रविवार, १६ डिसेंबर, २०१८

पहिली मुलाखत

गेल्या १८ ते २० वर्षांच्या पत्रकारिता, पर्यटन आणि चरित्रात्मक पुस्तके लिहिताना, काही कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा योग आला. परंतु कधीतरी आमचीही मुलाखत घेतली जाईल असे वाटले नव्हते. पनवेल मधून प्रकाशित होणा-या इंद्रधनू या पर्यटन विषयाला वाहिलेल्या विजय पवार संपादित दीपावली विशेषांक २०१८ मध्ये प्रा. सौ. अंजली बर्वे मॅडम यांनी घेतलेली आमची मुलाखत प्रसिद्ध झाली. आमच्या आयुष्यातील प्रसिद्ध झालेली ही पहिलीच मुलाखत ! हा  योग  जुळवून  आणल्याबद्दल इंद्रधनू चे संपादक विजय पवार आणि मुलाखतकर्त्या प्रा. सौ. अंजली बर्वे मॅडम यांना मनापासून धन्यवाद.

धीरज वाटेकर





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...