गुरुवार, ४ जून, २०२०

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील ‘जिल्हाध्यक्ष’ पदभार निवड जाहीर

अहमदनगर : वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने जागतिक पर्यावरण दिनी आपल्या पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षांची पदभार निवड जाहीर केली आहे. राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष पुढीलप्रमाणे : अहमदनगर - तुकाराम तुळशीराम अडसूळ, रत्नागिरी - विजयकुमार अनंत पंडित, रायगड - स्वाती सदानंद कदम, सिंधुदुर्ग - रणजित सीताराम पाताडे, बीड - कचरू सूर्यभान चांभारे, नांदेड - सारीनाथ धारबा लोणे, सांगली - बाळासाहेब शिवप्पा कणके, नाशिक - सुहास अशोक गावीत, जालना - तारा श्रीवल्लभ काबरा, लातूर - माधव विठ्ठलराव केंद्रे, वाशिम - शिवप्पा प्रल्हाद नंदकुले, सातारा - डॉ. गौतम महादेव सावंत, चंद्रपूर - स्वाती राजेश धोटकर, ठाणे - सुचिता राजेंद्र सकपाळ, जळगाव - नाना शंकर पाटील, मुंबई -  कमलाकर समर्थ मोरे, धुळे -संजीव मारुती ढवळे, सोलापूर - विजयचंद्र ज्ञानोबा पाटील, औरंगाबाद - राजन रघुनाथ सोमासे, उस्मानाबाद - लक्ष्मण गुराप्पा चव्हाण, हिंगोली - रमेश निवृत्तीराव  यमलवाड, कोल्हापूर - डॉ.पाटील महंमद हुसेन अब्दूलगणी, पुणे - मारुती सीताराम कदम, अमरावती - डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे, गोंदिया - गोवर्धन रघुनाथ खेडकर, यवतमाळ - पंडितराव शंकरराव म्हस्के, गडचिरोली - विठ्ठल  एस. परशुरामकर, नागपूर - रामदास तेजराव खवशी, परभणी - पंढरीनाथ लक्ष्मणराव जोशी, वर्धा - सीमा वसंतराव कांमडी, अकोला - रुपसिंग सूर्यभान  बागडे, भंडारा - सुनीता उमाजी बिसेन, नंदुरबार - दिग्विजय मगणलाल माळी, बुलढाणा - प्रा. डॉ. अविनाश कृष्णराव मेश्राम.

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने, ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामापासून व विविध साथीच्या आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात व घराभोवती ऑक्सिजन देणारे पिंपळ ,वड ,कडूनिब ,नांदूरखी ,तूळस या देशी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे. हे जर सतत पाच वर्षे केले तर आपल्याला कशाचीही भीती राहणार नाही. आपल्या नातवांना शुद्ध हवा ,शुद्ध पाणी ,आरोग्यसंपन्न जीवन मिळेल.असा संदेश वृक्षमित्र आबासाहेब मोरे दिला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आबासाहेब सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांनी सुरु केलेली पर्यावरण संमेलने आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्यास दौरे आगामी काळात समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन करू पाहणारे उपक्रम म्हणून नोंदवले जातील. राज्यभरातील सर्व नूतन जिल्हाध्यक्षांच्या निवडीचे उपाध्यक्ष विलास महाडिक, प्रमोद काकडे, सचिव धीरज वाटेकर, कार्यालयीन सचिव प्रमोद मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...