मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

फोटो स्टोरी - धीरज वाटेकर

फोटो स्टोरी - धीरज वाटेकर 

'चिमणी वाचवा, त्याना घरटी बांधायला जागा द्या !' असे विचार आपण नेहमी ऐकतो. आपल्या बालपणी घरात, अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्र्र उडून गेली ती परत आलेली नाही. त्याची अनेक कारणे 'विकास' या एकाच मुद्याभोवती फिरत असतात. त्यामुळे या चिमण्यांना कधीकधी वीजेच्या पोलांचा आधार घ्यावा लागतो. जगप्रसिद्ध दाभोळ गावात टिपलेले हे दृश्य पाहिल्यावर आपण रोज चवीने चघळत असलेल्या पर्यावरण या विषयात आपण नक्की कशासाठी काय करतो आहोत, हेच कळेनासे होते.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...