेली आठ-नऊशे वर्षे राहिल्याचा हा परिणाम आहे. जे देश कधी पारतंत्र्यात गेलेच नाहीत ते पाहिले की हे जाणवतं असे त्यांनी सांगितले. वेस्टर्न सायन्स येईपर्यंत जगात आयुर्वेद श्रेष्ठ सायन्स होते. आज दुर्दैवाने आपल्याकडे संशोधन कमी, थापा मारण्यात रस अधिक अशी मानसिकता जाणवत असल्याचे ते म्हणाले. चीनच्या सामान्य माणसाची कमाई आपल्याकडील माणसाच्या सहा पट अधिक आहे आणि हे गेल्या वीस वर्षांत घडलंय याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शंभर वर्षांपूर्वी बालकामगार जगात सर्वत्र होते, आज नाहीत कारण जगं बदलत चाललंय. जातिभेद मागे पडलाय. पूर्वी माणसं मलेरिया टायफाईड न्यूमोनिया ने मरतं, आज ते ही बदललंय. आपल्याकडे भारतात कायद्याने न्याय उशीरा मिळतो आणि ते योग्यच आहे अन्यथा सर्वजण कोर्टात जात राहतील असेही त्यांनी सांगितले.

      जगातील सुंदर आहे नि अनेक चांगली माणसं चांगली कामं करताहेत. लेखणीतून माणसं तयार होऊ शकतात, माणसं बदलू शकतात. माणसांना बदलवण्यातच खरे कौशल्य आहे. स्वतःबद्दल पुस्तक लिहा, प्रकाशित कधी करायचं ते नंतर बघू पण स्वतःविषयी लिहायला सुरुवात करा. ‘जी चूक मी केली ती करू नका’, असा आपुलकीचा सल्लाही सरांनी दिला. गेली २० वर्षे आम्ही डायरी लिहितोय हे मात्र सरांना सांगायचे राहून गेले. आम्ही चिपळूणचे म्हटल्यावर, सरांनी चिपळूणचे प्रसिद्ध डॉ. रत्नाकर घाणेकर हे माझे विद्यार्थी अशी आठवण सांगून डॉ. देवधर, डॉ. पाटणकर, नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांचाही आवर्जून उल्लेख केला. 'या भेटीने समाधान झालेलं नाही, पुन्हा भेटायला याअशी आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांची सूचना ग्रहण करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८

https://www.facebook.com/groups/2124009321200341/permalink/2153386568262616/?__tn__=K-R


आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...