संग्रहालयात शिरल्यावर डाव्या बाजूने पाहात आत गेलो की मनाला थक्क करणाऱ्या अनेक वस्तू दिसतात. सुरुवातीलाच दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मीळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. इथल्या काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे (आदम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधुसंस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण) मागे घेऊन जातात. या वस्तू जागतिक कीर्तीच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (डेक्कन अभिमत विद्यापीठ) पुणे यांनी कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. बालाजी गाजूल (अभिरक्षक, पुरातत्त्व संग्रहालय, डेक्कन कॉलेज पुणे) यांच्या सहकार्याने उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदि शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षपूर्व गणपती, कलात्मक कंदिल, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बिण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील, भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटीयन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण धृवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्न ओव्हर (फोंडा-कणकवली), क्वार्ट्ज (वाटूळ-लांजा), बॉक्साईट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदि खनिजे, होकायंत्राची दिशा बदलविणारे दगड, जुना सारीपाटाचा खेळ वेगवेगळ्या आकर्षक रचनेत मांडण्यात आलेले आहेत.
शनिवार, १२ जानेवारी, २०१९
चिपळूणचे वैभवशाली वस्तूसंग्रहालय

मंगळवार, १ जानेवारी, २०१९
माने सर ! विद्यार्थी प्रिय शिक्षक ते मुख्याध्यापक !
मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८
‘वंदनीय’ अटलजी...!
दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी
सायंकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने वंदनीय अटलजींचं निधन झाल्याची
बातमी आली आणि देशातल्या आमच्यासारख्या असंख्य संवेदनशील नागरिकांना जणू आपल्याच
घरातलं वडीलधारं गेल्यासारखं वाटलं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संपूर्ण भारतीय
जनमानसावर ज्या मोजक्या नेत्यांनी आपली छाप सोडलेली दिसते त्यात अफाट विद्वत्ता, देवळाच्या गाभाऱ्यात पसरलेल्या सोज्वळ
प्रकाशासारखा सुसंस्कृतपणा आणि अजातशत्रुत्व लाभलेले पूर्व पंतप्रधान भारतरत्न
अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान फार वरचे आहे. अष्टपैलू
व्यक्तिमत्वाचे धनी राहिलेले अटलजी हे पत्रकार, कवी, लेखक, विचारवंत, राजकीय नेते तर होतेच परंतु त्यांची खरी ओळख सह्रदयी, दिलदार, निखळ मनाचा माणूस म्हणून अधिक होती. भारतीय राजकारणाचे
स्वातंत्र्यानंतरचे एक युग गाजवलेल्या, आपल्या पक्षाच्या विचारसरणीसह मर्यादेचे सजग समाजभान
असणाऱ्या, आपल्या विचारधारांशी समर्पित
राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींचे ‘मानवी
मूल्य’ कालौघात समाजाच्या अधिक
प्रखरतेने लक्षात येत राहील.
सोमवार, २४ डिसेंबर, २०१८
रविवार, १६ डिसेंबर, २०१८
पहिली मुलाखत
बुधवार, १२ डिसेंबर, २०१८
फोटो स्टोरी - धीरज वाटेकर
'चिमणी वाचवा, त्याना घरटी बांधायला जागा द्या !' असे विचार आपण नेहमी ऐकतो. आपल्या बालपणी घरात, अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्र्र उडून गेली ती परत आलेली नाही. त्याची अनेक कारणे 'विकास' या एकाच मुद्याभोवती फिरत असतात. त्यामुळे या चिमण्यांना कधीकधी वीजेच्या पोलांचा आधार घ्यावा लागतो. जगप्रसिद्ध दाभोळ गावात टिपलेले हे दृश्य पाहिल्यावर आपण रोज चवीने चघळत असलेल्या पर्यावरण या विषयात आपण नक्की कशासाठी काय करतो आहोत, हेच कळेनासे होते.
आजीची 'श्रद्धा' एक सांस्कृतिक संचित
गणेशोत्सवात दीड दिवसाच्या बाप्पाच्या सेवेला मूळगावी, असतानाची घटना. सुमारे ऐंशी वर्षे वयाची परिचयातील एक वृद्ध आजी काठी टेकत टेक...
-
साप्ताहिक जगन्मित्र रत्नागिरी २० ऑगस्ट १८६६ ‘वर्तमानपत्र’ ही रद्दी नसून त्या त्या भागाच्या इतिहासाचा मार्गदर्शक आरसा आहेत. नितीमूल्यांच्या प...
-
कोकणातील एका शाळेने वसुबारस पूर्वदिनी (३१ ऑक्टोबर २०२१) ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ करत आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ शाळेच्या विद्यार्...
-
भारतीय आणि महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीच्या जडणघडणीत नाथपंथाचे खूप महत्वाचे स्थान आहे . संपूर्ण देशभरात हा समाज विखुरलेला आह...
-
२०२२चा मराठी पत्रकार दिन. वेळ सकाळची! ठिकाण रत्नागिरी शहरातील माळनाका येथील सरकारी विश्रामगृह. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी पर...
-
कोकणातील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर सरांच्या अध्यक्षतेखाली आजपासून (१-३ मार...